Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: संगमनेरमध्ये रोज १० हजार किलो गोमांसाची विक्री? कत्तलखाने सर्रास सुरू? कारवाईचा दिखाऊपणा

संगमनेर शहरात खुलेआम कत्तलखाना सुरु आहे. या कत्तलखान्यातून दररोज अनेक जनावरांची कत्तल केली जातेय. अषाचार्याची बाब म्हणजे या कत्तलखान्यात तयार होणारे तब्बल १० हजार किलो गोमांस दररोज मुंबई व अन्य ठिकाणी पाठविले जात आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 11, 2026 | 09:13 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Follow Us:

संगमनेर शहर व परिसरात बेकायदेशीर कत्तलखाने खुलेआम सुरूच असून कत्तलखान्यातून दररोज अनेक जनावरांची कत्तल केली जात आहे. या कत्तलखान्यात तयार होणारे तब्बल १० हजार किलो गोमांस दररोज मुंबई व अन्य ठिकाणी पाठविले जात आहे. पोलिसांना याबाबत कल्पना असूनही ते कत्तलखान्यांवर कारवाई करत नाहीत. विशेष म्हणजे वरिष्ठ पोलिस अधिकारीही दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

गोमांस निर्मितीचे संगमनेर शहर हे राज्यातील प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते. शहरातील कोल्हेवाडी रोड, जोरवे रोड, जमजम कॉलनी या परिसरात अनेक वर्षांपासून खुलेआम बेकायदेशीर कत्तलखाने सुरू आहेत. राज्यात गोहत्या बंदी कायदा अस्तित्वात असतानाही संगमनेर शहरात मात्र या कायद्याचे खुलेआम उल्लंघन करून शेकडो जनावरांची कत्तल केली जात आहे.

Ahilyanagar News: राहुरीमध्ये पोटनिवडणुकीत उमेदवार देणे पवारांचे षडयंत्र! डॉ. सुजय विखे पाटील यांचा घणाघात

या कत्तलखान्यांवर अनेकदा कारवाया करूनही हे कत्तलखाने सुरूच असतात. हिंदुत्ववादी संघटनांनी या कत्तलखान्यांच्या विरोधात अनेकदा आवाज उठवला. मात्र तात्पुरती कारवाई करण्यात येते आणि त्यानतंर पोलिस या कत्तलखान्यांकडे दुर्लक्ष करतात. संगमनेर विधानसभा मतदारसंघात प्रदीर्घ काळानंतर परिवर्तन झाले. हिंदुत्ववादी विचारांचे आमदार या मतदारसंघातून निवडून आले. यामुळे शहरातील सर्व कत्तलखाने बंद होतील अशी अपेक्षा नागरिकांना होती. आमदार अमोल खताळ यांनी या कत्तलखान्यांबाबत विधानसभेत आवाजही उठवला होता. यानंतर हे कत्तलखाने काही दिवस बंद करण्यात आले. मात्र काही दिवसांनी हे कत्तलखाने पूर्ववत सुरू झाले आहेत.

कारवाई होऊ नये म्हणून कत्तलखानाचालक ‘तत्पर’

संगमनेर शहरातील जमजम कॉलनी परिसरातील गल्ली क्रमांक दहामध्ये गेल्या काही दिवसांपासून कत्तलखाना सुरू आहे. शहरातील दोन प्रमुख कत्तलखाना चालक हा कत्तलखाना चालवत आहे. कत्तलखान्यावर कारवाई होऊ नये हे दोघे तत्पर असतात. यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक मलिदा देण्याचे काम यांच्या माध्यमातून होत असल्याची व त्यामुळेच पोलीस या कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याची चर्चा उघड होत आहे.

विविध वाहनांतून गोमांसाची रवानगी

संगमनेर शहरातून तयार होणारे गोमांस दररोज मुंबई व इत्तर गावांमध्ये वेगवेगळ्या वाहनांमधून पाठवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून या कत्तलखान्यामधून दररोज तब्बल दहा हजार किलो गौमांस राज्यातील विविध शहरांमध्ये पाठवले जात आहे.

कुरण येथून केला जातो जनावरांचा पुरवठा

शहरातील या कत्तलखान्यामधून दररोज हजारो किलो गोमांस तयार होत असताना संगमनेर ग्रामीणमध्ये विविध घटना घडताना दिसतात. कत्तलखान्यांसाठी तालुक्यातील कुरण येथून मोठ्या प्रमाणावर जनावरांचा पुरवठा केला जातो. कुरण येथील काही व्यापारी जनावरांची खरेदी करून ही जनावरे कत्तलखान्यांना पुरवतात.

स्थानिक गुन्हे शाखेचे स्त्रोत कुठे गेले ?

  • मध्यंतरी अनेक प्रकरणात गुन्हे शाखा वादात सापडलेली आहे. संगमनेर येथील गोमांस प्रकरणात स्थानिक पोलिसांची भूमिका संशयास्पद असली तरी स्थानिक गुन्हे शाखा नेमके काय करते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
  • जिल्ह्यात इतरत्र जनावरांची सुटका या शाखेकडून होत असताना संगमनेरमधील गोवंशांच्या कत्तलची कोणतीच माहिती गुन्हे शाखेला का मिळू शकत नाही ?
  • गुन्हे शाखेच्या काही कर्मचाऱ्यांचे कारनामे विधानसभेत गाजले असल्याने संगमनेर प्रकरणातही गुन्हे शाखेच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे.

Web Title: Ahilyanagar news sangamner illegal slaughterhouse beef sale 10000 kg daily

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 09:13 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Sangamner

संबंधित बातम्या

Farmers News : शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; मका-तुरीची विक्रमी पेरणी, मात्र पावसाची दांडी ठरतेय चिंतेचे कारण!
1

Farmers News : शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; मका-तुरीची विक्रमी पेरणी, मात्र पावसाची दांडी ठरतेय चिंतेचे कारण!

AHILYANAGAR : विद्यार्थी आंदोलन दडपण्यासाठी सरकारकडून दडपशाही, किरण काळेंचा गंभीर आरोप
2

AHILYANAGAR : विद्यार्थी आंदोलन दडपण्यासाठी सरकारकडून दडपशाही, किरण काळेंचा गंभीर आरोप

Ahilyanagar News: श्रीरामपूरमध्ये शेतकरी संघटनेचा मोठा विजय; आंदोलनाचा खटला अखेर मागे
3

Ahilyanagar News: श्रीरामपूरमध्ये शेतकरी संघटनेचा मोठा विजय; आंदोलनाचा खटला अखेर मागे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.