Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीला सुरुवात; पहिल्या टप्प्यातील यादी जाहीर, तब्बल ‘इतक्या’ शेतकऱ्यांची निवड

पहिल्या यादीतील शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणासाठी मोबाईलवर एसएमएस पाठविण्यात येणार आहे. ग्रामपंचायत, संबंधित सहकारी संस्था आणि बँक शाखांमध्येही लाभार्थ्यांची यादी उपलब्ध असेल.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 23, 2026 | 09:37 AM
अकोल्यातील शेतकऱ्यांना दोन कोटींची मदत; मदतीच्या रकमेतून कर्जवसुली नको, शासनाचे बँकांना स्पष्ट आदेश

अकोल्यातील शेतकऱ्यांना दोन कोटींची मदत; मदतीच्या रकमेतून कर्जवसुली नको, शासनाचे बँकांना स्पष्ट आदेश

Follow Us
Follow Us:

अकोला : अवकाळी पावसामुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठे पाऊल उचलत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत कर्जमाफीची अंमलबजावणी सुरू केली. बुधवारी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. पहिल्या टप्प्यात राज्यातील सात जिल्ह्यांतील ५३३ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून, आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या कर्ज खात्यात डीबीटीद्वारे थेट लाभ जमा केला जाणार आहे.

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. २ जून २०२६ रोजी मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर ही योजना लागू करण्यात आली. त्यानंतर १५ जुलै रोजी पात्रतेच्या काही निकषांमध्ये बदल करण्यात आले. या योजनेसाठी ३० जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, १२ राष्ट्रीयीकृत बँका तसेच इतर खासगी बँकांसह एकूण ५३ बँकांनी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांची माहिती महाआयटीच्या पोर्टलवर अपलोड केली. पात्रता व अपात्रतेची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली.

आधार व्हेरिफिकेशनसाठी SMS

पहिल्या यादीतील शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणासाठी मोबाईलवर एसएमएस पाठविण्यात येणार आहे. ग्रामपंचायत, संबंधित सहकारी संस्था आणि बँक शाखांमध्येही लाभार्थ्यांची यादी उपलब्ध असेल. शेतकऱ्यांना आधार क्रमांक किंवा विशेष ओळख क्रमांकाद्वारे प्रमाणीकरण करावे लागणार आहे.

खरीप २०२६ पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट

खरीप २०२६ हंगामासाठी १३ जुलैपर्यंतच्या पीककर्ज वितरणाची आकडेवारीही जाहीर करण्यात आली आहे. नाबार्डच्या वार्षिक पतयोजनेनुसार राज्यासाठी ७५ हजार ४४९ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यापैकी खरीपासाठी ५२ हजार ८२२ कोटी, तर रब्बीसाठी २२ हजार ६२७ कोटी रुपये वाटपाचे लक्ष्य आहे. यंदा ६४ लाख शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

31 जुलैपर्यंत पहिला टप्पा पूर्ण

राज्यातील सुमारे 32 हजार ‘आपले सरकार सेवा केंद्रां’मध्ये आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी शेतकऱ्यांची अॅग्रीस्टॅकवर नोंदणी अनिवार्य असेल. प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर लाभाची रक्कम डीबीटीद्वारे थेट कर्ज खात्यात जमा केली जाईल. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांतील पात्र शेतकऱ्यांची प्रक्रिया ३१ जुलै २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य असून, त्यानंतर व्यावसायिक बँकांतील पात्र शेतकऱ्यांनाही योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

आसाममध्ये मुसळधार पावसानंतर आता पुराचा तडाखा; आत्तापर्यंत 300 हून अधिक लोकांचा मृत्यू, जनजीवन विस्कळीत

Web Title: Farm loan waivers begin in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 09:37 AM

Topics:  

  • Farmer Loan Waiver
  • maharashtra farmers

संबंधित बातम्या

कर्जमुक्तीच्या दुसऱ्या यादीत पुणे विभागातील 23117 शेतकरी; सहकारमंत्र्यांनी केले ‘हे’ आवाहन
1

कर्जमुक्तीच्या दुसऱ्या यादीत पुणे विभागातील 23117 शेतकरी; सहकारमंत्र्यांनी केले ‘हे’ आवाहन

केवळ 8 महिन्यात तब्बल 102 शेतकऱ्यांनी केली आत्महत्या; नापिकी, आर्थिक संकट ठरलं मुख्य कारण
2

केवळ 8 महिन्यात तब्बल 102 शेतकऱ्यांनी केली आत्महत्या; नापिकी, आर्थिक संकट ठरलं मुख्य कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.