Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar Death: “ते केवळ राजकारणी नव्हते तर…” अजित दादांच्या निधनानंतर आमदार सत्यजित तांबे झाले व्यक्त

अजित पवार यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत आहे. नुकतेच आमदार सत्यजित तांबे यांनी देखील त्यांच्या मनातील भावना सोशल मीडियावर शेअर केली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 29, 2026 | 07:11 PM
अजित दादांच्या निधनानंतर आमदार सत्यजित तांबे झाले व्यक्त

अजित दादांच्या निधनानंतर आमदार सत्यजित तांबे झाले व्यक्त

Follow Us
Close
Follow Us:
  • बारामती विमान अपघातात अजित पवारांचे निधन
  • अजित दादांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र्र शोकाकुल
  • आमदार सत्यजित तांबेंनी व्यक्त दादांबद्दल केल्या भावना
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी त्यांच्य विषयीच्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. ‘सावकाश’ हा शब्द माझ्या डिक्शनरीत नाही असं दादा अनेकदा म्हणायचे. वेळेचे तंतोतंत पालन करणारे हे नेतृत्व आज अवेळी आपल्यातून निघून गेले. त्यांच्याशी संबंध जुन्हा असला, तरी २००७ साली मी जिल्हा परिषद सदस्य झाल्यापासून तो अधिक जवळचा होत गेला, असे आमदार तांबे यांनी म्हटले आहे.

वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आणि कायम प्रोत्साहन देणारे अजितदादा माझ्यासाठी फक्त नेते नव्हते, तर आधार होते. २०१२ मधील जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त सदस्य असल्यामुळे माझे नाव निश्चित झाले मात्र अध्यक्षपद काँग्रेसकडे गेले. रागाच्या भरात दादांना फोन केला तेव्हा तू शांत हो, मुंबईला ये, आपण भेटू असे त्यांनी शांतपणे सांगितले. भेटल्यानंतर त्यांना संधी हिरावून घेतल्याचे सांगितल्यावर ते म्हणाले होते, की राजकारण राजकारणाच्या पद्धतीनेच करावं लागतं. आम्ही राज्यपातळीवर एक धोरण ठरवलं, त्यात तुझं नुकसान झालं, यासाठी मी तुला सॉरी म्हणतो. आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या माणसाला ‘सॉरी’ म्हणण्याचा तो त्यांचा मोठेपणा विलक्षण होता.

कोण आहेत Sunetra Pawar? अजितदादांच्या निधनानंतर आता राज्याच्या ‘उपमुख्यमंत्री’ पदासाठी त्यांच्या नावाची चर्चा!

दादांचा स्वभाव कडक होता, त्यांच्या बोलण्यात स्पष्टवक्तेपणा होता, पण मनातून ते अतिशय हळवे होते. त्यामुळे त्यांच्या रोखठोक स्वभावाचा कधीही राग वाटला नाही. उलट आपले काम १०० टक्के होईल हा विश्वास असायचा. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचं भविष्य खूप उज्ज्वल असेल असं वाटत होतं, पण या सगळ्या अपेक्षा आज एका क्षणात संपल्या!

केवळ राजकारणी नव्हे; उत्तम व्यवस्थापक

  • दादांचा कामाचा वेग अफाट होता. त्याच वेगामुळे आज त्यांच्या जाण्याची हानी अधिक तीव्रतेने जाणवते.
  • त्यांनी उभे केलेले साखर कारखाने आणि उद्योग मी जवळून पाहिले आहेत.
  • ते केवळ राजकारणी नव्हते, तर उत्तम व्यवस्थापक आणि उद्योजकही होते. एक नेता तयार व्हायला अनेक वर्षे लागतात.
  • अशा नेत्याच्या जाण्याने फक्त त्या कुटुंबाचं नाही, तर असंख्य लोकांचं, संपूर्ण व्यवस्थेचं आणि भविष्यातील विकासात्मक दृष्टीचंही मोठे नुकसान होतं.
  • अजितदादांच्या जाण्याने ती पोकळी आज प्रकर्षाने जाणवत आहे, अशी भावना आंमदार तांबे यांनी व्यक्त केली.

Web Title: Ajit pawar death satyajit tambe express memories of ajit pawar on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 07:11 PM

Topics:  

  • ajit pawar
  • ajit pawar plane crash
  • Satyajeet Tambe

संबंधित बातम्या

Ajit Pawar: वारसा की अनुभव? राष्ट्रवादीचं मुख्यमंत्री फडणवीसांना महत्त्वाचं पत्र? लवकरच घेतला जाणार मोठा निर्णय!
1

Ajit Pawar: वारसा की अनुभव? राष्ट्रवादीचं मुख्यमंत्री फडणवीसांना महत्त्वाचं पत्र? लवकरच घेतला जाणार मोठा निर्णय!

अजित पवार यांच्या निधनावर ‘रंग दे बसंती’च्या निर्मात्यांचा शोक; चित्रपटाच्या २०व्या वर्धापनदिनाची विशेष स्क्रीनिंग पुढे ढकलली
2

अजित पवार यांच्या निधनावर ‘रंग दे बसंती’च्या निर्मात्यांचा शोक; चित्रपटाच्या २०व्या वर्धापनदिनाची विशेष स्क्रीनिंग पुढे ढकलली

अजित पवारांसाठी पुणं थांबलं! ‘दादां’च्या जाण्याने सांस्कृतिक कार्यक्रमांना तात्पुरता विराम
3

अजित पवारांसाठी पुणं थांबलं! ‘दादां’च्या जाण्याने सांस्कृतिक कार्यक्रमांना तात्पुरता विराम

Ajit Pawar Last Rites : दादा परत या ना हो..! कार्यकर्त्याचा बारामतीत आक्रोश!
4

Ajit Pawar Last Rites : दादा परत या ना हो..! कार्यकर्त्याचा बारामतीत आक्रोश!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.