Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar: अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे, अजित पवारांच्या सूचना

देशातील पहिले ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय म्हणून ओळख असलेल्या अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे रूपांतर आदर्श शासकीय संस्थेमध्ये करण्यात यावे असे सांगण्यात आले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 26, 2025 | 04:57 PM
अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे, अजित पवारांच्या सूचना (फोटो सौजन्य-X)

अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे, अजित पवारांच्या सूचना (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मराठवाड्यातील ग्रामीण भागासाठी वैद्यकीय शिक्षण व आरोग्यसेवा अधिक सक्षम व्हावी, यासाठी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे सुसज्ज शासकीय रुग्णालय उभारण्यात यावे. तसेच स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे काम दर्जेदार पद्धतीने करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाबाबत उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज बैठक झाली. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, वित्त विभागाच्या सचिव शैला ए, संचालक डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता डॉ.शंकर धपाटे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव राजेश देशमुख यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गणेश चतुर्थीला मुंबईकरांनो ‘या’ मार्गावरून प्रवास करणं टाळा! पाहा कोणता मार्ग सुरू, कोणता बंद

देशातील पहिले ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय म्हणून ओळख असलेल्या अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे रूपांतर आदर्श शासकीय संस्थेमध्ये करण्यात यावे असे सांगून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, या महाविद्यालयासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. महाविद्यालयाच्या आधीच सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या कामांचा समावेश करून नवीन मास्टर प्लॅन तयार करावा. नवीन रुग्णालयात आधुनिक सुविधा, सुपर स्पेशालिटी सेवा यांचा समावेश असावा, उत्कृष्ट सुविधा असाव्यात. मराठवाड्यासाठी हे महाविद्यालय महत्वाचे असून येथे येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा प्रस्ताव सादर करावा. हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, सध्या अस्तित्वातील इमारतींचा नियोजनपूर्वक वापर करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, अंबाजोगाईतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा दर्जा उंचावण्यासाठी कार्यवाही वेगाने करावी. महाविद्यालयाचा आराखडा तयार करून, कार्यवाही करावी. मराठवाडा विभागातील लोकसंख्येसाठी ही वैद्यकीय सुविधा म्हणजे एक मोठा दिलासा ठरणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी नवीन संधी मिळणार असून, ग्रामीण भागातील रुग्णांना तज्ज्ञ सेवांचा लाभ मिळणार आहे.

जयंत पाटलांचा गोपीचंद पडळकरांवर निशाणा, म्हणाले; विधानसभेत गुन्हेगार…

Web Title: Ajit pawar on hospital with 1150 beds should be established in ambajogai instructions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2025 | 04:57 PM

Topics:  

  • ajit pawar
  • maharashtra
  • Mumbai

संबंधित बातम्या

खुशखबर! विद्यापीठाशी संबंधित ५६ ऑनलाइन सेवा ‘आपले सरकार’ पोर्टलवर उपलब्ध
1

खुशखबर! विद्यापीठाशी संबंधित ५६ ऑनलाइन सेवा ‘आपले सरकार’ पोर्टलवर उपलब्ध

डिजिटल शिक्षण आणि ऑनलाइन शेती…, नागपूरचे हे गाव भारतातील पहिले स्मार्ट आणि बुद्धिमान गाव ठरले
2

डिजिटल शिक्षण आणि ऑनलाइन शेती…, नागपूरचे हे गाव भारतातील पहिले स्मार्ट आणि बुद्धिमान गाव ठरले

Mumbai Traffic: गणेश चतुर्थीला मुंबईकरांनो ‘या’ मार्गावरून प्रवास करणं टाळा! पाहा कोणता मार्ग सुरू, कोणता बंद
3

Mumbai Traffic: गणेश चतुर्थीला मुंबईकरांनो ‘या’ मार्गावरून प्रवास करणं टाळा! पाहा कोणता मार्ग सुरू, कोणता बंद

Mumbai : मनसेने मूषकराज बनून केला गणपती बाप्पांना फोन मीरा-भाईंदरला येऊ नका दिला संदेश
4

Mumbai : मनसेने मूषकराज बनून केला गणपती बाप्पांना फोन मीरा-भाईंदरला येऊ नका दिला संदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.