Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोट्यवधी रुपये खर्चूनही शेवगाव वनपर्यटन प्रकल्प तहानलेलाच! 3 अधिकाऱ्यांची वेगवेगळी उत्तरे; निधीच्या वापरावर प्रश्नचिन्ह

Ahilyanagar News: अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव वनपर्यटन प्रकल्पावर कोट्यवधी रुपये खर्च झाल्याचे सांगितले जात असतानाही पाण्याची व्यवस्था नसल्याचा मुद्दा समोर आला आहे. प्रकल्पाच्या सद्यस्थितीबाबत तीन अधिकाऱ्यांनी परस्परविरोधी माहिती दिल्याने वनविभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 14, 2026 | 12:24 PM
कोट्यवधी रुपये खर्चूनही शेवगाव वनपर्यटन प्रकल्प तहानलेलाच! तीन अधिकाऱ्यांची वेगवेगळी उत्तरे; निधीच्या वापरावर प्रश्नचिन्ह

कोट्यवधी रुपये खर्चूनही शेवगाव वनपर्यटन प्रकल्प तहानलेलाच! तीन अधिकाऱ्यांची वेगवेगळी उत्तरे; निधीच्या वापरावर प्रश्नचिन्ह

Follow Us
Follow Us:
  • शेवगाव वनपर्यटनाचा भोंगळ कारभार!
  • कोट्यवधींचा चुराडा अन् पाण्याचा पत्ता नाही
  • एकाच प्रकल्पावर तिन्ही अधिकाऱ्यांचे परस्परविरोधी सूर चव्हाट्यावर!
शेवगाव , पोपट पिटेकर: शेवगाव तालुक्यात निसर्गप्रेमींसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून अत्यंत दिमाखात उभारलेले वनपर्यटन शेवगाव’ सध्या प्रशासकीय अनास्था, ढिसाळ नियोजन आणि पाण्याच्या भीषण टंचाईमुळे पूर्णपणे कागदावरच बंद पडले आहे. विशेष म्हणजे, दुष्काळी परिस्थितीचे रडगाणे गात हा प्रकल्प बंद ठेवण्यात आला असताना, खुद्द खात्यातील जबाबदार अधिकाऱ्यांनीच यावर अत्यंत बेजबाबदार आणि परस्परविरोधी विधाने केल्याने वन विभागाचा कारभार पूर्णपणे वेशीवर टांगला गेला आहे. एकीकडे पाणी नाही म्हणून उद्घाटनच झाले नाहीचा दावा करायचा, तर दुसरीकडे ‘सकाळी’ आणि ‘दिवसभर’ प्रकल्प सुरू असल्याचा धादांत खोटा बनाव रचायचा, असा थक्क करणारा पोरखेळ या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे! (Ahilyanagar News)

कोट्यवधींचा खर्च पाण्यात; पाण्याचा थेंब नाही अन् झाडे कोरडी ठाक!

शेवगावच्या जनतेला आणि निसर्गप्रेमींना दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी वनविभागाकडून करोडो रुपयांची उधळपट्टी करत हे वनपर्यटन केंद्र उभारण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात जमिनीवर उतरताना याचे नियोजन पूर्णपणे फोल ठरले. प्रकल्पातील विहिरीची भूजल पातळी खालावल्याने विहिरीचे पाणी पूर्णपणे आटले आहे. नगरपालिकेकडे टँकरसाठी किंवा पाण्यासाठी वारंवार प्रयत्न केले, परंतु शहरातच पाण्याचे तीव्र दुर्भिक्ष असल्यामुळे पालिकेनेही हात टेकले आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे माणसांना आणि जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी प्राधान्य द्यावे लागत असल्याने झाडांना पाणी देणे शक्य नाही, अशी हतबलता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे, नवीन बोरवेल मारली तरी तिथे पाणी लागण्याची शक्यता अत्यंत नगण्य असल्याचे त्यांचेच म्हणणे आहे. मग सवाल हा उपस्थित होतो की, पाण्याचा शाश्वत स्त्रोत माहिती नसताना करोडो रुपये खर्च करून हा प्रकल्प उभाच का केला?

Tuljabhavani Temple News : तुळजाभवानी मंदिरात पोलिसांची दादागिरी? सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण

तीन अधिकारी, तीन दिशा, अधिकाऱ्यांच्या विधानांमधील थक्क करणारी तफावत!

या संपूर्ण प्रकरणाची पोलखोल करण्यासाठी जेव्हा प्रसारमाध्यमांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, तेव्हा तीन वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या बोलण्यातून तीन परस्परविरोधी आणि हास्यास्पद दावे समोर आले. बाळकृष्ण बडे, वनरक्षक (पहिला अधिकारी सकाळी सुरू असतं) जबाबदारी झटकण्यासाठी एका अधिकाऱ्याने वनपर्यटन केंद्र सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत सुरू असते, असा अत्यंतस्याम बनाव रचला.

संदीप एकशिंगे,वनपाल (दुसरा अधिकारी दिवसभर सुरू असतं) दुसऱ्या अधिकाऱ्याने तर निर्लज्जपणाची हद्द पार करत थेट, नाही नाही, हे केंद्र दिवसभर सुरू असतं,” असे सांगत जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न केला. धर्मवीर साल विठ्ठल,विभागीय वन अधिकारी (तिसरा अधिकारी उद्घाटनच झाले नाही!) या दोन्ही अधिकाऱ्यांचे दावे खोडून काढत खुद्द विभागीय वन अधिकारी धर्मवीर साल विठ्ठल यांनी, याचं अजून ऑफिशियल इनॉगरेशनच झालेलं नाही. पाणी नसल्यामुळे काही झाडं लावायची राहिलेली आहेत,” अशी वस्तुस्थिती समोर आणली. एकाच खात्यातील जबाबदार अधिकाऱ्यांना आपला प्रकल्प नेमका सुरू आहे की बंद, याबद्दलही एकवाक्यी उत्तर देता येत नाही, यावरून हा विभाग किती मनमानी आणि ढिसाळ पद्धतीने चालवला जात आहे, हे उघड होते.

जनतेच्या पैशांची उधळपट्टी अन् शेवगावकरांचा संताप!

शासकीय निधीचा असा अमानुष चुराडा करून अधिकाऱ्यांनी केवळ कागदोपत्री प्रकल्प उभे केले आहेत आणि आता पत्रकारांसमोर परस्परविरोधी उत्तरे देऊन आपली पाठराखण करत आहेत. दुष्काळाचा बळीचा बकरा बनवून स्वतःच्या नियोजनशून्य कारभारावर पडदा टाकण्याचा हा प्रकार शेवगावची जनता अजिबात सहन करणार नाही.

“सार्वजनिक निधीची अशी उधळपट्टी करणाऱ्या आणि जनतेची दिशाभूल करण्यासाठी खोटारडी विधाने करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे! जर या प्रकल्पाची लवकरात लवकर दुरुस्ती करून पाण्याचा शाश्वत स्त्रोत उभा केला नाही आणि दोषी अधिकाऱ्यांवर कडक प्रशासकीय कारवाई झाली नाही, तर शेवगावच्या आक्रमक जनतेच्या वतीने वन विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा सज्जड दम शेवगावकरांनी दिलाय.

Ahilyanagar Drought: अहिल्यानगरमध्ये दुष्काळाचे भीषण संकट; पिके जळाली, जनावरे विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: शेगावात पाणीटंचाईची समस्या का निर्माण झाली आहे?

    Ans: अपुरा पाऊस, भूजल पातळीत घट, पाणीपुरवठ्याचे अपुरे नियोजन आणि वाढती पाण्याची मागणी ही पाणीटंचाईची संभाव्य कारणे असू शकतात.

  • Que: शेगावातील पाणीटंचाईचा नागरिकांवर काय परिणाम होत आहे?

    Ans: पाणीपुरवठा अपुरा असल्यास नागरिकांना पिण्याचे पाणी, घरगुती वापर आणि दैनंदिन गरजांसाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

  • Que: शेगावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत?

    Ans: नियमित पाणीपुरवठा, जलस्रोतांचे संवर्धन, पाणीगळती रोखणे, आवश्यकतेनुसार टँकरची व्यवस्था आणि दीर्घकालीन जलव्यवस्थापन आवश्यक आहे.

Web Title: Shevgaon forest tourism project controversy crores spent water shortage conflicting statements by officials sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 12:23 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Shevgaon
  • tourism

संबंधित बातम्या

जगातील सर्वात बेस्ट देशांची यादी आली समोर, पहिल्या स्थानावर ग्रीस तर भारताचा कितवा क्रमांक?
1

जगातील सर्वात बेस्ट देशांची यादी आली समोर, पहिल्या स्थानावर ग्रीस तर भारताचा कितवा क्रमांक?

Tuljabhavani Temple News : तुळजाभवानी मंदिरात पोलिसांची दादागिरी? सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण
2

Tuljabhavani Temple News : तुळजाभवानी मंदिरात पोलिसांची दादागिरी? सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण

Solo Trip : एकट्याने इंटरनॅशनल प्रवास करायचाय? आशियातील हे 3 देश ठरतील स्वस्त आणि सुरक्षित
3

Solo Trip : एकट्याने इंटरनॅशनल प्रवास करायचाय? आशियातील हे 3 देश ठरतील स्वस्त आणि सुरक्षित

Gujrat : गिरनंतर बरडा जंगल बनले आशियाई सिंहांचे नवे आश्रयस्थान; १७ सिंहांचा अधिवास
4

Gujrat : गिरनंतर बरडा जंगल बनले आशियाई सिंहांचे नवे आश्रयस्थान; १७ सिंहांचा अधिवास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.