भाजपच्या माजी नगरसेवकाची शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण; ठाण्यात राजकारण तापणार
ठाण्यात भाजपच्या माजी नगरसेवकाने शिंदे गटाच्या शाखाप्रमुख आणि उपविभाग प्रमुखाला मारहाण केल्याची माहिती आहे. भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी शिवसेना शिंदे गटाचे हरेश महाडिक, शाखाप्रमुख महेश लहाने, उपविभागप्रमुखांना मारहाण केली. या मारहाण प्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. २० नोव्हेंबरला रात्री उशिरा याप्रकरणी तक्रर दाखल करण्यात आली.
Local Body Election: माळेगाव निवडणुकीत राष्ट्रवादी जनमत आघाडी माघार घेणार? इच्छुकांनी थेट…
शिवसेना शिंदे गटातील मंत्र्यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 19 नोव्हेंबर रोजी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्यप्रणालीबाबत एकनाथ शिंदेंनी तक्रारही केली. कल्याण–डोंबिवलीसह अनेक ठिकाणी रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ‘ऑपरेशन लोटस’ राबवण्यात आल्याचा, तसेच अनेक माजी नगरसेवकांना आमिष देऊन भाजपमध्ये घेतल्याचा आरोप शिंदेंनी केला. निधी वितरणापासून ते संघटनात्मक पातळीवरील हस्तक्षेपापर्यंत अनेक मुद्दे शाहांसमोर शिंदेंनी मांडल्याचे बोलले जाते. या घडामोडींमुळे महायुतीच्या ठाण्यातील समीकरणांमध्ये मोठी दरी निर्माण झाली असून, आगामी निवडणूक पार्श्वभूमीवर हा संघर्ष आणखी उफाळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
दरम्यान, गुरुवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘होमपिच’ ठाण्यातच दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये गंभीर वाद झाल्याचे समोर आले आहे. सरकारच्या एका निर्णयाचे क्रेडिट कोणाला, यावरून सुरू झालेल्या वादाची परिणती हातघाईवर झाल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.
सरकारच्या निर्णयाचा जल्लोष करण्यासाठी शिंदे गटाचे कार्यकर्ते लक्ष्मी नारायण इमारतीत जमले होते. मात्र, यावेळी भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार येथे दाखल झाले आणि “क्रेडिट घेण्याचा” मुद्दा उपस्थित करत शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना कानशिलात लगावल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच धमकीही दिल्याचा दावा शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला.
Maharashtra Politics: नक्कीच काहीतरी बिनसलंय? एकनाथ शिंदेंना नेमकं झालयं तरी काय?
या घटनेनंतर नौपाडा पोलीस ठाण्याबाहेर शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. “दादागिरीला त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल,” असा इशारा देत त्यांनी शिवसैनिकांची नाराजी स्पष्ट केली. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा जल्लोष दाखवण्यासाठी पदाधिकारी व्हिडीओ कॉल करणार होते, त्याचवेळी हा वाद उद्भवला. त्यामुळे ठाण्यात भाजप–शिंदे गटातील मतभेद तीव्र झाल्याचे चित्र पुन्हा एकदा ठळकपणे समोर आले आहे.
भाजप आणि शिंदे गटाकडून कल्याण डोंबिवली भागात एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी फोडाफोडीचे प्रकार सुरु झाले होते. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघातूनच हा प्रकार सुरू झाला होती. त्यामुळेच शिंदे आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली होती. या फोडाफोडीबाबत एकनाथ शिंदे यांनीही याबाबतची तक्रार गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार केली. तसेच, शिंदे गटाच्या मंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला अनुपस्थित राहत बैठकीवर बहिष्कार घातला. त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चांही सुरू झाल्या होत्या.






