
Umesh Patil
Ajit Pawar Plane Crash : अजित पवार यांच्या मृत्यूबाबत पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी अजित पवारांच्या घातपाताबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ‘माझ्याकडे याबाबत कोणताही पुरावा नाही, मात्र अजित पवारांचा घातपात झाल्याचं मला वाटतं. एक दिवस याबाबत मी बोलेन,’ असं सूचक विधान त्यांनी केलं. ते बारामतीमध्ये आले असताना माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या आरोपांवरही प्रतिक्रिया दिली.
रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर उमेश पाटील यांनी आक्षेप घेतला. कदम यांनी हवेत आरोप करण्याऐवजी त्यासंदर्भातील पुरावे द्यावेत, असं आव्हान त्यांनी दिलं. माझ्याकडे अजित पवारांच्या घातपाताचा पुरावा नाही, मात्र मला तसं वाटतं आणि एक दिवस याबाबत बोलेन, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा सध्या सुरू नसल्याचं उमेश पाटील यांनी स्पष्ट केलं. या चर्चा केवळ प्रसारमाध्यमांमध्ये सुरू आहेत. सुनील तटकरे यांनी आधी एक भूमिका मांडली आणि आता वेगळी भूमिका घेतली आहे, असंही ते म्हणाले.
NCP Merger : ‘एवढं रवंथ गायी – म्हशीही करत नाहीत,’ दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणावर राऊत भडकले!
शरद पवार यांच्या पक्षाला एनडीएमध्ये यायचं असेल, तर भाजपने त्यांना सोबत घ्यायचं की नाही, हा निर्णय भाजपने घ्यायचा आहे. आमच्या गटाचे आमदार शरद पवार यांना भेटायला जाणार असल्याच्या बातम्याही चुकीच्या असल्याचं उमेश पाटील यांनी सांगितलं.
सुनील तटकरे यांच्यावर टीका करताना रामदास कदम यांनी गंभीर आरोप केले होते. तटकरे यांना जवळ करणाऱ्या नेत्यांचं राजकीय नुकसान होत असल्याचा दावा त्यांनी केला होता. तसेच अजित पवार यांच्या घातपातामागे सुनील तटकरे यांचा हात होता का, या दिशेने तपास करण्याची मागणीही त्यांनी केली होती.
रामदास कदम यांच्या आरोपांवर सुनील तटकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. आपल्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन उत्तर देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, उमेश पाटील यांनी या वादाकडे कोकणातील स्थानिक राजकीय संघर्षाच्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज व्यक्त केली. तटकरे गेल्या अनेक वर्षांपासून कोकणात राजकारण करत असून, शिवसेनेच्या विरोधात राष्ट्रवादी पक्ष रुजवण्यासाठी त्यांनी काम केल्याचंही पाटील म्हणाले.
Ans: अजित पवारांचा घातपात झाल्याचं मला वाटतं, मात्र माझ्याकडे याबाबत कोणताही पुरावा नाही. एक दिवस याबाबत बोलेन, असं उमेश पाटील म्हणाले.
Ans: सुनील तटकरे यांना जवळ करणाऱ्या नेत्यांचं राजकीय नुकसान होत असल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला. तसेच अजित पवारांच्या घातपातामागे तटकरे यांचा हात होता का, या दिशेने तपास करण्याची मागणी केली.
Ans: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत सध्या कोणतीही चर्चा सुरू नसल्याचं उमेश पाटील यांनी स्पष्ट केलं. या चर्चा केवळ प्रसारमाध्यमांमध्ये सुरू असल्याचंही ते म्हणाले.