Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अकोल्याच्या जवानानं वीरमरण पत्करलं! कीर्ति चक्र घेताना आईचा अश्रूंचा बांध फुटला; राष्ट्रपतींच्या गळ्यात पडून माय धाय मोकलून रडली

महाराष्ट्राचे सुपुत्र आणि भारतीय सैन्यातील शूर जवान प्रवीण जंजाळ यांना सोमवारी नवी दिल्ली येथे आयोजित समारंभात मरणोत्तर कीर्ती चक्र प्रदान करण्यात आले. गेल्या वर्षी जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे दहशतवाद्यांशी लढताना त्यांनी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान दिले होते.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 09, 2026 | 06:35 PM
अकोल्याच्या जवानानं वीरमरण पत्करलं! कीर्ति चक्र घेताना आईचा अश्रूंचा बांध फुटला; राष्ट्रपतींच्या गळ्यात पडून माय धाय मोकलून रडली
Follow Us
Follow Us:

महाराष्ट्राचे सुपुत्र आणि भारतीय सैन्यातील शूर जवान प्रवीण जंजाळ यांना सोमवारी नवी दिल्ली येथे आयोजित समारंभात मरणोत्तर कीर्ती चक्र प्रदान करण्यात आले. गेल्या वर्षी जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे दहशतवाद्यांशी लढताना त्यांनी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान दिले होते.

प्रवीण जंजाळ हे महार रेजिमेंटच्या पहिल्या बटालियन राष्ट्रीय रायफल्समध्ये कार्यरत होते. राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात त्यांच्या आई शालू जंजाळ आणि पत्नी श्यामबाला जंजाळ यांनी हा सन्मान स्वीकारला. यावेळी उपस्थितांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले.

Territorial Army Recruitment 2026: 161 पदांसाठी भरती जाहीर, ‘हे …

प्रवीण जंजाळ यांच्या शौर्याची माहिती समारंभात वाचून दाखवण्यात आली. आपल्या मुलाच्या पराक्रमाची कहाणी ऐकताना आई शालू जंजाळ यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. कीर्ती चक्र स्वीकारण्यासाठी त्या राष्ट्रपतींच्या व्यासपीठाजवळ पोहोचल्या तेव्हा त्यांना रडू अनावर झाले. हा हृदयस्पर्शी क्षण पाहून उपस्थित अनेकांचे डोळे पाणावले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना धीर देत आलिंगन दिले. या समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शहीद जवानाच्या आईचे दुःख आणि अभिमान यांचा संगम असलेला हा क्षण प्रत्येकाच्या मनाला भिडणारा ठरला.

 

प्रवीण जंजाळ हे 6 जुलै 2024 रोजी जम्मू-काश्मीरच्या कुलगाम भागात दहशतवादविरोधी मोहिमेत सहभागी होते. संशयास्पद हालचाली दिसताच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सतर्क केले. त्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. मात्र प्रवीण यांनी न घाबरता त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी दोन दहशतवाद्यांचा खातमा केला. मात्र चकमकीदरम्यान त्यांच्या डोक्यात गोळी लागली आणि ते गंभीर जखमी झाले. तरीही त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत लढा सुरू ठेवला. देशरक्षण करताना त्यांनी वीरमरण पत्करले.

अवघ्या 24 व्या वर्षी देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शिपाई प्रवीण जंजाळ यांच्या अद्वितीय शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि देशभक्तीच्या गौरवार्थ त्यांना मरणोत्तर कीर्ती चक्र प्रदान करण्यात आले. त्यांचे बलिदान देशवासीयांना कायम प्रेरणा देत राहील.

 

Web Title: Akola shahid javan pravin janjal kirti chakra honour

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 05:29 PM

Topics:  

  • army
  • indian Soldiers
  • jammu -kshmir

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.