पोलीस ठाण्यात 15 तास ठिय्या, नातेवाईक संतप्त!
सूरज शिंदे यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी नाशिक जिल्हा रुग्णालय येथे करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी मृतदेह रुग्णवाहिकेतून थेट संगमनेर सिटी पोलीस स्टेशन येथे आणण्यात आला. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह हलवणार नाही, असा ठाम पवित्रा नातेवाईकांनी घेतला. पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यास रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला होता.
Bihar Crime: वरिष्ठ महिला वकिलाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह; संशयास्पद मृत्यूने खळबळ
परिस्थिती गंभीर होत असल्याने श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नातेवाईकांशी चर्चा करून वातावरण निवळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह हलवणार नाही, या भूमिकेवर नातेवाईक ठाम राहिले.
सूरज शिंदे यांचा मृत्यू अपघाताने नव्हे, तर घातपातामुळे झाला असल्याचे नातेवाईक वारंवार सांगत होते. मात्र, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिस उपाधीक्षक कुणाल सोनवणे व पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांनी स्पष्ट केले. “आम्ही सर्व पुरावे दिले असताना गुन्हा दाखल करण्यास अडचण काय?” असा सवाल करत नातेवाईकांनी न्यायाची मागणी केली.
Kerala Crime: १४ वर्षीय मुलीसोबत बाप अन् चुलत भावासह मामाने केला अत्याचार; सलग चार वर्ष…
दरम्यान, आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ यांनीही पोलिस ठाण्यात येऊन नातेवाईकांची समजूत काढली. मृतदेहाची अवहेलना करू नये, असे आवाहन करत फिर्याद दाखल केली जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर तब्बल 15 तासांनी नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेत अंत्यसंस्कारासाठी नेला.
दुपारी संगमनेर खुर्द येथील अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास सुरू असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिस प्रशासनाने सांगितले.






