Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अकोल्यात जलजन्य आजारांनी वाढवली चिंता; उपाययोजनेच्या नावाखाली केवळ ब्लिचिंग पावडरचा वापर

दरवर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर जलजन्य आणि विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढते. त्यांच्या प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणेकडून विविध उपाययोजना राबवण्यात येतात.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 05, 2026 | 01:50 PM
अकोल्यात जलजन्य आजारांनी वाढवली चिंता; उपाययोजनेच्या नावाखाली केवळ ब्लिचिंग पावडरचा वापर

अकोल्यात जलजन्य आजारांनी वाढवली चिंता; उपाययोजनेच्या नावाखाली केवळ ब्लिचिंग पावडरचा वापर

Follow Us
Follow Us:

अकोला : सध्या अकोला शहरात व्हायरल फिव्हरच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून, अनेक ठिकाणी सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. शहरातील अनेक खाजगी रुग्णांनी दवाखाने गजबजलेले दिसत आहेत. आजारांवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महापालिका प्रशासनाकडून फवारणी आणि ब्लिचिंग पावडर टाकण्याची कारवाई केली जात आहे.

महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, सध्या शहरात मलेरियाचा एकही रुग्ण नसून डेंग्यूचे १० रुग्ण आढळले आहेत. तसेच मागील आठवड्यात स्वाईन फ्लूचे तीन रुग्ण होते. उपचारानंतर तिन्ही रुग्ण बरे झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. दरवर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर जलजन्य आणि विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढते. त्यांच्या प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणेकडून विविध उपाययोजना राबवण्यात येतात. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण कमी असून, गेल्या महिनाभरापासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे बदलत्या वातावरणाचा परिणाम आरोग्यावर होत असून, व्हायरल फिव्हरसह सर्दी, पडसे, खोकला आणि तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.

पावसाळ्यात जलजन्य आजारांचा धोका

शहरात सध्या डासांचा प्रादुर्भाव कमी असला तरी विविध भागांत फवारणी सुरू करण्यात आली आहे. डेंग्यूचे रुग्ण आढळलेल्या परिसरात विशेष खबरदारी घेतली जात आहे. दूषित पाण्यामुळे विविध आजार होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पिण्याचे पाणी गाळून आणि उकळून प्यावे. तसेच घरात पाण्याची साठवणूक केली जात असल्यास आठवड्यातून किमान एक दिवस कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

पिण्याचे पाणी गाळून-उकळून प्यावे

सध्या ग्रामीण भागात कसल्याही प्रकारचा जलजन्य आजाराचा प्रादुर्भाव नसून नागरिकांनी तरीही नागरिकांनी पिण्याचे पाणी गाळून व उकळून प्यावे. नेहमी उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणी पिण्यासाठी वापरावे. उघड्यावरील किंवा रस्त्यावरील थंड पेय टाळावे. घरात बनविलेले ताजे व गरम जेवण घ्यावे. स्ट्रीट फुड खाणे टाळावे. घराभोवती किंवा कुंड्यांमध्ये पाणी साचू देऊ नये.

डेंग्यू, चिकुनगुनियाचे वाढत आहेत रुग्ण

पावसाळ्यात जलजन्य आजारांचा धोका वाढत असल्याने नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. पाऊस थांबल्यानंतर वातावरणात होणाऱ्या बदलामुळे विविध आजारांचा प्रादुर्भाव वाढत असून डेंग्यू, चिकुनगुनियासह इतर आजारांचे रुग्ण आढळत आहेत.

नागरिकांनी खबरदारी घ्यावी

सध्या जिल्ह्यात जलजन्य आजारांचा उद्रेक नसला तरी शहरी भागात डेंग्यूचे १० रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. परिस्थिती सध्या नियंत्रणात असली तरी आगामी काळात डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया, डायरिया आदी आजारांपासून बचावासाठी नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

‘हातात मोबाईल पण मनात कान्हा !’ पुण्यात चिमुकल्यांसाठी पारंपरिक पोशाख अन् सजावटीच्या वस्तूंची खरेदी जोरात

Web Title: Waterborne diseases raise concern in akola

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 01:50 PM

Topics:  

  • akola news
  • Water Issue

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांचा सरकारविरोधात एल्गार; कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
1

शेतकऱ्यांचा सरकारविरोधात एल्गार; कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

माण तालुक्यातील मुरुमशेंडा वस्तीत विहिरी-बोअरवेलचे पाणी दूषित; लहान मुले, महिला-पुरुषांच्या अंगावर जखमा
2

माण तालुक्यातील मुरुमशेंडा वस्तीत विहिरी-बोअरवेलचे पाणी दूषित; लहान मुले, महिला-पुरुषांच्या अंगावर जखमा

अकोल्यात प्रारूप यादीत 2 लाख मतदारांची नावे वगळली; SIR नंतर 13.18 लाख मतदारांचा समावेश
3

अकोल्यात प्रारूप यादीत 2 लाख मतदारांची नावे वगळली; SIR नंतर 13.18 लाख मतदारांचा समावेश

प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा तुटवडा; रुग्णांचे आरोग्य धोक्यात, सुविधा मिळवण्यासाठी…
4

प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा तुटवडा; रुग्णांचे आरोग्य धोक्यात, सुविधा मिळवण्यासाठी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.