Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: ‘या’ किरकोळ कारणावरून तमाशा कलावंतांचा विनयभंग! संगमनेर तालुक्यातील घटना; चौघांना अटक

दुचाकीला कट लागल्याच्या किरकोळ कारणावरून तमाशा कलावंतांचा विनयभंग झाल्याची घटना संगमनेरमध्ये घडली आहे. चला या घटनेबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 03, 2026 | 09:44 PM
'या' किरकोळ कारणावरून तमाशा कलावंतांचा विनयभंग! संगमनेर तालुक्यातील घटना; चौघांना अटक

'या' किरकोळ कारणावरून तमाशा कलावंतांचा विनयभंग! संगमनेर तालुक्यातील घटना; चौघांना अटक

Follow Us
Follow Us:

वरुडी पठार (ता. संगमनेर) येथे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या सर्विस रोडवर दुचाकीला कट लागल्याच्या किरकोळ कारणावरून राष्ट्रपती सुवर्णपदक विजेत्या दिवंगत विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या तमाशा फडातील कलावंतांवर जमावाने हल्ला केल्याची संतापजनक घटना बुधवारी (दि. १) घडली. या भीषण प्रकारात महिला कलावंतांना मारहाण करून त्यांचा विनयभंग करण्यात आला. कलावंतांचे सोने व रोकडही लुटली आहे. या प्रकरणी चार जणांना अटक केली असून इतर अनोळखी १० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

सुप्रसिद्ध विठाबाई भाऊ मांग तमाशा फडातील ४४ पुरुष कामगार व १६ महिला कलावंत १ एप्रिलला पोखरी बाळेश्वर येथील कार्यक्रम संपवून नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गाने सारोळे पठार येथे जात होते. वरुडी पठार शिवारातील एचपी पेट्रोल पंपावर गाड्यांमध्ये डिझेल भरण्यासाठी ते थांबले होते. तेथे डिझेल भरुन पेट्रोल पंपाच्या बाहेर निघताना पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील सव्हींस रोडवर ट्रकच्या समोर चार ते पाच जण मोटारसायकलस्वार आले.

Pulsar चा दर्जा अजूनच वाढणार! ‘या’ बाईकचा 350cc व्हर्जन लवकरच होणार लाँच

त्यांनी ट्रक ड्रायव्हर प्रकाश विठ्ठल औटी (रा. राजुरी ता. जुन्नर) याला कट मारण्याच्या कारणावरुन शिवीगाळ केली. एवढेच नव्हे, तर ड्रायव्हरला गाडीतून खाली ओढून बेदम मारहाण केली. यादरम्यान तमाशातील कलावंत त्यांस सोडवण्यासाठी गेले असता त्यांनी ड्रायव्हर विकास सुखदेव जठार यांना देखील हाताने व काठीने मारहाण केली. तसेच लक्झरी बसच्या (क्र. एमएच ०४ एफके ००९६) दरवाज्याच्या काचेवर दगड मारुन काचा फोडून नुकसान केले. या प्रकरणाचा पुढील तपास घारगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या मार्गदर्शखाली घारगाव पोलिस करत आहेत.

मारहाण झालेल्यांमध्ये कलाकारांचा समावेश

बसमधील कलावंत अक्षरा शामिल शिंदे, आरुषी सुमित काळे (रा. सांगवी ता. फलटण), संध्या राम चौघुले (रा. संभाजीनगर), शामिल अतुल शिंदे (रा. सांगवी ता. फलटण), गणेश शिवाजी गायकवाड (रा. सांगोला जि. सोलापुर), अनुज विशाल हुलसार (रा. नारायणगाव ता. जुन्नर), राम बशीरुध्दीन चौगुले (रा. संभाजीनगर), अजित वाळुंज (रा. आळेफाटा ता. जुन्नर) यांना शिवीगाळ करुन काठीने मारहाण केली.

6 एप्रिलपासून Mahindra च्या ‘या’ गाड्या धडाधड होणार महाग; मात्र ‘या’ ग्राहकांना जुन्या किमतीतच मिळणार कार

हल्लेखोरांनी साथीदारांना बोलावले

या हल्लेखोरांनी त्यांचे इतर साथीदारांना बोलावून घेतले. काही महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. कैलास सावंत यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चैन व जवळ असलेले सव्वा दोन लाख रुपये काढून घेतले. धक्काबुक्की, शिवीगाळ व मारहाणही केली.

घारगाव पोलिसात यांच्यावर गुन्हा दाखल

याप्रकरणी कैलास मारुती सावंत यांच्या फिर्यादीवरून सुमित शांताराम गुंजाळ, संकेत शांताराम बांगर, सोमेश सुखदेव बोंबले, दत्तात्रय रावसाहेब पडवळ (सर्व रा. कर्जुले पठार ता. संगमनेर) व इतर १० अनोळखींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील वरील चार जणांना अटक करण्यात आली आहे.

Web Title: Ahilyanagar sangamner tamasha artists molestation road rage four arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 09:44 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Sangamner

संबंधित बातम्या

Farmers News : शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; मका-तुरीची विक्रमी पेरणी, मात्र पावसाची दांडी ठरतेय चिंतेचे कारण!
1

Farmers News : शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; मका-तुरीची विक्रमी पेरणी, मात्र पावसाची दांडी ठरतेय चिंतेचे कारण!

AHILYANAGAR : विद्यार्थी आंदोलन दडपण्यासाठी सरकारकडून दडपशाही, किरण काळेंचा गंभीर आरोप
2

AHILYANAGAR : विद्यार्थी आंदोलन दडपण्यासाठी सरकारकडून दडपशाही, किरण काळेंचा गंभीर आरोप

Ahilyanagar News: श्रीरामपूरमध्ये शेतकरी संघटनेचा मोठा विजय; आंदोलनाचा खटला अखेर मागे
3

Ahilyanagar News: श्रीरामपूरमध्ये शेतकरी संघटनेचा मोठा विजय; आंदोलनाचा खटला अखेर मागे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.