
Ajit Pawar Death: पहाटेचा शपथविधी ते पक्षफूट... अजित पवारांच्या आयुष्यातील 5 निर्णायक क्षण
1982 साली अजित पवार यांनी राजकारणात एंट्री केली. त्यानंतर त्यांनी बारामतीतून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून येत स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण केली. हा त्यांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा टप्पा ठरला. कारण इथूनच त्यांचा राजकीय प्रवास सुरु केला. यानंतर अजित पवार यांनी अनेक निवडणुका लढवल्या. मात्र 1991 मध्ये लढलेली पहिली निवडणूक त्यांच्या आयुष्याला कलाटणी देऊन गेली. (फोटो सौजन्य – Pinterest)
आम्ही बोलत नाही, करून दाखवतो, असं म्हणतं अजित पवार यांनी बारामतीकरांची आणि संपूर्ण महाराष्ट्राची मनं जिंकली. सिंचन, जलसंपदा आणि सहकार क्षेत्रात अजित पवार यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. याच निर्णयांमुळेच राजकारणात त्यांची पकड आणखी मजबूत झाली. राज्याच्या जलसंपदा, सिंचन आणि सहकार क्षेत्रात बजावलेल्या निर्णायक भूमिकांमुळे महराष्ट्रातील राजकारणात अजित पवार यांचा दबदबा वाढला.
बारामतीकरांचा आमदार म्हणून राजकारणात एंट्री केलेले अजित दादा 2010 मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आणि सत्ताकेंद्रात आले. अजित पवार यांची रोखठोक उत्तर देण्याची पद्धत, थेट निर्णय घेण्याची क्षमता आणि प्रशासनावर पकड यामुळे ते राज्य पातळीवर ‘पॉवर सेंटर’ ठरले.
2019 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. पहाटेचा शपथविधी अजित पवार यांच्या राजकीय आयुष्यातील सर्वात चर्चेचा आणि वादग्रस्त टप्पा ठरला. 23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे सुमारे 5:47 वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची राजभवनात शपथ घेतली. त्यांची सत्ता अवघ्या 80 तासांत कोसळली.
2023 मध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये फूट पडली. यानंतर अजित पवार यांनी वेगळा राजकीय मार्ग स्वीकारला. काका आणि पुतण्या यांच्यामध्ये पडलेल्या फूटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक ऐतिहासिक वळण आले.