Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: संगमनेर तालुक्यातील स्वयंघोषित महाराजविरोधात अंनिस आक्रमक, जिल्हाधिकारी आणि पोलिसांकडे तक्रार

संगमनेर तालुक्यातील वडगावपान (दत्तधाम) येथील एका स्वयंघोषित 'गडगे महाराज' विरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 12, 2026 | 08:45 PM
संगमनेर तालुक्यातील स्वयंघोषित महाराजविरोधात अंनिस आक्रमक

संगमनेर तालुक्यातील स्वयंघोषित महाराजविरोधात अंनिस आक्रमक

Follow Us
Follow Us:

संगमनेर अध्यात्म आणि दैवी शक्तीच्या नावाखाली सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबांचे पेव फुटले असतानाच, आता संगमनेर तालुक्यातील वडगावपान (दत्तधाम) येथील एका स्वयंघोषित ‘गडगे महाराज’ विरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने (अनिस) आक्रमक पवित्रा घेतला आहे. या भोंदूबाबाकडून लोकांचे आर्थिक आणि मानसिक शोषण होत असून, त्याच्यावर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. या संदर्भात समितीतर्फे जिल्हाधिकारी व संगमनेर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

पोलिसांना दिलेल्या निवेदनात बरेच गंभीर आरोप करण्यात आले असल्यामुळे प्रशासन काय कारवाई करते, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. वडगावपान येथे ‘दत्तधाम सरकार’ या नावाने एक आश्रम चालवला जातो. यात स्वतःला गडगे महाराज म्हणवून घेणारा एक व्यक्ती वास्तव्यास आहे. या बाबाकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना तो आजार बरे करण्याचे दावे करतो. लोकांवर फसवे उपचार करतो, असा आरोप अंनिसच्या ॲड. रंजना गवांदे, अशोक गवांदे, प्रशांत पानसरे आणि अमोल खरात यांनी निवेदनात केला आहे. आश्रमात मोठ्या प्रमाणावर स्त्री-पुरुषांची वर्दळ असते आणि अनेकांचा तेथे मुक्काम असतो. अंनिसच्या मते अध्यात्माच्या नावाखाली बाबा येणाऱ्या भक्तांकडून मोठी रक्कम उकळतो.

Ahilyanagar News: हक्काच्या जमिनीसाठी लढा! शेतकरी संसारासह पोलिस ठाण्यात दाखल, प्रशासनाची उडाली दाणादाण

या बाबाने परिसरात आपली दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे फसवणूक झालेले शेकडो लोक तोंडी तक्रार करत असले तरी, भीतीपोटी कोणीही लेखी तक्रार देण्यास पुढे येत नाहीत. कोणताही वैद्यकीय आधार नसताना लोकांना औषधोपचार देऊन त्यांच्या जिवाशी खेळले जात आहे.

‘दत्तधाम सरकार’ ही दुसरी ‘खरात फाईल’

‘दतधाम सरकार’ ही दुसरी ‘खरात फाईल’ होवू नये, यासाठी अनिसने महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानवीय, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा विरोधी कायदा, ड्रग्ज ॲड मॅजिक रेमेडीज ॲक्ट (जादूटोणा सदृश औषधोपचार प्रतिबंधक कायदा), महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम (बोगस डॉक्टर्स ॲक्ट) गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, तक्रारीनंतर संगमनेर पोलीस प्रशासन या ‘भोदू बाबा’वर काय कारवाई करते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जनप्रबोधनासाठी जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रभावी अमलबजावणीसाठी प्रशासनाला सहकार्य आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली; मदत आणि उपचाराला मिळणार गती

संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील गडगे महाराज (दत्तधाम सरकार) – यांच्यावरील भोंदूगिरी संदर्भाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे निवेदन प्राप्त झाले आहे. त्या अनुषंगाने शहानिशा करून पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती संगमनेरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांनी दिली.

गडगे महाराज काय म्हणाले?

66 दत्तधाम सरकारमध्ये काय चालते, हे येऊन पाहिले पाहिजे, आपल्याकडे प्रार्थना, संकल्प, ध्यानसाधना चालते. दत्त दिगंबर सेवाभावी संस्था आहे. संस्थेमध्ये तीन डॉक्टर आहेत. औषधी देण्यासाठी डॉक्टर असतात. ध्यानसाधना घेणे, मनातील नकारात्मकता ध्यान साधनेद्वारे बाहेर काढणे, हे माझे काम आहे. देव आपल्या हृदयात आहे, ही शिकवण आपल्याकडे आहे.

Web Title: Ahilyanagar news sangamner self styled godman dattadham anis complaint police action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 08:45 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Sangamner

संबंधित बातम्या

Farmers News : शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; मका-तुरीची विक्रमी पेरणी, मात्र पावसाची दांडी ठरतेय चिंतेचे कारण!
1

Farmers News : शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; मका-तुरीची विक्रमी पेरणी, मात्र पावसाची दांडी ठरतेय चिंतेचे कारण!

AHILYANAGAR : विद्यार्थी आंदोलन दडपण्यासाठी सरकारकडून दडपशाही, किरण काळेंचा गंभीर आरोप
2

AHILYANAGAR : विद्यार्थी आंदोलन दडपण्यासाठी सरकारकडून दडपशाही, किरण काळेंचा गंभीर आरोप

Ahilyanagar News: श्रीरामपूरमध्ये शेतकरी संघटनेचा मोठा विजय; आंदोलनाचा खटला अखेर मागे
3

Ahilyanagar News: श्रीरामपूरमध्ये शेतकरी संघटनेचा मोठा विजय; आंदोलनाचा खटला अखेर मागे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.