Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar: ‘या’ रेल्वेमार्गाच्या उर्वरित भूसंपादन प्रक्रियेला गती द्यावी; अजित पवारांचे निर्देश

पुणे येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारशी समन्वय ठेऊन प्रयत्न करावेत, असे निर्देशही त्यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 22, 2025 | 09:28 PM
Ajit Pawar: 'या' रेल्वेमार्गाच्या उर्वरित भूसंपादन प्रक्रियेला गती द्यावी; अजित पवारांचे निर्देश

Ajit Pawar: 'या' रेल्वेमार्गाच्या उर्वरित भूसंपादन प्रक्रियेला गती द्यावी; अजित पवारांचे निर्देश

Follow Us
Close
Follow Us:

रेल्वेमार्गासाठी उर्वरित भूसंपादन प्रक्रियेला गती द्यावी
बीड ते परळी रेल्वेमार्ग लवकरच सुरू होणार
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश

मुंबई: मराठवाड्याच्या सामाजिक, आर्थिक विकासाला गती देण्यासाठी बीड ते परळी रेल्वेमार्ग लवकरात लवकर सुरु करण्याची गरज आहे. हा रेल्वे मार्ग झाल्यानंतर परळी ते थेट अहिल्यानगरपर्यंत प्रवास करता येणार आहे. त्यामुळे या मार्गासाठी उर्वरित भूसंपादन प्रक्रियेला गती द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रेल्वे आणि संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

पुणे येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारशी समन्वय ठेऊन प्रयत्न करावेत, असे निर्देशही त्यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. यावेळी पुणे मेट्रो लाईन-3 शिवाजी नगर ते हिंजवडी या प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण करावे. प्रकल्पाचे काम दर्जेदार झाले पाहिजे, अशी सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. सणासुदीचे दिवस असल्याने मेट्रो प्रकल्पांचे काम करीत असताना पुलांखाली वाहतुक कोंडी होऊ नये याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले. कर्जत-भिमाशंकर-खेड-शिरुर हा नवीन महामार्ग करण्यासंदर्भात त्यांनी आढावा घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

Beed Ahilyanagar Railway : 16 रेल्वे स्थानके अन् 261 किमीचा मार्ग, आजपासून बीड ते अहिल्यानगर रेल्वे सेवेचा शुभारंभ

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात ‘उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षा’ची बैठक झाली. या बैठकीस मुख्य सचिव राजेश कुमार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जैसवाल, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमार, राज्यकर आयुक्त आशिष शर्मा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आबासाहेब नागरगोजे, वैद्यकीय शिक्षण आयुक्त अनिल भंडारी उपस्थित होते.

धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळामध्ये होणार रिएन्ट्री? राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे स्पष्टच बोलले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी वढू व तुळापूर येथील स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक, पुणे येथील वीर वस्ताद लहूजी साळवे स्मारक, लोणावळा येथील नियोजित स्काय वॉक, टायगर पॉईंट, ‘सारथी’ संस्थेच्या नाशिक, कोल्हापूर, नागपूर, खारघर, संभाजीनगर, अमरावतीच्या विभागीय उपकेंद्रांचे बांधकाम, सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालय, सातारा सैनिक स्कूल, वडाळा येथील जीएसटी भवन, रेडिओ क्लब मुंबई, रत्नागिरीचे मिरकरवाडा बंदर, कृषी भवन, कामगार कल्याण भवन, सहकार भवन, पुरंदर विमानतळ, ऑलंम्पिक भवन व संग्रहालय, पुणे, परळी आणि बारामती शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय आदी प्रकल्पांच्या प्रगतीचा देखील आढावा घेतला.

Web Title: Ajit pawar direction to officers remaining land acquisition process for the beed parli railway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2025 | 09:27 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Beed News
  • Indian Railway

संबंधित बातम्या

धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळामध्ये होणार रिएन्ट्री? राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे स्पष्टच बोलले
1

धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळामध्ये होणार रिएन्ट्री? राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे स्पष्टच बोलले

वाहतुक कोंडी कायमची सुटणार? मेट्रो विस्तारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून बैठक
2

वाहतुक कोंडी कायमची सुटणार? मेट्रो विस्तारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून बैठक

रेल्वेने मिनरल वॉटरच्या किमती केल्या कमी, रेल नीरच्या पाण्याची बॉटल आता ‘इतक्या’ रुपयात उपलब्ध
3

रेल्वेने मिनरल वॉटरच्या किमती केल्या कमी, रेल नीरच्या पाण्याची बॉटल आता ‘इतक्या’ रुपयात उपलब्ध

तितागढ रेल सिस्टीम्सचा वेगवान प्रवास! शेअर्स सतत वाढीच्या मार्गावर, दीर्घकालीन उद्दिष्ट साध्य होण्याची चिन्हे
4

तितागढ रेल सिस्टीम्सचा वेगवान प्रवास! शेअर्स सतत वाढीच्या मार्गावर, दीर्घकालीन उद्दिष्ट साध्य होण्याची चिन्हे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.