Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: बहुचर्चित साकळाई योजनेला अखेर मंजुरी! 32 दुष्काळी गावांसाठी सिंचन प्रकल्पाचा मार्ग खुला

अहिल्यानगर तालुक्यातील ३२ गावांसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 02, 2026 | 09:16 PM
Ahilyanagar News: बहुचर्चित साकळाई योजनेला अखेर मंजुरी! 32 दुष्काळी गावांसाठी सिंचन प्रकल्पाचा मार्ग खुला
Follow Us
Follow Us:

श्रीगोंदे व अहिल्यानगर तालुक्यातील ३२ गावांसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेस आज झालेल्या मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सात वर्षापूर्वी दिलेला शब्द आता पूर्ण झाला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.

अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर व श्रीगोंदे तालुक्यातील ३२ दुष्काळी गावांसाठी असलेल्या या साकळाई योजनेची चर्चा गेल्या अनेक पिढ्यांपासून सुरु होती. या योजनेतून दोन्ही तालुक्यातील नऊ हजार 600 हेक्टर क्षेत्राला पाणी देण्याचे नियोजन होते. या योजनेच्या नावाखाली अनेक निवडणुका लढविल्या गेल्या. परंतु प्रत्यक्षात ही योजना पूर्ण झाली नाही.

भारतीय नौदल पाकवर हल्ला करणार होते! नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांचा गौप्यस्फोट

मुख्यमंत्री फडणवीस यांनी 16 एप्रिल 2019 रोजी वाळकी (ता. नगर) येथे झालेल्या जाहीर सभेत साकळाई योजनेला मंजुरी देण्याचा शब्द दिला होता. त्यानंतर पालकमंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी या योजनेसाठी आपली सर्व ताकद पणाला लावली होती. जलसंपदा मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांनी या योजनेच्या कामाचा विशेष पाठपुरावा केला. आता ही योजना एक हजार २३४.१३ कोटी रूपये खर्चुन पुढील चार वर्षात पूर्ण केली जाणार आहे.

म्हैसगावसह चार ठिकाणी पंपगृह

म्हैसगाव येथे तत्काळ पंपगृह बांधण्यात येणार आहे. यासह इतर तीन पंपगृहही बांधले जाणार आहेत. चार पंपगृह व तीन वितरींकाद्वारे एकूण चार टप्प्यात हे काम पूर्ण केले जाईल. हे पाणी तब्बल २०८.३४ मिटर उपसा करुन चिखली व घुटेवाडी येथील डोंगरावरील वितरण हौदात सोडण्याचे नियोजन आहे. प्रकल्पासाठी एकूण ३९.७१ हेक्टर क्षेत्र आवश्यक असून त्यापैकी ३०.२२ हेक्टर खासगी क्षेत्र संपादीत करण्यात येणार आहे.

योजनेतून तलाव, बंधारे भरून घेणार

साकळाई उपसा सिंचन योजनेअंतर्गत म्हैसगाव येथून चार टप्प्यांत पाणी उचलून ते श्रीगोंदे व नगर तालुक्यातील गावांना दिले जाणार आहे. त्यातून लघू पाझर तलाव, पाझर तलाव, सिमेंट नाला बंधारे, गाव तळे भरण्यात येतील. या योजनेसाठी १.६० टीएमसी पाणी सिंचनासाठी व ०.२० टीएमसी पाणी हे पिण्यासाठी देण्याचे नियोजन आहे. खरीप हंगामात १५ जुलै ते १५ ऑक्टोंबर या काळात पाणी उपसा करुन जलसाठ्यांचे पुनर्भरण केले जाणार आहे.

Satara News : कराड-चिपळूण महामार्गाच्या कामाला वेग; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची मागणी

चार वर्षात योजनेची कामे पूर्ण होतील…

ही योजना पूर्ण केली तर ती आम्हीच करू, असे माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी अनेकदा ठासून सांगितले. दरम्यान, पालकमंत्री विखे पाटील, स्व. शिवाजीराव कार्डिले, माजी मंत्री बबनराव पाचपुते आणि आमदार विक्रम पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली योजनेला मान्यता मिळाली. प्रस्तावित कार्यक्रमानुसार प्रकल्पाची सर्व कामे चार वर्षांत पूर्ण होतील, असा विश्वास भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे. योजनेस मान्यता दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहेत.

Web Title: Ahilyanagar news saklai yojana ahilyanagar aprroved in cabinet meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 09:16 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News

संबंधित बातम्या

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
1

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा
2

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी
3

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय
4

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.