Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar Funeral: …तर अपघात टळला असता; धावपट्टीवर अंधार आणि तांत्रिक मर्यादा

Ajit Pawar Plane Crash: बारामती विमानतळावरील अपघातानंतर आता तेथील तांत्रिक सोयीसुविधांबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. या दुर्घटनेमागे विमानतळावरील काही त्रुटी कारणीभूत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 29, 2026 | 09:26 AM
Ajit Pawar Plane Crash, maharashtra politics, ajit Pawar, baramati airport, baramati political news, news ajit pawar, ajit pawar dies, deputy cm of maharashtra,

Ajit Pawar Plane Crash, maharashtra politics, ajit Pawar, baramati airport, baramati political news, news ajit pawar, ajit pawar dies, deputy cm of maharashtra,

Follow Us
Close
Follow Us:

Ajit Pawar Funeral   : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज (२९ जानेवारी २०२६) सकाळी ११ वाजता बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. या अंत्यविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देशातील व राज्यातील अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. काल सकाळपासूनच बारामतीमध्ये कार्यकर्त्यांचा आणि चाहत्यांचा अलोट जनसागर लोटला असून, संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे.

अपघाताबाबतचे प्राथमिक खुलासे

या भीषण दुर्घटनेनंतर तपासात अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. प्राथमिक अहवालानुसार, बारामती विमानतळावर लँडिंगच्या वेळी दृश्यमानता (Visibility) अत्यंत कमी होती. अशातच, ‘लँडिंग’चा घेतलेला निर्णय किंवा तांत्रिक बिघाड यापैकी एक चूक महागात पडल्याची चर्चा सध्या राजकीय आणि तांत्रिक वर्तुळात रंगली आहे. विमानतळ प्राधिकरणाने (AAIB) या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली असून, ‘ब्लॅक बॉक्स’च्या अहवालानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल.

  पायाभूत सुविधांचा अभाव नडला?

बारामती विमानतळावरील अपघातानंतर आता तेथील तांत्रिक सोयीसुविधांबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. या दुर्घटनेमागे विमानतळावरील काही त्रुटी कारणीभूत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

‘अनियंत्रित’ विमानतळ आणि तांत्रिक मर्यादा: बारामती विमानतळ हे प्रामुख्याने प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे ‘अनियंत्रित’ (Uncontrolled) विमानतळ आहे. येथे मोठ्या व्यावसायिक विमानांसाठी लागणारी ‘शेड्युल विमानसेवा’ उपलब्ध नसल्याने, अद्ययावत तांत्रिक सुविधांची कमतरता आहे.

नाईट लँडिंग आणि लाइट्सचा अभाव: या विमानतळावर रात्रीच्या वेळी किंवा खराब हवामानात विमान उतरवण्यासाठी आवश्यक असणारी ‘नाईट लँडिंग’ (Night Landing) सुविधा उपलब्ध नाही. धावपट्टीवर पुरेसे दिवे (Runway Lights) नसल्यामुळे कमी दृश्यमानतेच्या (Low Visibility) परिस्थितीत वैमानिकाला अचूक अंदाज घेण्यास अडथळे येतात.

नेव्हिगेशनल एड्सची कमतरता: तज्ज्ञांच्या मते, जर येथे ‘इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम’ (ILS) किंवा ‘प्रिसिजन अप्रोच पाथ इंडिकेटर’ (PAPI) सारख्या सुविधा असत्या, तर वैमानिकाला धावपट्टीचे नेमके स्थान आणि विमानाची उंची समजण्यास मदत झाली असती.

 

 

Web Title: Ajit pawar funeral baramati airport accident technical fault and security system questioned

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 09:26 AM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • ajit pawar plane crash
  • Baramati Politics

संबंधित बातम्या

Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात ‘अजित पवारां’चं कनेक्शन? अमोल मिटकरीचा खळबळजनक दावा; अघोरी पूजेचाही उल्लेख
1

Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात ‘अजित पवारां’चं कनेक्शन? अमोल मिटकरीचा खळबळजनक दावा; अघोरी पूजेचाही उल्लेख

Pune ZP : अध्यक्षपदाचा ‘फॉर्म्युला’ अद्याप गुप्तच; जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांचा डाव की संभ्रम?
2

Pune ZP : अध्यक्षपदाचा ‘फॉर्म्युला’ अद्याप गुप्तच; जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांचा डाव की संभ्रम?

Maharashtra Politics : Black Box सुरक्षित असतानाही जळाल्याचं का सांगितलं? रोहित पवारांचा संताप अनावर
3

Maharashtra Politics : Black Box सुरक्षित असतानाही जळाल्याचं का सांगितलं? रोहित पवारांचा संताप अनावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.