Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon News: रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पुण्याहून सुटणाऱ्या विशेष गाड्या आता चाळीसगाव, पाचोरा, भुसावळलाही थांबणार

Jalgaon News: सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने हडपसर (पुणे) ते दरभंगा दरम्यान चार विशेष रेल्वे फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांना जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा आणि भुसावळ या महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 16, 2026 | 04:17 PM
Jalgaon News: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Jalgaon News: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  1. पुणे-दरभंगा दरम्यान चार विशेष रेल्वे फेऱ्या धावणार.
  2. चाळीसगाव, पाचोरा आणि भुसावळ येथे गाड्यांना थांबा.
  3. सणासुदीच्या गर्दीत पुणे-बिहार प्रवाशांना मोठा दिलासा.

Pune Darbhanga Special Trains 2026: जळगाव (वा.) सणासुदीच्या काळात प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने हडपसर (पुणे) ते दरभंगा दरम्यान विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गावर एकूण चार विशेष फेऱ्या होणार असून, यामुळे पुणे आणि उत्तर भारतादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

विशेष म्हणजे, या गाड्यांना जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा आणि भुसावळ या तीन महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. गाडी क्रमांक ०५५३४ हडपसर-दरभंगा विशेष रेल्वे १९ आणि २६ नोव्हेंबर २०२६ रोजी हडपसर येथून सकाळी १० वाजता सुटणार आहे. प्रवासादरम्यान विविध स्थानकांवर थांबत ही गाडी दुसऱ्या दिवशी रात्री ११.३० वाजता दरभंगा येथे पोहोचणार आहे. Jalgaon News:

बिहारकडे जाणाऱ्यांना ही अतिरक्त अशी सेवा

या गाडीच्या दोन फेऱ्यांमुळे पुणे परिसरातून विहारकडे जाणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त प्रवास सुविधा उपलब्ध होणार आहे. परतीच्या दिशेने गाडी क्रमांक ०५५३३ दरभंगा-हडपसर विशेष रेल्वे १७ आणि २४ नोव्हेंबर २०२६ रोजी दरभंगा येथून सायंकाळी ७.३० वाजता सुटणार आहे. ही गाडी तिसऱ्या दिवशी सकाळी ७.४० वाजता हडपसर येथे पोहोचणार आहे.

Jalgaon News: बळीराजाच्या जयघोषाने दणाणले शहर, अमळनेरात सवाद्य मिरवणुकीनंतर स्मारकावर आजी, माजी आमदारांनी केले अभिवादन

या गाडीच्या दोन फेऱ्यांमुळे बिहारमधून पुण्याकडे येणाऱ्या प्रवाशांनाही अतिरिक्त रेल्वे सुविधा मिळणार आहे. या विशेष रेल्वेगाड्यांना महाराष्ट्रातील दौंड कॉर्ड लाइन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा आणि भुसावळ येथे थांबे देण्यात आले आहेत.

विशेष गाड्यांना असणार आहेत एकूण २२ डबे

विशेष रेल्वेगाड्यांना एकूण २२ डबे असणार आहेत. त्यामध्ये एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, चार वातानुकूलित तृतीय श्रेणी, तीन वातानुकूलित तृतीय श्रेणी इकॉनॉमी, सात शयनयान श्रेणी आणि पाच सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील. याशिवाय एक द्वितीय श्रेणी आसनयुक्त सह गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटरसह गार्ड व्हॅन जोडण्यात येणार आहे. त्यामुळे विविध आर्थिक स्तरांतील प्रवाशांना त्यांच्या सोयीनुसार प्रवासाचे पर्याय उपलब्ध होतील.

येथे जाणाऱ्यांना लाभ

याशिवाय मध्य प्रदेशातील खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, सतना, उत्तर प्रदेशातील प्रयागराज छिवकी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय तसेच बिहारमधील बक्सर, आरा, पाटलीपुत्र, हाजीपूर, सोनपूर आणि मुजफ्फरपूर या स्थानकांवरही गाड्या थांबणार आहेत.

Jalgaon News: सणांचा उत्साह अन् बसस्थानक हाऊसफुल्ल! एरंडोल आगाराची 10 लाखांच्या कमाईकडे झेप

जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा आणि भुसावळ या स्थानकांवर थांबे मिळाल्याने या परिसरातील प्रवाशांना पुणे तसेच उत्तर भारतातील विविध शहरांपर्यंत जाणे सोयीचे होणार आहे. विशेषतः उत्तर भारतात जाणाऱ्या आणि तेथून महाराष्ट्रात परतणाऱ्या प्रवाशांना या अतिरिक्त रेल्वेगाड्यांचा लाभ घेता येणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुणे ते दरभंगा विशेष रेल्वे कधी धावणार आहे?

    Ans: गाडी क्रमांक 05534 हडपसर-दरभंगा विशेष रेल्वे 19 आणि 26 नोव्हेंबर 2026 रोजी धावणार आहे.

  • Que: दरभंगा ते पुणे विशेष रेल्वे कधी सुटणार आहे?

    Ans: गाडी क्रमांक 05533 दरभंगा-हडपसर विशेष रेल्वे 17 आणि 24 नोव्हेंबर 2026 रोजी दरभंगा येथून सायंकाळी 7.30 वाजता सुटणार आहे.

  • Que: या विशेष रेल्वेगाड्यांना जळगाव जिल्ह्यात कुठे थांबे आहेत?

    Ans: चाळीसगाव, पाचोरा आणि भुसावळ या तीन रेल्वेस्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

Web Title: Pune darbhanga special trains 2026 stops chalisgaon pachora bhusawal rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 04:17 PM

Topics:  

  • Jalgaon News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Post Office Savings Account Rules: पोस्ट ऑफिस खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी! एकापेक्षा जास्त खाती उघडण्याबाबत काय सांगतात नियम?
1

Post Office Savings Account Rules: पोस्ट ऑफिस खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी! एकापेक्षा जास्त खाती उघडण्याबाबत काय सांगतात नियम?

Nagpur News : बेसा-बेलतरोडीत खासदार बर्वे बेपत्ता लापता खासदार’चा फलक लावण्याच्या तयारीत नागरिक
2

Nagpur News : बेसा-बेलतरोडीत खासदार बर्वे बेपत्ता लापता खासदार’चा फलक लावण्याच्या तयारीत नागरिक

Raigad News: माथेरानमध्ये १६ नोव्हेंबरपासून पाणी कपात! आठवड्यातून ३ दिवस पाणी बंद, हॉटेल व्यावसायिकांसमोर नवे संकट
3

Raigad News: माथेरानमध्ये १६ नोव्हेंबरपासून पाणी कपात! आठवड्यातून ३ दिवस पाणी बंद, हॉटेल व्यावसायिकांसमोर नवे संकट

तारळेतील अदानी प्रकल्पावर सयाजी शिंदे आक्रमक; वृक्षतोड आणि वन्यजीवांच्या अधिवासाचा मुद्दा ऐरणीवर
4

तारळेतील अदानी प्रकल्पावर सयाजी शिंदे आक्रमक; वृक्षतोड आणि वन्यजीवांच्या अधिवासाचा मुद्दा ऐरणीवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.