
Jalgaon News: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
जळगाव राज्यात पावसाअभावी कठीण परिस्थिती निर्माण झाली असली, तरी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. १९७२ च्या दुष्काळात यापेक्षाही गंभीर परिस्थिती होती. त्यावेळी शेतकऱ्यांनी सुगडी खाऊन जीवन जगले.
मात्र आत्महत्या न करता परिस्थितीचा सामना केला. आजही शासन मदतीसाठी तिजोरी खाली करेल; परंतु शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग न स्वीकारता संकटाशी लढावे, असे आवाहन सहकार राज्यमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले. Jalgaon News:
जळगाव जिल्हा बँकेच्या आवारात माजी उपमुख्यमंत्री (कै.) अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील होते. दोघांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
जिल्हा बँकेत आयोजित कार्यक्रमात उपाध्यक्ष आमदार अमोल पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर अध्यक्ष संजय पवार यांनी मनोगत व्यक्त केले. पस्थित मान्यवरांचे अजित पवार यांच्या जीवनावरील पुस्तक आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार म्हणाले, शेतकऱ्यांना भरीव मदत करणे हा अजितदादांचा उद्देश होता. त्यांचा आदर्श घेऊन बँक शेतकरीहिताचे निर्णय घेत हे. त्यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. बँकेतील पुतळा त्यांच्या कार्याची सतत आठवण करून देईल.
Jalgaon News: 13 शिक्षकांच्या पदस्थापनेत नेमकं काय घडलं? सामान्य …
बँकेचे उपाध्यक्ष आमदार अमोल पाटील यांनी अजितदादा पवार यांनी विकासाचे राजकारण केल्याचे सांगितले. त्यांच्या कार्याचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा. पुतळ्यातून त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Ans: जळगाव जिल्हा बँकेच्या आवारात अजित पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
Ans: सहकार राज्यमंत्री बाबासाहेब पाटील आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले.
Ans: अजित पवार यांच्या कार्याची आठवण राहून शेतकरीहितासाठी काम करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.