
Ajit Pawar plane Crash Video
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये विमान कोसळताना स्पष्टपणे दिसत आहे. विमानाचा स्फोट होऊन ते आगीच्या गोळ्यात रुपांतरित झाले आणि जमिनीवर कोसळले आहे. विमान जमिनीवर आदळताच आगीत रुपांतरित झाले आणि आकाशा आगीच्या ज्वाळा, काळा धूर उडू लागल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. विमानाचे दोन तुकडे झाले आहे. मृतहेद पूर्णपणे जळालेले आहेत.
या विमानात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विदीप जाधव, पिंकी माळी, कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, पिंकी माळी, फ्लाईट अटेंडंट होते. या सर्वांचा भयावह अपघातात दुर्दैवी अंत झाला आहे. सध्या अजित पवार यांचा मृतदेह बारामतीच्या रुग्णालयामध्ये ठेवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. लवकरच जेष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार सुनेत्रा पवार बारामतीला पोहोचतील.
Sanjay Gandhi : संजय गांधीचाही झाला होता विमान अपघातात दु:खद अंत; नेमकं काय घडलं ‘त्या’ दिवशी?
VIDEO | CCTV footage shows the crash of Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar’s chartered aircraft at Baramati Airport. (Source: Third Party) pic.twitter.com/3yNoX6PGOI — Press Trust of India (@PTI_News) January 28, 2026
अजित पवारांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शासकीय सुट्टी जाहीर केली असून तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. पण भारतीय राजकारण्याच्या विमान अपघातात दुर्दैवी अंताची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २०२५ मध्ये जून महिन्यात गुजरातचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू झाला होता. तसेच भारताच्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मुलाचा संजय गांधी (Sanjay Ganadhi)यांचाही विमान अपघातात मृत्यू झाला होता. याशिवायही अनेक नेते आहे ज्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे.