Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: राज्यात मोठ्या हालचाली; ZP इलेक्शनबाबत ‘हा’ मोठा निर्णय

Election Breaking: राज्यात निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची घोषणा केली होती. 5 तारखेला मतदान आणि 7 तारखेला निकाल जाहीर होणार होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 29, 2026 | 08:23 PM
Maharashtra Politics: राज्यात मोठ्या हालचाली; ZP इलेक्शनबाबत ‘हा’ मोठा निर्णय
Follow Us
Follow Us:

जिल्हा परिषद अन् पंचायत समितीची निवडणूक पुढे ढकलली 
राज्यात दुखवटा असल्याने घेतला निर्णय 
7 तारखेला मतदान तर 9 तारखेला मतमोजणी

ZP Election 2026: राज्यात निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची घोषणा केली होती. 5 तारखेला मतदान आणि 7 तारखेला निकाल जाहीर होणार होते. मात्र आता या निवडणुकीबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

काल विमान दुर्घटनेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. आज त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान अजित पवार यांचे निधन झाल्यामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान आता नवीन निर्णयानुसार राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुका 7 आणि 9 फेब्रुवारी रोजी होणार आहेत. 7 तारखेला मतदान आणि 9 तारखेला मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 13 जानेवारी 2026 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करणे, नामनिर्देशनपत्र मागे घेणे, चिन्ह वाटप आणि निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे इत्यादी टप्प्यांच्यी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यापुढील मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे शिल्लक आहेत.

Ajit Pawar Plane Crash : ‘अजितदादांच्या अपघाती निधनाची चौकशी व्हावी’, अजित पवारांच्या निधनाने कार्यकर्ते शोकाकुल

सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी 31 जानेवारी 2026 च्या पुढे फक्त दोन आठवड्यांची मुदत वाढ दिली आहे; परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी अपघाती निधन झाल्यामुळे राज्य शासनाने राज्यात 28 जानेवारी 2026 ते 30 जानेवारी 2026 पर्यंत दुखवटा जाहीर केला आहे. या कालावधीचा विचार करून जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची सूचना 31 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध करतील. आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. त्यामुळे जाहीर प्रचाराची समाप्ती 5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजता होईल. संबंधित ठिकाणी 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल. निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात 11 फेब्रुवारी 2026 पर्यंत प्रसिद्ध केली जातील.

 

Web Title: Zp and panchayat samiti election 7 and 9 february because dcm ajit pawar death maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 07:40 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Maharashtra Politics
  • Panchayat Samiti Elections
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

MLC Election 2026 : पुणे ते संभाजीनगर… पाचही जागांवर राजकीय आखाडा तापला; पाहा कोण कुठून लढणार!
1

MLC Election 2026 : पुणे ते संभाजीनगर… पाचही जागांवर राजकीय आखाडा तापला; पाहा कोण कुठून लढणार!

KDMC News: ‘स्वीकृत नगरसेवकांबाबत निर्णय घ्या, अन्यथा हायकोर्टात जाऊ’; KDMC प्रशासनाला ठाकरे गटाचा इशारा
2

KDMC News: ‘स्वीकृत नगरसेवकांबाबत निर्णय घ्या, अन्यथा हायकोर्टात जाऊ’; KDMC प्रशासनाला ठाकरे गटाचा इशारा

Satara DCC Bank Election: रामराजे–शेखर गोरे भेटीने राजकीय समीकरणांना धक्का!; हॉटेलमध्ये ‘वन-टू-वन’ खलबते
3

Satara DCC Bank Election: रामराजे–शेखर गोरे भेटीने राजकीय समीकरणांना धक्का!; हॉटेलमध्ये ‘वन-टू-वन’ खलबते

Pratap Sarnaik: ‘स्कॉच’ पुरस्कारानंतर मंत्री सरनाईक विरुद्ध महापालिका; SCWC प्रकल्पाच्या श्रेयावरून वादाची ठिणगी
4

Pratap Sarnaik: ‘स्कॉच’ पुरस्कारानंतर मंत्री सरनाईक विरुद्ध महापालिका; SCWC प्रकल्पाच्या श्रेयावरून वादाची ठिणगी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.