Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pandharpur News : दुष्काळात पशुधनाला मिळणार चाऱ्याची संजीवनी ! चारा लागवडीसाठी १.५५ लाखांचे अनुदान

Pandharpur News : दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी हिरवा चारा उपलब्ध व्हावा आणि ग्रामीण मजुरांना रोजगार मिळावा, यासाठी राज्य शासनाने सुधारित चारा लागवड योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत वैयक्तिक जमिनीवर चारा लागवडीसाठी १ लाख २१ हजार ८१५ रुपये, तर सार्वजनिक जमिनीवर १ लाख ५५ हजार ३ रुपये अनुदानाची तरतूद आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 09, 2026 | 07:28 PM
Government Agriculture Scheme ( सरकारी कृषी योजना )

Government Agriculture Scheme ( सरकारी कृषी योजना )

Follow Us
Follow Us:
  • हेक्टरी पिकनिहाय अनुदान 
  • अल्पभूधारक, महिला शेतकऱ्यांना प्राधान्य  
  • पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा 
Pandharpur News :  पावसाने पाठ फिरवली, खरीप पिके करपली, रब्बीची आशाही धूसर झाली.आता शेतकऱ्यांसमोर स्वतःच्या कुटुंबासह पशुधन जगविण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. अशा दुष्काळी परिस्थितीत जनावरांना हिरवा चारा उपलब्ध करून देण्याबरोबरच ग्रामीण मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी राज्य शासनाने विशेष चारा लागवड योजनेला चालना दिली आहे. विकसित भारत रोजगार व आजीविका हमी मिशनअंतर्गत मका, ज्वारी, बाजरी, नेपीयर गवत, मेथीघास आदी चारा पिकांच्या लागवडीसाठी अनुदान देण्याचा सुधारित आदेश ६ नोव्हेंबर रोजी काढण्यात आला आहे.

या योजनेत वैयक्तिक जमिनीवर चारा लागवडीसाठी १ लाख २१ हजार ८१५ रुपये, तर सार्वजनिक जमिनीवर तब्बल १ लाख ५५ हजार ३ रुपये अनुदान मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे दुष्काळात पशुधनाला संजीवनी आणि मजुरांना रोजगार, असा दुहेरी लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.

पंढरपूर तालुक्यातील सर्व पशुपालकांनी चारा लागवड करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन पंढरपूर पंचायत समितीचे सभापती डॉ. शुभम आगवणे यांनी केले आहे. यंदाच्या पावसाळ्यात सोलापूर जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ५१ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून, पाण्याअभावी उभी पिकेही होरपळली आहेत.

रब्बी हंगामासाठी पुरेसा पाऊस नसल्याने हिरव्या चाऱ्याचे उत्पादनही धोक्यात आले आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर असलेल्या पशुधनासाठी चारा उपलब्ध करणे हे शेतकऱ्यांसमोरील गंभीर आव्हान बनले आहे. जनावरांना जगवायचे कसे, असा प्रश्न पशुपालकांना सतावत असताना शासनाने चारा लागवडीसाठी स्वतंत्र सुधारित आदेश काढून दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

या योजनेत मका, ज्वारी, बाजरी, नेपीयर गवत, मेथीघास, लसूणघास, ज्वारी मल्टीकट आणि बाजरी मल्टीकट अशा विविध चारा पिकांच्या लागवडीला मंजुरी देण्यात आली आहे. शासकीय गायरान तसेच वैयक्तिक शेतजमिनीवर चारा उत्पादन घेता येणार आहे. विशेष म्हणजे, केवळ चारा डेपो उभारण्याऐवजी गावातच हिरव्या चाऱ्याचे उत्पादन वाढवून टंचाईवर कायमस्वरूपी उपाय करण्याचा या योजनेचा उद्देश आहे.

चारा टंचाईमुळे पशुधन विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये, तसेच गावपातळीवरच हिरव्या चाऱ्याचे उत्पादन वाढावे, हा या योजनेमागील हेतू आहे. शासनाच्या या योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास जनावरांच्या चारा प्रश्नाला दिलासा मिळण्याबरोबरच ग्रामीण भागातील बेरोजगार हातांनाही काम मिळू शकणार आहे.

हेक्टरी पिकनिहाय अनुदान

शासनाच्या तरतुदीनुसार बाजरी लागवडीसाठी हेक्टरी ३५ हजार ५०५ रुपये, ज्वारीसाठी ४२ हजार ७७८ रुपये, नेपीयर गवतासाठी ७६ हजार रुपये, लसूणघासासाठी १ लाख १३ हजार २९० रुपये, तर ज्वारी मल्टीकटसाठी ५१ हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. बाजरी मल्टीकटसाठीही अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे.

चारा लागवड योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पशुधनासाठी चारा उत्पादनाबरोबरच ग्रामीण मजुरांना रोजगार उपलब्ध होणार आहे. प्रति एकर चारा लागवडीसाठी २४५ मनुष्यदिवसांच्या मजुरीची तरतूद करण्यात आली आहे. त्यापोटी ७७ हजार ६६५ रुपये मजुरांच्या खात्यात जमा होणार आहेत.

जमीन तयार करणे, बियाणे, खते आणि सिंचन व्यवस्थेसाठी ४४ हजार १५० रुपयांचा निधी उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे चारा उत्पादनासोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही आधार मिळणार आहे. चारा लागवडीसाठी जमिनीची साफसफाई, पूर्वमशागत, रोटावेटर, सरी पाडणे, बियाणे, बीजप्रक्रिया, टोकण पद्धतीने लागवड, खत व्यवस्थापन, सहा वेळा पाणी देणे, खुरपणी, कीड व्यवस्थापन, कापणी, मका कुट्टी, मुरघास तयार करणे आणि बॅगा भरणे अशा विविध कामांचा समावेश आहे. या कामांसाठी ९५ दिवस रोजगार उपलब्ध होणार असून अकुशल कामासाठी ३० हजार ११५ रुपये, तर कुशल कामासाठी १७ हजार ११२ रुपये असे एकूण ४७ हजार ३०७ रुपयांचे अनुदान दिले जाणार असल्याची तरतूद आदेशात नमूद आहे.

अल्पभूधारक, महिला शेतकऱ्यांना प्राधान्य

या योजनेत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी, अनुसूचित जाती-जमातीतील शेतकरी तसेच महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. चारा लागवडीसाठी किमान ५० गुंठे ते एक एकर क्षेत्र असणे आवश्यक असून, चारा पिकांच्या वाढीसाठी किमान सिंचन सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी आपल्या ग्रामपंचायतीतील रोजगार सेवक किंवा ग्रामसेवक यांच्याकडे विहित नमुन्यात अर्ज करावा. अर्जासोबत सातबारा उतारा, आठ-अ दाखला, आधारकार्ड, बँक पासबुकची छायाप्रत आणि जॉब कार्ड जोडणे आवश्यक आहे.

Gokul President Election 2026 : ‘येताना चालत येतील, जाताना खांद्यावरून जातील’; राजू शेट्टींचा शासननियुक्त संचालकांना इशारा

पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा

दुष्काळी परिस्थितीत पशुधनाचे संरक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी असून, आगामी काळात निर्माण होणाऱ्या चारा टंचाईवर मात करण्यासाठी चारा लागवडीचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. पंढरपूर तालुक्यातील सर्व शेतकरी व पशुपालकांनी मका, ज्वारी, मेथीघास यांसारख्या चारा पिकांची लागवड करून जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करावी. शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत चारा लागवडीसाठी उपलब्ध असलेल्या अनुदानाचा जास्तीत जास्त पशुपालकांनी लाभ घ्यावा. यासाठी पशुपालकांनी पुढाकार घेऊन चारा लागवडीचे नियोजन करावे, असे आवाहन पंढरपूर समितीचे सभापती डॉ. शुभम आगवणे यांनी केले आहे.

Pune Metro News : पुणे मेट्रो लाइन ३ साठी सीमेन्सचे अत्याधुनिक तंत्रज्ञान; हिंजवडी ते शिवाजीनगर प्रवासाचा वेळ ५० टक्क्यांनी कमी हो

Web Title: Pandharpur fodder cultivation scheme subsidy maharashtra 2026 sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 07:28 PM

Topics:  

  • Farmer Crisis
  • Farmer Loan Waiver

संबंधित बातम्या

Wardha News: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दिलासा! १.५१ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये जमा
1

Wardha News: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दिलासा! १.५१ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये जमा

Rajnala Right Canal :  कर्जतच्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी ! ४० गावांतील शेतीला मिळणार पाणी
2

Rajnala Right Canal : कर्जतच्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी ! ४० गावांतील शेतीला मिळणार पाणी

Sambhajinagar Farmer Relief : दिवाळीपूर्वी २.३९ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत ५,००० रुपयांची आगाऊ मदत जमा
3

Sambhajinagar Farmer Relief : दिवाळीपूर्वी २.३९ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत ५,००० रुपयांची आगाऊ मदत जमा

Rabi season water schedule 2026 : शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ! रब्बीला दोन, उन्हाळ्यात एक आवर्तन
4

Rabi season water schedule 2026 : शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ! रब्बीला दोन, उन्हाळ्यात एक आवर्तन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.