म्हसवड शहरात स्वामींचा प्रकटदिन उत्साहात साजरा
२१ वर्षापुर्वी म्हसवड शहरात उभारलेल्या श्रींच्या या मंदिरात नित्यनियमाने मोठ्या भक्तीमय वातावरणात स्वांमीच्या मुर्तीचे पूजन केले जाते. २१ वर्षापुर्वी म्हणजे १३/२ २००५ रोजी म्हसवड शहरात श्री. स्वामींचे मंदिर उभारण्यात आले असुन तेव्हापासुन आजअखेर निरतंर येथे सेवा सुरु आहे.
म्हसवड शहरातील स्वामी भक्तांकडुन म्हसवड ते अक्कलकोट याठिकाणी पायी दिंडी जात होती, त्यावेळी दिंडीतील भाविकांना स्वामींनी दृष्टांत देत मला तुमच्या गावी न्या असा संदेश दिल्यानेच शहरात मंदिराची प्रतिष्ठापणा करण्यात आल्याचे मंदिराचे विश्वस्त चंद्रकांत जंगम ( गुरुजी ) यांनी सांगितले.
मंदिर स्थापनेपासुन वर्षानुवर्ष भाविकांना जसजशी स्वामांची प्रचिती येवु लागली आहे, तसतशी प्रत्येक वर्षी येथे मोठी गर्दी वाढत असुन प्रकट दिन निर्वाण दिन या सह प्रत्येक गुरुवारी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी उसळत आहे. स्वामींची अनुभुती अनेकांना येवु लागल्याने शहरात स्वामी भक्तांची संख्या मोठी आहे.
प्रकट दिनानिमीत्त मंदिरात सकाळी ७ वा. स्वामींना महाभिषेक करण्यात आला, त्यानंतर ८ वाजता स्वामींचा शहरातुन पालखी सोहळा संपन्न झाला, तर ठिक १२ वाजता स्वामींची आरती संपन्न होवुन फुलांचा कार्यक्रम संपन्न झाला, त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला ट, यावेळी स्वामींच्या जयघोषाने मंदिर परिसर दणाणुन गेला.
स्वामी समर्थाच्या प्रकट दिनाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? भक्तांसाठी हा दिवस आहे खास, जाणून घ्या






