Ajit Pawar Plane Crash: एकाच पक्षातून राजकीय प्रवासाला सुरुवात... नंतर पडली फूट, असं होतं काका- पुतण्याचं नातं!
Breaking: बारामतीत अजित पवारांच्या विमानाला मोठा अपघात, लँडिंगदरम्यान जमिनीवर कोसळले विमान
महाराष्ट्राचे लाडके काका – पुतणे अशी शरद पवार आणि अजित पवार यांची ओळख होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अजित पवार यांनी त्यांचे काका म्हणजेच शरद पवार यांच्यासोबत राजकीय प्रवास सुरु केला. राजकीयदृष्ट्या दोघेही अनेक वर्षे एकाच कुटुंबातून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून पुढे आले. काका आणि पुतण्या यांच्या भाषणाला नेहमीच लोकांची गर्दी होती. मात्र 2023 मध्ये असं काही झालं की या लाडत्या काका – पुतण्यामध्ये दुरावा निर्माण झाला. (फोटो सौजन्य – Pinterest)
राजकारणात मतभेद आणि सत्ता संघर्षामुळे 2023 चे वर्ष पवार कुटूंबियांसाठी अत्यंत धक्कादायक ठरले होते. कारण यावर्षी काका – पुतण्यामध्ये फूट पडली. दोघांनी वेगळ्या राजकीय वाटेवर चालण्याचे ठरवले. राजकारणात मतभेद आणि सत्ता संघर्षामुळे 2023 नंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला. अजित पवारांनी वेगळा राजकीय मार्ग स्वीकारला आणि पक्षांच्या काही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी वेगळा मार्ग निवडला. खरं तर नेहमीच एकत्र दिसणाऱ्या काका – पुतण्यामध्ये फूट कशी पडली, त्यांच्यामध्ये दुरावा का आणि कसा निर्माण झाला असा प्रश्न नेहमीच अनेकांच्या मनात होता. याबाबात थोडक्यात जाणून घेऊ.
Ajit Pawar Plane Crash : अजित पवार यांचा अपघाती दुर्दैवी मृत्यू; दिवसभरात चार सभा होत्या नियोजित
शरद पवार गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते होते. मात्र अजित पवार यांची अशी इच्छा होती की, नव्या पिढीला संधी मिळणं गरजेचं आहे, यासाठी त्यांनी अनेकवेळा प्रयत्न देखील केले होते. यानंतर मतभेद सुरु झाला आणि सत्तेची अस्वस्थता निर्माण झाला. 2019 नंतर राष्ट्रवादी काँग्रेसला वारंवार सत्ता मिळाली होती, मात्र तरी देखील अजित पवारांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही. याचीच नाराजी त्यांच्या मनात होती. याच नाराजीमुळे अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. 2023 मध्ये अजित पवार यांनी भाजप–शिंदे गटासोबत सरकारमध्ये प्रवेश केला. हा निर्णय शरद पवारांसाठी मोठा धक्का ठरला. याच पद्धतीने महाराष्ट्राचे लाडके काका – पुतणे यांच्यामध्ये फूट पडली.






