Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजित पवारांनी घेतले का शरद पवार व सुप्रिया सुळेंचा नाव? बारामतीमधील महारोजगार मेळाव्याला आले एकाच मंचावर

  • By प्रीति माने
Updated On: Mar 02, 2024 | 02:03 PM
अजित पवारांनी घेतले का शरद पवार व सुप्रिया सुळेंचा नाव? बारामतीमधील महारोजगार मेळाव्याला आले एकाच मंचावर
Follow Us
Follow Us:

बारामती : आज बारामती शहरामध्ये राज्यातील अनेक महत्त्वाचे नेते जमले आहेत. बारामतीमध्ये पश्चिम महाराष्ट्रासाठी ‘नमो महारोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आले आहे. यावेळी पवार कुटुंब एकाच मंचावर आलेले पाहायले मिळाले. खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी एकमेकांशी बोलणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

‘नमो महारोजगार मेळावा’ हा मागील दोन दिवसांपासून चर्चेचे कारण ठरला आहे. आज पार पडलेल्या या रोजगार मेळाव्यावेळी एकाच मंचावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, दिलीप वळसे पाटील अशी अनेक मंडळी उपस्थित होती. यावेळी अजित पवार यांनी सुप्रिया सुळे व शरद पवार यांच्यासोबत बोलणे टाळले. तसेच सुप्रिया सुळे यांनी देखील अजित पवार यांच्याकडे दुर्लक्ष केले. खा. सुळे या मंचावर नेत्यांचे स्वागत करण्यासाठी पुढे आल्या. त्यांनी एकनाथ शिंदे यांचे हात जोडून स्वागत केले. पण तेवढ्या शिंदे यांच्या मागे असलेल्या अजित पवार यांनी जनतेकडे हात दाखवून अभिवादन करण्यास सुरुवात केली आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर सुप्रिया सुळे अजित पवार यांच्यामागून जाऊन देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलल्या. त्यांचेही सुळे यांनी स्वागत केले. याहीवेळेस अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी एकमेकांशी नजरा-नजर करणे टाळले.

त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत आणि कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याशीही बातचीत केली. यावेळी त्यांच्याशेजारीच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारदेखील उपस्थित होत्या. मात्र दोघींनीही मंचावर एकमेकांशी बोलणे टाळले. मात्र सुळे यांनी दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत हस्तांलोदन केले. मात्र शरद पवार यांनी वळसे पाटील यांच्यासोबत बोलणे देखील टाळले आणि ते थेट आपल्या जागेवर जाऊन बसले.

अजित पवारांनी केला भाषणात उल्लेख

नमो महारोजगार मेळावा यामध्ये पवार कुटुंबीयातील अनेक राजकारणी मंडळी उपस्थित होती. यावेळी अजित पवार हे आपल्या भाषणामध्ये प्रोटोकॉलप्रमाणे खासदार शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांची नावं घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. उपस्थितांची नावे घेताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील मंत्र्यांची नावे घेतल्यानंतर ‘आदरणीय पवार साहेब, सुप्रिया सुळे’ एवढाच नामोल्लेख केला. त्यांनी सुप्रिया सुळे यांचा खासदार म्हणून उल्लेख केला नाही. तसेच शरद पवार यांचेही पूर्ण नाव घेतले नाही. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा यथोचित उल्लेख केला.

Web Title: Ajit pawar take the name of sharad pawar and supriya sule in namo maharojgar melava of baramati nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2024 | 02:03 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Eknath Shinde
  • Namo Maharojgar Melava
  • supriya sule

संबंधित बातम्या

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन
1

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन

Eknath Shinde: मुख्यमंत्री ते पंतप्रधान… नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाला एकनाथ शिंदेंचा सलाम
2

Eknath Shinde: मुख्यमंत्री ते पंतप्रधान… नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाला एकनाथ शिंदेंचा सलाम

Pradeep Purnekar Murder Case : ‘स्वतःला ठाण्याचा मसीहा समजणारे कुठे गेले?’ अंबादास दानवेंची एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका
3

Pradeep Purnekar Murder Case : ‘स्वतःला ठाण्याचा मसीहा समजणारे कुठे गेले?’ अंबादास दानवेंची एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका

Jay Pawar : जय पवार यांचे पुरुषोत्तम जगतापांवर कारवाईचे संकेत, ‘हे’ आहे कारण…
4

Jay Pawar : जय पवार यांचे पुरुषोत्तम जगतापांवर कारवाईचे संकेत, ‘हे’ आहे कारण…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.