Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात पावसाचे लवकरच होणार ‘कमबॅक’; 6 जिल्ह्यांत पाऊस, 20 विभागांमध्ये मुसळधारेचा इशारा

दीर्घ काळानंतर महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले आहे. मुंबई आणि पुण्यासह मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. मराठवाड्यातील 20 महसूल विभागांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 20, 2026 | 07:49 AM
महिनाभराने राज्यात पावसाचे पुनरागमन

महिनाभराने राज्यात पावसाचे पुनरागमन

Follow Us
Follow Us:

पुणे : सप्टेंबर महिना संपत आला असून, अद्यापही पावसाची चिन्हे दिसत नाहीत. त्यातच उन्हाचा कडाका वाढताना दिसत आहे. दीर्घ काळानंतर महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले होते. मुंबई आणि पुण्यासह मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याचे पाहिला मिळाले. मराठवाड्यातील 20 महसूल विभागांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली. यामुळे पिकांना दिलासा मिळाला आहे, परंतु धरणांमधील पाणीसाठ्यात अद्याप वाढ झालेली नाही.

हवामान विभागाने सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. परभणीत काल ५५.८ मिमी पावसाची नोंद झाली. १३ विभागांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली. झारीमध्ये १११.५ मिमी, सोनपेठमध्ये ९२ मिमी, रामपुरीमध्ये ८८ मिमी आणि वाघी धनोरामध्ये ६२.५ मिमी पावसाची नोंद झाली. बीडच्या पाच विभागांमध्ये अतिवृष्टी झाली. सिरसाला येथे सर्वाधिक ११२.५ मिमी पावसाची नोंद झाली.

राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता; विदर्भासह कोकणातही दिलासा मिळणार

त्याखालोखाल पिंपळगाव गाढे येथे १०७ मिमी, परळी येथे ८८ मिमी, घाट नांदूर येथे ७९.५ मिमी आणि बरदापूर येथे ७७.८ मिमी पावसाची नोंद झाली. दीर्घकाळच्या कोरड्या हवामानामुळे पिकांचे नुकसान झाले असून, उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

विदर्भात चांगल्या पावसाची प्रतीक्षा

आठ दिवसांनंतर भंडारा येथे अनेक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट झाला. यामुळे दमटपणापासून दिलासा मिळाला, परंतु विदर्भात पावसाची परिस्थिती सर्वत्र सारखी नाही. अनेक भाग अजूनही चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

लातूरमध्ये 42 दिवसांनंतर नद्या लागल्या वाहू

लातूरमधील सर्व तालुक्यांमध्ये ४२ दिवसांनंतर पाऊस झाला. लातूरमध्ये ८३ मिमी, तर रेणापूरमध्ये ७९ मिमी पावसाची नोंद झाली. पावसानंतर, या मान्सूनमध्ये पहिल्यांदाच तेरणा आणि रेणा नद्या वाहू लागल्या. यामुळे सुकलेल्या पिकांना दिलासा मिळाला, परंतु पिण्याच्या पाण्याच्या संकटाची चिंता कायम आहे. हिंगोलीमध्ये ३७ मिमी पाऊस झाला. सोयाबीन वगळता इतर पिकांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे. नांदेडमध्ये १९.५० मिमी पावसाची नोंद झाली.

22 सप्टेंबरपर्यंत पावसाचा अंदाज

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल पाहिला मिळत आहे. पुणे शहर आणि परिसरात पावसाने उघडीप दिल्याचे दिसून आले. त्यात ऑक्टोबर महिना सुरु होण्यापूर्वीच आता उन्हाचा कडाका जाणवू लागला आहे. नैर्ऋत्य मान्सूनही 19 सप्टेंबरपासून माघारीचा टप्पा गाठत आहे. पश्चिम राजस्थानातून सप्टेंबर अखेर आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीला तो महाराष्ट्रातून जाणार आहे. त्यामुळे राज्यात परतीचा मान्सून चांगला बरसू शकतो.

Web Title: Rain in 6 districts heavy rainfall warning for 20 divisions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 07:42 AM

Topics:  

  • Climate Change
  • Maharashtra Rain
  • Weather Update

संबंधित बातम्या

Rain Update : पुन्हा पाऊस होणार…! मराठवाड्यासह कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज
1

Rain Update : पुन्हा पाऊस होणार…! मराठवाड्यासह कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज

Weather Update : पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! राज्यात 22 सप्‍टेंबरपर्यंत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज
2

Weather Update : पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! राज्यात 22 सप्‍टेंबरपर्यंत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज

Weather Update : राज्यभरात पावसाचा मोठा खंड; पाणीटंचाईची निर्माण झाली धास्ती, प्रशासन सतर्क
3

Weather Update : राज्यभरात पावसाचा मोठा खंड; पाणीटंचाईची निर्माण झाली धास्ती, प्रशासन सतर्क

राज्यात सरासरीपेक्षा 16.5 टक्के कमी पाऊस; खरीप पिकांना निर्माण झाला धोका
4

राज्यात सरासरीपेक्षा 16.5 टक्के कमी पाऊस; खरीप पिकांना निर्माण झाला धोका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.