Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार; अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं

विधानसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यावर आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Mar 17, 2025 | 04:50 PM
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार; अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं

मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार; अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं

Follow Us
Close
Follow Us:

विधानसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यावर आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. या योजनेत काही बदल करणार असल्याचे संकेत अजित पवारांनी दिले आहेत. ‘आम्ही या योजनेत काही दुरूस्ती करणार आहोत, पण योजना बंद करणार नाही’, तसंच लाडकी बहीण योजनेतून ज्यांची नावे वगळण्यात आली आहेत, त्यांच्याकडून पैसे घेतले जाणार नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

अजित पवार पुढे म्हणाले की, ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अर्थव्यवस्थेला चालना देणारी ठरली. लाडकी बहीण योजनेचा वेगळा अर्थ मला सभागृहाला सांगायचा आहे. वित्तमंत्री म्हणून मी जेव्हा या योजनेकडे पाहतो, त्यावेळी या योजनेमधून राज्याच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात काय मिळणार आहे, याचाही विचार करतो’. ‘१५०० रुपयांची थेट रोख रक्कम भगिनींना मिळते. महिला सक्षमीकरणाचं एक मोठ पाऊल सरकारने उचललं आहे. विधान परिषदेत गटनेते प्रविण दरेकर यांनी परवाच एक घोषणा केली होती, ती घोषणा माझ्या वाचनात आली आहे. लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना मुंबई बँक १० ते २५ हजारापर्यंत कर्ज देणार आहे’.

‘राज्यात महिला आर्थिक विकास महामंडळासारखी संस्था आहे. जिल्हा सहकारी बँका आहेत. तसेच सहकारी बँकाही आहेत. ज्या महिलांना व्यवसाय सुरू करायचा आहे. त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना जोडून कर्ज योजना तुम्ही काढा. म्हणजे, ही योजना केवळ मदतीची राहणार नाही तर, त्यामधून महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आपण आणखी एक पाऊल पुढे टाकू’, असं अजित पवार म्हणालेत. ‘कारण सुमारे ४५ हजार कोटी वर्षाला महिलांच्या हातात जाणार आहेत. या माध्यमातून बहीण सक्षम होऊन तिच्या कुटुंबालाही हातभार लावेल, हा पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला छोटं, मोठं योगदान मिळेल’, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

लाडक्या बहिण संदर्भात आम्हाला आपुलकी आहे. पण, काहींची गांडूळासाखी अवस्था आहे, ते कोणत्या तोंडाने चालतं हे कळत नाही. ⁠पाच वर्षाचा वचननामा असतो, ⁠तो आम्ही देणार आहोत. ⁠तुम्ही तर कोर्टात गेले होते, ⁠तुम्ही तर चुनावी जुमला म्हणाले. ⁠आम्ही दोन शासन निर्णय काढले. लाडक्या बहिणींचे वय 60 ऐवजी 65 केले. ⁠घाईगडबडीत काही भगिनींची अर्थिक परिस्थिती चांगली आहे, ⁠पंतप्रधान यांनी ही गॅस संदर्भात आवाहन केल्यानंतर लोकांनी परत केले होते, असे उदाहरण अजित पवारांनी दिले. तसेच, लाडकी बहीण या योजनेत आम्ही दुरुस्ती करणार मात्र बंद करणार नाही, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.

Web Title: Ajit pawar comment on modifications in ladki bahin yojana in vidhan sabha budget session marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2025 | 04:35 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Budget Session
  • Ladki Bahin Yojana

संबंधित बातम्या

इच्छाशक्तीच्या अभावामुळेच शहराची अवस्था बिकट; पुण्यातून अजित पवारांची नाराजी व्यक्त
1

इच्छाशक्तीच्या अभावामुळेच शहराची अवस्था बिकट; पुण्यातून अजित पवारांची नाराजी व्यक्त

Maharashtra Politics: भाजप-अजित पवारांमध्ये वाद भडकणार? ‘पैलवानाच्या नादाला…’; विषय काय?
2

Maharashtra Politics: भाजप-अजित पवारांमध्ये वाद भडकणार? ‘पैलवानाच्या नादाला…’; विषय काय?

Ladki Bahin Yojana : धक्कादायक! ‘लाडक्या बहिणीं’चे संकेतस्थळ बंद, ग्रामीण भागात अडचणी
3

Ladki Bahin Yojana : धक्कादायक! ‘लाडक्या बहिणीं’चे संकेतस्थळ बंद, ग्रामीण भागात अडचणी

मनभेद होणार नाहीत याची काळजी घ्या…! अजित पवारांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर बावनकुळेंची नाराजी
4

मनभेद होणार नाहीत याची काळजी घ्या…! अजित पवारांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर बावनकुळेंची नाराजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.