Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अकोल्यात मुसळधार पावसाचा फटका; 24 घरांची पडझड तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

जूनमध्ये अपेक्षित पाऊस न झाल्याने आणि जुलैभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना महिन्याच्या अखेरीस मुसळधार पावसाचा सामना करावा लागला. तेल्हारा तालुक्यातील माळेगाव बाजार येथील जिल्हा परिषद उर्दू शाळा व आठवडीबाजार परिसरात पाणी शिरले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 02, 2026 | 03:07 PM
अकोल्यात मुसळधार पावसाचा फटका; 24 घरांची पडझड तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

अकोल्यात मुसळधार पावसाचा फटका; 24 घरांची पडझड तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

Follow Us
Follow Us:

अकोला : अकोला जिल्ह्यात सातपैकी सहा तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात २४ घरांची पडझड झाली, तर महानगरात पाच ठिकाणी झाडे उन्मळून पडून काही विद्युत खांबही कोसळले. अनेक भागात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.

जूनमध्ये अपेक्षित पाऊस न झाल्याने आणि जुलैभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना महिन्याच्या अखेरीस मुसळधार पावसाचा सामना करावा लागला. तेल्हारा तालुक्यातील माळेगाव बाजार येथील जिल्हा परिषद उर्दू शाळा व आठवडीबाजार परिसरात पाणी शिरले. अनेक ठिकाणी शेती खरडून गेल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाने तातडीने मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत आणि बाधित शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी पूरग्रस्त भागातून होत आहे.

अकोट तालुक्यात पिकांचे नुकसान

अकोट तालुक्यातील वरूळ, जऊळका, लोतखेड, दिनोडा, सावरगाव, विटाळी आणि खापरवाडी परिसरात गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे बळीराजा पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडला आहे. सावरगावजवळून वाहणाऱ्या पठार नाल्याकाठची कपाशी आणि तुरीची पिके पुराच्या प्रचंड प्रवाहामुळे जमीनदोस्त झाली असून, अनेक ठिकाणची सुपीक जमीन खरडून गेली आहे.

मोहाळी नदीला पूर, जनजीवन विस्कळीत

मुसळधार पावसामुळे पळसोद गावालगत वाहणाऱ्या मोहाळी नदीला पूर आला आहे. नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पुराचे पाणी दुतर्फा काठ ओलांडून थेट परिसरातील शेतांमध्ये शिरले आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडला आहे. पूर्णपणे शेतांमध्ये पुराचे पाणी साचल्याने नव्याने लावलेल्या कापूस पिकाच्या सऱ्या पाण्याखाली गेल्या आहेत. सततच्या संततधार पावसामुळे शेतांना तळ्याचे स्वरूप आले असून मातीचा चिखल झाला आहे.

ढगा गावात भिंत कोसळली

अकोट तालुक्यात झालेल्या पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या मुसळधार पावसाचा मोठा फटका अकोट तालुक्यातील ढगा येथील रहिवासी कैलास इंगळे यांच्या कुटुंबाला बसला आहे. त्यांच्या कच्च्या घराची भिंत मातीने ओल धरल्याने कमकुवत झाली होती. सर्वजण झोपेत असताना ही भिंत अचानक कोसळली. त्यावेळी सुदैवाने कुटुंबातील सर्व सदस्य दुसऱ्या खोलीत निद्रिस्त असल्याने अनर्थ टळला.

एल निनोचा अंदाज चुकला ! भारतीय मान्सूनने हवामानशास्त्रालाच दिले आव्हान, AI मॉडेल्सवरही प्रश्नचिन्ह

Web Title: Akola hit by heavy rains 24 houses damaged

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 03:07 PM

Topics:  

  • Akola Rain
  • Maharashtra Rain
  • Rain News

संबंधित बातम्या

Maharashtra Drought Declaration: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात १०० टक्के दुष्काळ जाहीर होणार
1

Maharashtra Drought Declaration: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात १०० टक्के दुष्काळ जाहीर होणार

सांगली जिल्ह्यात दुष्काळाची चाहूल; 54 महसूल मंडलांत 21 दिवसांहून अधिक पावसाचा खंड
2

सांगली जिल्ह्यात दुष्काळाची चाहूल; 54 महसूल मंडलांत 21 दिवसांहून अधिक पावसाचा खंड

राज्यात पावसाचे लवकरच होणार ‘कमबॅक’; 6 जिल्ह्यांत पाऊस, 20 विभागांमध्ये मुसळधारेचा इशारा
3

राज्यात पावसाचे लवकरच होणार ‘कमबॅक’; 6 जिल्ह्यांत पाऊस, 20 विभागांमध्ये मुसळधारेचा इशारा

Rain Update : पुन्हा पाऊस होणार…! मराठवाड्यासह कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज
4

Rain Update : पुन्हा पाऊस होणार…! मराठवाड्यासह कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.