
फोटो सौजन्य: iStock
सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आग पसरू नये म्हणून व्यापारी व नागरिकांनी प्रसंगावधान राखत शेजारची दुकाने तत्काळ रिकामी केली. दुकानांना वेढलेल्या आगीमुळे परिसरात दाट धूर पसरला होता. आग दिसताच व्यापारी व नागरिक घटनास्थळी धावून आले.
Thane Politics: भाजपच्या माजी नगरसेवकाची शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण; ठाण्यात राजकारण तापणार
नागरिकांचा आरोप आहे की नगरपंचायतचा अग्निशमन बंब उशिरा आल्याने आग नियंत्रणात आणण्यास विलंब झाला. मात्र, पावणे अकराच्या सुमारास ज्ञानेश्वर कारखान्याचा अग्निशमन बंब आल्यानंतर परिस्थिती आटोक्यात आली. शेकडो तरुणांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत केली. या घटनेनंतर आमदार विठ्ठलराव लंघे आणि युवा नेते उदयन गडाख यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
दरम्यान, वघोडेगाव येथील माता घोडेश्वरी फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्स या तीन मजली दुकानाला अचानक अज्ञात कारणामुळे भीषण आग लागली. काही मिनिटांतच आगीने प्रचंड रौद्ररूप धारण करून दुकानाचे मोठे नुकसान केले. प्राथमिक माहितीनुसार, या ठिकाणी कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
दुकानमालक सचिन सुभाष चोरडिया आणि त्यावेळी उपस्थित ग्राहकांनी शटर उघडून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु आग वेगाने पसरत असल्याने ती नियंत्रणात आली नाही.
घोडेगावातील घटनेची माहिती मिळताच आमदार लंघे, युवा नेते गडाख, तहसीलदार संजय बिराजदार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा व पुढील कार्यवाहीबाबत सूचना केल्या. सोनई पोलिस स्टेशनचे विजय माळी आणि शिंगणापूरचे पोलिस निरीक्षक आशिष शेळके यांनी वाहतूक नियंत्रणात ठेवले. तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी पंचनामा करून प्राथमिक अहवाल तयार केला असून आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही.