Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar: अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली ‘ही’ महत्वाची मागणी

नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील कसारा घाट, इगतपुरी परिसरातील खराब रस्त्यांची अवस्था, खराब दर्जाचे डायव्हर्जन आणि पुलांचे अपूर्ण काम ही वाहतुकीस धोका निर्माण करणारी बाब असल्याचे अजित पवार यांनी स्पष्टपणे नमूद केले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 07, 2025 | 09:49 PM
Ajit Pawar: अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली ‘ही’ महत्वाची मागणी
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या दोन्ही मार्गांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असलेल्या या रस्त्यांवर अपघातांची संख्या वाढली आहे. ही परिस्थिती लक्षात घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून दोन्ही महामार्गांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पुणे-नाशिक महामार्ग हा औद्योगिक, व्यापारी आणि प्रवासी वाहतुकीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असून सध्या या मार्गावर अनेक ठिकाणी खोल खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. वेळेचा, इंधनाचा आणि मनस्तापाचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. याशिवाय, या महामार्गावर नियमितपणे टोल आकारला जात असतानाही रस्त्याच्या गुणवत्तेत व सुरक्षिततेत कोणतीही सुधारणा झालेली नाही, हे दुर्दैवी आहे.

तसेच, नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील कसारा घाट, इगतपुरी परिसरातील खराब रस्त्यांची अवस्था, खराब दर्जाचे डायव्हर्जन आणि पुलांचे अपूर्ण काम ही वाहतुकीस धोका निर्माण करणारी बाब असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे. या मार्गावरही गंभीर अपघात घडत असून या दोन्ही महामार्गांची सखोल पाहणी करून तात्काळ दुरुस्तीचे आदेश द्यावेत, अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची कार्यक्षमता आणि पायाभूत विकासातील योगदान लक्षात घेता, त्यांच्या माध्यमातून या दोन्ही महामार्गांची दुरुस्ती तातडीने पूर्ण होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पाठवलेल्या पत्रात व्यक्त केला आहे.

Nitin Gadkari : “कधीही तिसरं महायुद्ध सुरू होऊ शकते, ज्याचं पोट रिकामं आहे…”, नितीन गडकरी यांनी दिला इशारा

नितीन गडकरी यांनी दिला इशारा

केंद्रीय मंत्री आणि माजी भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी गरिबीबाबत दिलेल्या विधानामुळे मोदी सरकारच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी म्हणाले कीस, देशात गरिबी वाढत आहे आणि सर्व पैसा काही श्रीमंत लोकांपर्यंतच पोहोचत आहे. तसेच वाढत्या गरिबीच्या पार्श्वभूमीवर पैशाचे विकेंद्रीकरण करण्याची गरज आहे. ज्यामुळे केवळ आर्थिक विकासच होणार नाही तर गावकऱ्यांचे कल्याणही होईल. तसेच जगात सुसंवाद, प्रेम आणि शांती कमी होत असून अशा परिस्थितीमध्ये जगात कधीही तिसरं महायुद्ध सुरु होऊ शकते, असा इशारा नितीन गडकरी यांनी यावेळी दिला आहे.

Web Title: Ajit pawar letter to nitin gadkari pune nashik and nshik mumbai highway repairing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2025 | 09:49 PM

Topics:  

  • ajit pawar
  • highway news
  • Nitin Gadkari

संबंधित बातम्या

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन
1

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
2

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको
3

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू : उपमुख्यमंत्री अजित पवार
4

सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू : उपमुख्यमंत्री अजित पवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.