Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अकोल्यात दुष्काळ निवारणासाठी प्रशासन सज्ज; दुष्काळावर मात करण्यासाठी उपाययोजना सुरु

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाातील आवश्यक लोकोपयोगी कामांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा, जलसंधारण आणि इतर आवश्यक दुष्काळी कामांना निधीची उपलब्धता करून देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 17, 2026 | 11:22 AM
अकोल्यात दुष्काळ निवारणासाठी प्रशासन सज्ज; दुष्काळावर मात करण्यासाठी उपाययोजना सुरु

अकोल्यात दुष्काळ निवारणासाठी प्रशासन सज्ज; दुष्काळावर मात करण्यासाठी उपाययोजना सुरु

Follow Us
Follow Us:
  • दुष्काळी परिस्थितीत वन्यप्राण्यांसाठी पाणवठे
  • वैरण विकास कार्यक्रमाला गती
  • दुष्काळी उपाययोजनांसाठी निधीची तरतूद
अकोला : यंदा अपुऱ्या पावसाने सर्वत्र दुष्काळ निर्माण झाला आहे. या दुष्काळाचा सर्वांना मोठा फटका बसणार आहे. अशा स्थितीत जिल्हा प्रशासन जलसंधारण, कृषी विकास, ग्रामीण पायभूत सुविधा आदींच्या माध्यमातून दुष्काळावर मात करण्यासाठी उपाययोजना करत आहे. अकोला जिल्हा प्रशासनही सज्ज झाले असून, व्हीबीजी, जीरामजी अंतर्गत तलावांचे खोलीकरण, नाल्यांचे खोलीकरण, शेततळे, सिंचन विहिरी, बंधारा बांधकाम, तलावातील गाळ काढणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग, वृक्ष लागवड आदींची कामे हाती घेण्यात येत आहेत.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा, चारा उपलब्धता आणि नियोजित विकासकामांबाबतचे नियोजन करण्यात येत आहे. दुष्काळी स्थितीत प्राधान्याने करावयाच्या कामांबाबत शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार नियोजन पूर्णत्वास गेले आहे. पाण्याची उपलब्धता करून घेण्याबरोबरच पाणी बचतीवरही भर देण्यात येत आहे. यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. दुष्काळाच्या काळात नागरिकांच्या अडचणींचे वेळीच निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात २४ बाय ७ वॉर रूम सुरू करण्यात आली आहे.

IIT vs NIT Fees : IIT आणि NIT मध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या कुठे मिळतो कोट्यवधींचा पगार अन् कसा होतो प्रवेश

दरम्यान, नागरिकांसाठी ८०६५९०९८४४ हा संपर्क क्रमांक देण्यात आला आहेत. तसेच सर्व संबंधित यंत्रणांच्या उपस्थितीत दर मंगळवारी सायंकाळी ५ वाजता संपूर्ण जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे.

दुष्काळी परिस्थितीत वन्यप्राण्यांसाठी पाणवठे

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र असून दुष्काळी परिस्थितीत वन्यप्राण्यांसाठी जंगलातील नैसर्गिक पाणवठ्यांबरोबरच उपलब्ध पाणीस्रोत आवश्यकतेनुसार विकसित करण्यात येतील, अशी माहिती उपवनसंरक्षक सुमंत सोळंके यांनी दिली.

मोर्णा-महान जलवाहिनी

येत्या काही महिन्यांत पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता लक्षात घेऊन अकोला शहराच्या पाणीपुरवठ्‌यासाठी मोर्णा ते महान अशी २७ किलोमीटर जलवाहिनी टाकण्यात येत आहे. त्याद्वारे मोर्णा प्रकल्पातील पाणी महान प्रकल्पात सोडून नागरिकांची तहान भागविली जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त सुनील लहाने यांनी दिली.

वैरण विकास कार्यक्रमाला गती

दुष्काळाच्या काळात पशुधनासाठी चारा उपलब्ध राहावा यासाठी वैरण विकास कार्यक्रमाला गती देण्यात आली असून, २ हजार ५०० शेतकऱ्यांना बियाण्याचे वाटप करण्यात येणार आहे. त्याशिवाय जिल्ह्याबाहेरील जनावरांना चराईसाठी बंदी घालण्यात आली आहे. तसेच चाऱ्याच्या जिल्ह्याबाहेर वाहतूक व विक्रीस प्रतिबंध घालण्यात आले आहेत.

दुष्काळी उपाययोजनांसाठी निधीची तरतूद

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाातील आवश्यक लोकोपयोगी कामांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा, जलसंधारण आणि इतर आवश्यक दुष्काळी कामांना निधीची उपलब्धता करून देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आगामी काळात पाणीटंचाई आणि चाराटंचाई आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीच्या उपाययोजनांसोबत दीर्घकालीन नियोजनावरही भर दिला आहे.

Web Title: Administration in akola prepared for drought relief nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 11:22 AM

Topics:  

  • Water Issue

संबंधित बातम्या

राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती असताना गोसेखुर्द तुडुंब; पूर्व विदर्भातील 4 जिल्ह्यांच्या पाणी नियोजनाला मिळणार दिलासा
1

राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती असताना गोसेखुर्द तुडुंब; पूर्व विदर्भातील 4 जिल्ह्यांच्या पाणी नियोजनाला मिळणार दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.