राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष (NCP) कोण हे मी ठरवू शकत नाही. विधीमंडळ पक्षात बहुमत कुणाचं या एकमेव निकष महत्त्वाचं आहे, असं म्हणत राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात (NCP MLA disqualification case) निकाल दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा हे ठरवताना विधिमंडळ बहुमाताचा विचार करावा लागला. 53 पैकी 41 आमदार अजित पवार यांच्याकडे आहे. हे बहुमत शरद पवार गटाने नाकारले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांचाच आहे, असं राहुल नार्वेकर यांनी निकाल देताना सांगितलं.
अजित पवार गटाकडून अनिल पाटील आणि समीर भुजबळ सुनावणीला उपस्थित होते. तर शरद पवार गटाचे वकीलच आले. शरद पवार गटाच्या वतीने तीन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्याचवेळी अजित पवार गटाच्या वतीने दोन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. एकूण पाच याचिका होत्या ज्या दोन भागात विभागल्या होत्या, गट १ आणि गट २.
राहुल नार्वेकर म्हणाले की, राष्ट्रवादीत कोणतीही फूट नाही. फक्त एक गट तयार झाला आहे. प्राथमिक स्तरावर त्यांनी पक्ष रचना, घटना आणि विधिमंडळ संख्या या तीन गोष्टींवर आपला निर्णय दिला. ते म्हणाले की, 30 जून 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते. 29 जूनपर्यंत शरद पवार यांच्या नेतृत्वावर प्रश्नच नव्हता. राष्ट्रवादी घटनेबाबत कोणताही वाद नाही.
पुढे राहुल नार्वेकर म्हणाले, “शिवसेनेबाबत मी घेतलेल्या निर्णयाचा आधार येथे घ्यावा लागेल. पक्षात दोन्ही गट अध्यक्षपदावर दावा करत आहेत. अध्यक्षपदाची निवडणूक झाली नसल्याचा दावा दोन्ही गट करत आहेत. पक्षाच्या घटनेनुसार केले.. येथे दोन समांतर नेतृत्व उदयास आले. दोन्ही गटांकडून अपात्रतेच्या याचिकाही दाखल झाल्या आहेत. पक्ष घटनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी ही सर्वोच्च संस्था आहे. तिचे 16 स्थायी सदस्य आहेत. पण पक्षाची घटना कायमस्वरूपी सदस्यांना परवानगी देत नाही.आपण कोणाचा पक्ष आहोत हे नेतृत्व रचना, पक्षाची रचना आणि विधिमंडळ संख्या पाहून ठरवावे लागेल.पक्षाच्या घटनेत आणि नेतृत्व रचनेत स्पष्टता नाही.