
Drought Affected Students : दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! परीक्षा अर्जासाठी 'झिरो चलन' सुविधा; 2.40 लाख विद्यार्थ्यां
दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना (Drought Affected Students) आर्थिक दिलासा देण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने परीक्षा शुल्कमाफीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, आतापर्यंत तब्बल 2 लाख 40 हजार 365 विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्काचा एकही रुपया न भरता ‘झिरो चलन’ सुविधेद्वारे परीक्षा अर्ज दाखल केले आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे शिक्षणात अडथळे येऊ नयेत, या उद्देशाने विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारू नये, असा शासनाने निर्णय घेतला आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी सुरळीतपणे व्हावी आणि पात्र विद्यार्थ्यांना सवलतीचा लाभ मिळावा, यासाठी संचालनालय, विद्यापीठे आणि परीक्षा विभागाच्या स्तरावर आवश्यक यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. या प्रक्रियेचा विभागाकडून सातत्याने आढावा घेतला जात आहे.
Satara MLC Election मध्ये शिक्षक मतदारांची बाजी! ८९.३९ टक्के मतदान, पदवीधरांचा आकडा किती?
परीक्षा अर्ज भरताना विद्यार्थ्यांना शुल्क भरावे लागू नये, यासाठी अर्ज प्रक्रियेत ‘झिरो चलन’ हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांना कोणतेही परीक्षा शुल्क न भरता परीक्षा अर्ज दाखल करता येत आहेत. तसेच, सर्व विद्यापीठांनी परीक्षा शुल्कमाफीच्या अंमलबजावणीसंदर्भात परिपत्रके जारी केली आहेत.
दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी परीक्षा शुल्क भरले आहे, त्यांना भरलेले शुल्क परत करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. दुष्काळग्रस्त भागातील कोणताही पात्र विद्यार्थी परीक्षा शुल्कमाफीच्या लाभापासून वंचित राहू नये, तसेच विद्यार्थ्यांना या सवलतीचा लाभ घेताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व विद्यापीठांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीसंदर्भात शैक्षणिक अडचण असल्यास संबंधित विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळ किंवा जनसंपर्क अधिकारी ,विद्यार्थी विकास विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन उच्च व इतर तंत्र शिक्षण विभागाने केले आहे.
Navarashtra Impact: ‘नवराष्ट्र’च्या बातमीचा दणका; स्मार्ट बाजारवर एफडीएची धडक!
मुंबई विद्यापीठ, मुंबई – परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. पूजा रौंदळे (९३२२०२०५८९), जनसंपर्क अधिकारी लीलाधर बनसोड (९८३३९६९९७७).
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे – परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. राजेंद्र तलवारे (९८९०६४२४३१), विद्यार्थी विकास संचालक डॉ. सविता कुलकर्णी (७७२००३६७७४), तसेच अजय ठुबे (७५८८१६९१३४).
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंग एन. जाधव (९५४५५९५९९९), विद्यार्थी विकास संचालक अलोक जत्राटकर (८६९८९२८०८०).
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर – परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अंधारे (९९७५०५५१५५), विद्यार्थी विकास संचालक डॉ. काळवणे (७०२०६३४५०२).
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड – परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हुशारसिंग साबळे (९९२३४०९४९१), विद्यार्थी विकास संचालक डॉ. चिखलीकर (८३९०६६६७७७).
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर – परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. बाबासाहेब डोळे (८२३७००६५७२), विद्यार्थी विकास संचालक डॉ. कैलास अंभोरे (९४२३७०५०८१).
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव – परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील (९४२३१८५०७३), विद्यार्थी विकास संचालक महाले (९८२३१९२८३१).
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती – परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी (९८५००४२३५७), विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर (८८५५०८३९६४).
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर – परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अनुप पळसोकर (८३७८९७४२४०), विद्यार्थी विकास संचालक डॉ. विजय तांगडे (९५४५११२५५५).
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली – परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नवीन मंगुळे (९५११९१०५७५), विद्यार्थी विकास संचालक डॉ. प्रिया गेडाम (९०४९४७४११९).
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई – परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक संजय नेरकर (९९२२४४४४६७), विद्यार्थी विकास संचालक डॉ. अंकुश चव्हाण (९६८९६७२५०९).
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक – परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. भटूप्रसाद पाटील (७७९८९२५४८५), विद्यार्थी विकास संचालक महेंद्र बनसोडे (९७६६०५९०७६).
Ans: दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क न भरता अर्ज दाखल करण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Ans: उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माहितीनुसार, आतापर्यंत 2 लाख 40 हजार 365 विद्यार्थ्यांनी या सुविधेद्वारे परीक्षा अर्ज दाखल केले आहेत.
Ans: होय. यापूर्वी परीक्षा शुल्क भरलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शुल्क परत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.