Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोपटखेड पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; धरणाचे दोन दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना…

पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातील जलसाठ्‌यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलसंपदा विभाग परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. तसेच कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 16, 2026 | 03:20 PM
पोपटखेड पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; धरणाचे दोन दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना...

पोपटखेड पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; धरणाचे दोन दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना...

Follow Us
Follow Us:

अकोला : सातपुड्‌याच्या पायथ्याशी असलेल्या अकोट तालुक्यातील पोपटखेड प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातील जलसाठ्‌यात वाढ झाली आहे. धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रकल्पाचे दार क्रमांक १ आणि ४ प्रत्येकी २ सेंटीमीटरने उघडण्यात आले. या दोन्ही दरवाजांतून एकूण ९५.४२ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.

सातपुडा पर्वतरांगांमध्ये शनिवारी मध्यरात्रीनंतर तसेच रविवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढला. परिणामी, पोपटखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली. धरणातील जलपातळी वाढत असल्याने जलसंपदा विभागाने परिस्थितीचा आढावा घेत सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा भाग म्हणून दोन दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला. धरण प्रशासनाच्या माहितीनुसार, सध्या नदीपात्रात ९५.४२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Maharashtra Cabinet Decisions : देवेंद्र फडणवीसांचे मोठे निर्णय! ‘महा-टॅक’ कक्ष स्थापन; साखर कारखान्यांना मिळणार सॉफ्ट लोन

पाणलोट क्षेत्रातून होणाऱ्या आवकेनुसार विसर्गाच्या प्रमाणात आवश्यकतेनुसार वाढ किंवा घट केली जाऊ शकते. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातील जलसाठ्‌यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलसंपदा विभाग परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. तसेच कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सातपुडा परिसरात दमदार पाऊस

सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये सुरू असलेल्या दमदार पावसामुळे अकोट तालुक्यातील नद्या, नाले आणि ओड्यांच्या पाणीपातळीतही वाढ होत आहे. त्यामुळे शेतकरी, नागरिक तसेच नदीपात्रालगत राहणाऱ्या ग्रामस्थांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

राज्यात सरासरीपेक्षा 16.5 टक्के कमी पाऊस

महाराष्ट्रात १ जून ते ६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सरासरीच्या तुलनेत केवळ ८३.५ टक्के पाऊस झाला, म्हणजेच सरासरीपेक्षा १६.५ टक्के कमी पाऊस झाला. दीर्घकाळच्या दुष्काळामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांतील खरीप पिकांना धोका निर्माण झाला आहे. बीडमध्ये सरासरीच्या तुलनेत ६८.५ टक्के पाऊस झाला.

गडचिरोली जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी; देसाईगंजमध्ये सर्वाधिक 145 मिमी पाऊस

Web Title: Heavy rainfall in the popatkhed watershed area

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • akola news
  • Heavy Rainfall

संबंधित बातम्या

वीज केंद्राचे काम रखडल्याने शेतकरी त्रस्त; वर्षभरापासून काम थंड, पिके वाचवण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान
1

वीज केंद्राचे काम रखडल्याने शेतकरी त्रस्त; वर्षभरापासून काम थंड, पिके वाचवण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान

गडचिरोली जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी; देसाईगंजमध्ये सर्वाधिक 145 मिमी पाऊस
2

गडचिरोली जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी; देसाईगंजमध्ये सर्वाधिक 145 मिमी पाऊस

बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांसमोरील आव्हाने वाढली; खरीप कांदा लागवडीचा अभिनव प्रयोग
3

बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांसमोरील आव्हाने वाढली; खरीप कांदा लागवडीचा अभिनव प्रयोग

अकोला जिल्ह्यातील 329 शाळांमध्ये शिक्षिकाच नाही; महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण आयोगाकडून गंभीर दखल
4

अकोला जिल्ह्यातील 329 शाळांमध्ये शिक्षिकाच नाही; महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण आयोगाकडून गंभीर दखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.