Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bharat Gogawale : अजितदादांच्या विमान अपघातावर रामदास कदमांचा संशय, भरत गोगवलेंच्या विधानाने राजकारणात रंगल्या चर्चा

Bharat Gogawale : अजित पवार यांच्या विमान अपघातावरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांनी संशय व्यक्त केल्यानंतर मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली.

  • By विवेक
Updated On: Nov 12, 2026 | 08:14 PM
bharat gogawale

bharat gogawale

Follow Us
Follow Us:
  • अजित पवारांच्या विमान अपघातावर रामदास कदमांचा संशय
  • भरत गोगवलेंची पहिली प्रतिक्रिया
  • सुनील तटकरे आणि रामदास कदम वादावरही भाष्य
 

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी या अपघाताबाबत संशय व्यक्त केल्यानंतर आता मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मारणाऱ्यांची काठी धरू शकतो, पण बोलणाऱ्याचं तोंड धरू शकत नाही,’ असं मिश्किल पण सूचक वक्तव्य त्यांनी केलं. मात्र, अपघाताची वस्तुस्थिती समोर आल्याशिवाय कोणताही निष्कर्ष काढता येणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

काय म्हणाले गोगावले?

रामदास कदम यांनी अपघातापूर्वी काही बैठका झाल्याचा उल्लेख करत संशय व्यक्त केला होता. याबाबत विचारलं असता गोगावले म्हणाले की, एखादा पायलट आजच्या काळात स्वतःचा जीव का देईल, असा प्रश्न पडतो. त्यामुळे नेमकी वस्तुस्थिती काय आहे, हे समोर येणं महत्त्वाचं आहे. चौकशीतील तथ्य समोर येण्याआधी अशा चर्चांना फारसा अर्थ नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.

सुनील तटकरे – कदम वादावरही भाष्य

सुनील तटकरे आणि रामदास कदम यांच्यात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवरही गोगावले यांनी भाष्य केलं. निवडणुकीच्या वेळी तिकीट जाहीर होण्याआधी रामदास कदम यांनीच तटकरेंच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता, असं त्यांनी सांगितलं. कदम हे आमचे ज्येष्ठ नेते असल्याने आम्हाला काही मर्यादा आहेत. वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून या वादावर काहीतरी तोडगा निघेल, असंही ते म्हणाले.

Shivsena Merger : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? ओमराजेंचं मोठं विधान, भरत गोगावलेंनीही दिले संकेत!

शिंदे साहेबांनी युतीधर्म पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आम्ही वरिष्ठांच्या निर्णयाची वाट पाहत असल्याचं गोगावले यांनी स्पष्ट केलं.

दोन्ही राष्ट्रवादींचं विभाजन होणार?

मंत्री संजय शिरसाठ यांनी दोन्ही राष्ट्रवादी वेगळे होऊन नवा गट निर्माण होण्याबाबत केलेल्या विधानावरही गोगावले यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर शिरसाठ यांना काही माहिती मिळाली असेल, तर पुढील कॅबिनेट बैठकीत त्यांनाच विचारणार असल्याचं त्यांनी मिश्किलपणे सांगितलं.

ठाकरे – शिंदे एकत्र येणार? गोगावले म्हणाले…

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येण्याबाबत गुलाबराव पाटील यांनी केलेल्या विधानावर गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली. गुलाबराव पाटील हे गुलाबासारखे आहेत, असं म्हणत त्यांनी त्यांच्या विधानावर मिश्किल टिप्पणी केली. सध्याच्या परिस्थितीत असं काही घडेल, असं वाटत नाही. मात्र, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

एकूणच अजित पवारांच्या विमान अपघातापासून ते महायुतीतील अंतर्गत वाद आणि शिवसेनेच्या संभाव्य एकत्रीकरणापर्यंत अनेक मुद्द्यांवर भरत गोगावले यांनी आपली भूमिका मांडली आहे.

NCP Merger News: अजित पवार महायुतीची साथ सोडणार होते; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: अजित पवारांच्या विमान अपघातावर रामदास कदम यांनी काय संशय व्यक्त केला?

    Ans: रामदास कदम यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातापूर्वी काही बैठका झाल्याचा उल्लेख करत अपघाताबाबत संशय व्यक्त केला आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती.

  • Que: रामदास कदमांच्या विधानावर भरत गोगावले काय म्हणाले?

    Ans: 'मारणाऱ्यांची काठी धरू शकतो, पण बोलणाऱ्याचं तोंड धरू शकत नाही,' असं भरत गोगावले म्हणाले. अपघाताची वस्तुस्थिती समोर आल्याशिवाय निष्कर्ष काढता येणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.

  • Que: सुनील तटकरे आणि रामदास कदम यांच्या वादावर भरत गोगावले यांनी काय सांगितलं?

    Ans: रामदास कदम यांनी यापूर्वी सुनील तटकरे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता, असं गोगावले म्हणाले. दोन्ही नेत्यांमधील वादावर वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून तोडगा निघेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Ajit pawar plane crash ramdas kadam bharat gogawale reaction vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2026 | 08:14 PM

Topics:  

  • ajit pawar plane crash
  • Bharat Gogawale
  • Shivsena UBT

संबंधित बातम्या

Shivsena Merger : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? ओमराजेंचं मोठं विधान, भरत गोगावलेंनीही दिले संकेत!
1

Shivsena Merger : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? ओमराजेंचं मोठं विधान, भरत गोगावलेंनीही दिले संकेत!

Mumbai News : रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ! ‘युपी, बिहारमध्ये अशी गाणी लावणार का?’ म्हणत किशोरी पेडणेकर संतापल्या
2

Mumbai News : रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ! ‘युपी, बिहारमध्ये अशी गाणी लावणार का?’ म्हणत किशोरी पेडणेकर संतापल्या

Ajit Pawar Plane Crash : ‘अजित पवारांचा घातपात झाल्याचं मला वाटतं, एक दिवस बोलणार’; उमेश पाटलांचं मोठं वक्तव्य
3

Ajit Pawar Plane Crash : ‘अजित पवारांचा घातपात झाल्याचं मला वाटतं, एक दिवस बोलणार’; उमेश पाटलांचं मोठं वक्तव्य

Shivsena Merger : शिंदे-ठाकरे पुन्हा एकत्र येणार? ओमराजे निंबाळकरांनी थेट सांगितलं, महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण
4

Shivsena Merger : शिंदे-ठाकरे पुन्हा एकत्र येणार? ओमराजे निंबाळकरांनी थेट सांगितलं, महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.