Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI Video: धक्कादायक! आभासी दुनियेचा विळखा घट्ट; ‘AI’च्या भुलभुलैय्यात चिमुकल्यांची दिशाभूल

AI Video च्या वाढत्या प्रभावामुळे लहान मुलांसमोर नवी चिंता निर्माण झाली आहे. एआय निर्मित आणि खरे व्हिडीओ ओळखणे कठीण होत असून, पालकांनी कोणती काळजी घ्यावी जाणून घ्या.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 21, 2026 | 01:59 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

AI Video:  मोहोळ, (वा.) डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत असून, त्याचे काही दुष्परिणामही समोर येत आहेत. विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’च्या माध्यमातून तयार होणाऱ्या व्हिडीओंचा वाढता प्रभाव लहान मुलांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. एआय निर्मित आणि प्रत्यक्ष चित्रित केलेल्या व्हिडीओंमधील फरक ओळखणं मुलांना कठीण जात असल्याने आभासी जगाचा त्यांच्या मानसिकता, वर्तन आणि सुरक्षिततेवर परिणाम होत असल्याचं चित्र शहरासह ग्रामीण भागात दिसून येत आहे.

आकर्षक एआय व्हिडीओंची चिमुकल्यांना भुरळ

एआय व्हिडीओंमध्ये अतिरंजित आणि आकर्षक प्रसंग दाखवले जातात. हे व्हिडीओ मुलांना सहज भुरळ घालतात. त्यामुळे काही मुले अशा आभासी सामग्रीच्या आहारी जाण्याची शक्यता वाढत आहे. प्रत्यक्ष जगापेक्षा एआयच्या माध्यमातून तयार केलेले व्हिडीओ अधिक आकर्षक वाटू लागल्याने पालकांची चिंता वाढली आहे.

काही मुले एआय व्हिडीओंमधील प्रसंग खरे समजून त्यांचं प्रत्यक्ष जीवनात अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अशा सामग्रीचा मुलांच्या वर्तनावर आणि सुरक्षिततेवरही परिणाम होऊ शकतो.

AI Videos इतके Real दिसतात… मग ओळखायचं कसं? – Navarashtra

खरे की एआय निर्मित? ओळखणे झाले कठीण

एआयच्या माध्यमातून तयार केलेल्या व्हिडीओंमध्ये वास्तवाशी कोणताही संबंध नसलेली दृश्ये, व्यक्ती किंवा घटना अत्यंत हुबेहूब पद्धतीने दाखवता येतात. त्यामुळे मुलांनी सोशल मीडियावरील कोणताही व्हिडीओ पाहून त्यावर तातडीने विश्वास ठेवू नये, यासाठी त्यांना डिजिटल साक्षरतेचं प्रशिक्षण देणं आवश्यक आहे.

व्हिडीओ खरा आहे की एआय निर्मित, याबाबत शंका असल्यास पालक किंवा जाणकार व्यक्तींची मदत घेण्याची सवय मुलांना लावणे गरजेचे आहे.

AI Hulk Video: व्हिडीओ बनवा आणि पैसे कमवा! व्हायरल हल्क कंटेंटचा …

‘एआयचा वापर मर्यादित आणि सुरक्षित पद्धतीने करा’

“एआय तंत्रज्ञान उपयुक्त आहे; मात्र त्याचा वापर मर्यादित आणि सुरक्षित पद्धतीने करणे गरजेचे आहे. मुलांनी तंत्रज्ञानाचा उपयोग ज्ञान मिळविण्यासाठी करावा; मात्र स्वतःची बुद्धी आणि सर्जनशीलता एआयच्या हवाली करू नये. पालकांनी योग्य देखरेख ठेवून मुलांना वास्तवाचे भान देणे ही काळाची गरज आहे,” असं मत अॅड. गणेश मोरे-कुरणवाडीकर यांनी व्यक्त केलं.

पालकांनी काय काळजी घ्यावी?

एआय निर्मित व्हिडीओ पाहताना मुलांशी संवाद साधणं आवश्यक आहे. सोशल मीडियावरील प्रत्येक व्हिडीओ सत्य किंवा प्रत्यक्ष घटनेवर आधारित नसतो, हे पालकांनी मुलांना समजावून सांगावं.

मुलांच्या मोबाईल वापरावर लक्ष ठेवण्यासोबतच त्यांना मैदानी खेळ, वाचन आणि प्रत्यक्ष सामाजिक संवादासाठी वेळ देणं गरजेचं आहे. संशयास्पद किंवा अतिरंजित सामग्री दिसल्यास ती पुढे शेअर न करता तिची सत्यता तपासण्याची सवय मुलांना लावावी.

व्हिडीओतील कृतींचं अनुकरण धोकादायक

एआय व्हिडीओंमधील अनेक कृती प्रत्यक्षात शक्य नसतात किंवा त्यामध्ये धोका असू शकतो. मात्र, या कृतींचे परिणाम लक्षात न आल्याने काही मुले त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

एआय सामग्रीचा अतिवापर मुलांच्या नैसर्गिक विकासावरही परिणाम करू शकतो. त्यामुळे पालकांनी मुलांच्या स्क्रीन टाइमवर लक्ष ठेवणं, त्यांच्या वयाला अनुरूप सामग्री निवडणं आणि वास्तव व आभासी जगातील फरक समजावून सांगणं आवश्यक आहे.

Web Title: Ai video generated content impact on children digital safety

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 01:59 PM

Topics:  

  • ai
  • Solapur News
  • Student

संबंधित बातम्या

IIT Bombay : टेक प्रोफेशनल्ससाठी खूशखबर! IIT बॉम्बेकडून ‘हा’ नवीन डिप्लोमा कोर्स सुरू..
1

IIT Bombay : टेक प्रोफेशनल्ससाठी खूशखबर! IIT बॉम्बेकडून ‘हा’ नवीन डिप्लोमा कोर्स सुरू..

मनोहर भोसले प्रकरणाचा एसआयटी तपास वेगाने, २४ सहआरोपी निष्पन्न; तिघांना २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
2

मनोहर भोसले प्रकरणाचा एसआयटी तपास वेगाने, २४ सहआरोपी निष्पन्न; तिघांना २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

AI Proof Courses: एआयमुळे नोकरी जाण्याची भीती वाटतेय? मग हे ५ कोर्सेस बदलतील तुमचे करिअर!
3

AI Proof Courses: एआयमुळे नोकरी जाण्याची भीती वाटतेय? मग हे ५ कोर्सेस बदलतील तुमचे करिअर!

राज्यात एमसीएच्या दुसऱ्या यादीत ७ हजार ४०७ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी; ६,३२७ जणांना पसंतीचे कॉलेज
4

राज्यात एमसीएच्या दुसऱ्या यादीत ७ हजार ४०७ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी; ६,३२७ जणांना पसंतीचे कॉलेज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.