Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Supriya Sule : अमोल कोल्हे आणि भुजबळांच्या भेटीची चर्चा; सुप्रिया सुळेंनी एका वाक्यात स्पष्ट केली भूमिका

Supriya Sule : खासदार अमोल कोल्हे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • By विवेक
Updated On: Nov 21, 2026 | 09:46 PM
Supriya Sule

Supriya Sule

Follow Us
Follow Us:
  • अमोल कोल्हे-छगन भुजबळांच्या भेटीवर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
  • डिलिमिटेशन बिलावर सुप्रिया सुळेंची सावध भूमिका
  • बिल आल्यानंतरच सविस्तर बोलणार – सुप्रिया सुळे
 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या भेटीची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. या भेटीमागे नेमकं काय राजकारण आहे, याबाबत तर्कवितर्क लावले जात असतानाच खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यातील अनुभवी नेते एकमेकांना भेटत असतील, तर त्यात गैर काय, असा थेट सवाल त्यांनी केला. लोकशाहीमध्ये विरोधाइतकाच संवादही महत्त्वाचा असल्याचे सांगत त्यांनी या भेटीचे स्वागत केले. (Supriya Sule)

अमोल कोल्हे आणि छगन भुजबळ यांच्या भेटीबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज्यातील अनुभवी नेते एकमेकांना भेटले असतील तर त्यात गैर काय? लोकशाहीमध्ये विरोध झाला पाहिजे, पण त्याचबरोबर चर्चा देखील झाली पाहिजे. त्यामुळे अशा भेटींचे स्वागत केले पाहिजे.

त्यांच्या या विधानामुळे दोन्ही नेत्यांच्या भेटीकडे पाहण्याचा राजकीय दृष्टिकोन चर्चेत आला आहे. भेटीवरून राजकीय अर्थ काढण्याऐवजी संवादाला महत्त्व दिले पाहिजे, अशी भूमिका सुळे यांनी मांडली.

Shambhuraj Desai : ‘अघोरी बाबा कुठे मिळतो?’ शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना खोचक टोला; साताऱ्यात राजकारण तापलं!

डिलिमिटेशन बिलावर सुप्रिया सुळेंची सावध भूमिका

दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी डिलिमिटेशन बिलाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून खासदारांना १५० कोटी रुपये देऊन विकत घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला होता. यावर सुप्रिया सुळे यांनी बिल अद्याप आलेले नसल्याचे स्पष्ट केले.

बिल आल्यानंतर त्यावर सविस्तर चर्चा करू. संजय राऊत हे महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत आणि त्यांना त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, माझ्याकडे अद्याप बिल आलेले नाही आणि यासंदर्भात कोणाचा फोनही आलेला नाही, असे त्या म्हणाल्या.

दुष्काळावरून सरकारकडे फूड पॅकेजची मागणी

दुसरीकडे महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवरून सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधले. राज्यातील शेतकरी आणि गरीब कुटुंबांना मदतीची गरज असून उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही फूड पॅकेज राबवावे, अशी मागणी त्यांनी केली.

१९७२ च्या दुष्काळात अन्नाची कमतरता होती; मात्र यंदा अन्नासोबत पाण्याचीही टंचाई जाणवत असल्याचे त्यांनी नमूद केले. केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातील गरजू कुटुंबांना मदत मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

याशिवाय पुढील वर्षी जून-जुलैपर्यंत पुरेल इतके पाणी उपलब्ध राहील, अशा पद्धतीने आतापासूनच नियोजन करण्याची गरज असल्याचेही सुळे म्हणाल्या. त्यामुळे राजकीय भेटींबरोबरच दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही त्यांनी सरकारला महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत.

NCP Politics : दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकाच मंचावर; अमोल कोल्हे अन् छगन भुजबळ यांच्यात खलबतं, चर्चांना उधाण

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमोल कोल्हे आणि छगन भुजबळ यांच्या भेटीवर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

    Ans: राज्यातील अनुभवी नेते एकमेकांना भेटले तर त्यात गैर काय? लोकशाहीमध्ये विरोधासोबत चर्चाही महत्त्वाची आहे, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी या भेटीचे समर्थन केले.

  • Que: डिलिमिटेशन बिलाबाबत सुप्रिया सुळे यांनी काय भूमिका मांडली?

    Ans: डिलिमिटेशन बिल अद्याप आलेले नाही. बिल आल्यानंतर त्यावर सविस्तर चर्चा करू, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

  • Que: महाराष्ट्रातील दुष्काळाबाबत सुप्रिया सुळे यांनी कोणती मागणी केली?

    Ans: उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातील गरीब शेतकरी आणि अडचणीत असलेल्या कुटुंबांसाठी फूड पॅकेज राबवावे, तसेच पुढील वर्षी जून-जुलैपर्यंत पुरेल इतके पाणी उपलब्ध होण्यासाठी नियोजन करावे, अशी मागणी त्यांनी केली.

Web Title: Supriya sule reaction amol kolhe chhagan bhujbal meeting vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 09:46 PM

Topics:  

  • amol kolhe
  • Chhagan Bhujbal
  • supriya sule

संबंधित बातम्या

NCP Politics : दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकाच मंचावर; अमोल कोल्हे अन् छगन भुजबळ यांच्यात खलबतं, चर्चांना उधाण
1

NCP Politics : दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकाच मंचावर; अमोल कोल्हे अन् छगन भुजबळ यांच्यात खलबतं, चर्चांना उधाण

Supriya Sule : अजित पवार यांचा पुतळा पाहून सुप्रिया सुळे भावूक; भावाला अभिवादन करत व्यक्त केल्या भावना, म्हणाल्या, “आठवणी दाटून…
2

Supriya Sule : अजित पवार यांचा पुतळा पाहून सुप्रिया सुळे भावूक; भावाला अभिवादन करत व्यक्त केल्या भावना, म्हणाल्या, “आठवणी दाटून…

Ajit Pawar Statue Unveiled: अजित पवार यांच्या अर्धपुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अनावरण; सुनेत्रा पवार भावूक
3

Ajit Pawar Statue Unveiled: अजित पवार यांच्या अर्धपुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अनावरण; सुनेत्रा पवार भावूक

Amit Shah Pune Visit: अमित शाह दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर; राष्ट्रवादीत घडामोडींना वेग, काहीतरी मोठं घडणार?
4

Amit Shah Pune Visit: अमित शाह दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर; राष्ट्रवादीत घडामोडींना वेग, काहीतरी मोठं घडणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.