
Ajit Pawar Plane Crash
विमान पूर्णपणे सुरक्षित; कोणताही तांत्रिक बिघाड नाही– अधिकाऱ्यांनी ठामपणे सांगितले की,“विमानाची देखभाल अत्यंत उत्तम होती. विमानात कोणताही तांत्रिक दोष नव्हता. ही माहिती आम्हाला प्राथमिक तपासातून मिळाली आहे.”अपघातग्रस्त विमानातील पायलट अत्यंत अनुभवी होते.कॅप्टनकडे १६,००० तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव होताको-पायलटदेखील सुमारे १,५०० तासांचा अनुभव असलेले होते. कॅप्टन हे प्रशिक्षक आणि परीक्षक म्हणूनही कार्यरत होते
2023 च्या घटनेशी तुलना अयोग्य– 2023 मधील एका घटनेचा संदर्भ दिला जात असला, तरी तो अपघात मुंबई विमानतळावर, मुसळधार पावसात आणि कमी दृश्यांमुळे झाला होता. त्या वेळी लँडिंगनंतर विमान रनवेवरून घसरले होते.“सध्याची घटना वेगळी आहे. त्याची थेट तुलना करता येणार नाही,” असे अधिकार्यांनी स्पष्ट केले.DGCA कडून तपास सुरू – या प्रकरणाचा तपास DGCA (नागरी विमान वाहतूक महा संचालनालय) करत आहे.“तपासा संदर्भात माहिती देण्याचा अधिकार DGCA कडे आहे. आम्ही सध्या काहीही सांगू शकत नाही,” असे कंपनीकडून सांगण्यात आले.
Ajit Pawar Funeral : दादांनी ड्रायव्हरच्या मुलाला “नेता” केलं; कार्यकर्त्यांची भावूक प्रतिक्रिया
कुटुंबियांच्या दु:खात सहभागी – अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पायलट बद्दल बोलताना अधिकारी भावूक झाले.“कॅप्टन सुमित कपूर माझे अत्यंत जवळचे मित्र होते. ते मला भावासारखे होते. त्यांचा मुलगाही आमच्याकडे पायलट आहे.दुसरे पायलट कॅप्टन शांभवी पाठक माझ्यासाठी मुलीसारखी होती. दोघेही अत्यंत उत्कृष्ट पायलट आणि चांगली माणसे होती.विमान ग्राउंड करण्याचा निर्णय नाही – कंपनीकडे असलेल्या सात Learjet 45 विमानांबाबत विचारले असता,
“सर्व विमाने पूर्णपणे सुरक्षित आहेत. त्यामुळे सध्या कोणतेही विमान ग्राउंड करण्याचा प्रश्न नाही,” असेही स्पष्ट करण्यात आले.
घटनेचा कालावधी – ही घटना अंदाजे सकाळी 8 ते 8.45 दरम्यान घडली.“जेव्हा मला कॉल आला, तेव्हा विमान क्रॅश लँड झाल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर संपर्कासाठी कोणीही उपलब्ध नव्हते,” असे त्यांनी सांगितले.
Ans: नाही. कंपनीच्या माहितीनुसार विमान पूर्णपणे सुरक्षित होते आणि कोणताही तांत्रिक दोष नव्हता.
Ans: अजिबात नाही. कॅप्टनकडे 16,000 तासांपेक्षा अधिक तर को-पायलटकडे 1,500 तासांचा उड्डाण अनुभव
Ans: प्राथमिक माहितीनुसार, रनवे स्पष्ट न दिसल्यामुळे पायलटने मिस्ड अप्रोच घेतला. अंतिम कारण DGCA तपासानंतर स्पष्ट होईल.