Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola News: निवडणुकीची रंगत वाढली! प्रचारासाठी उरले फक्त ४ दिवस, काउंटडाऊन झाला सुरू

Akola Election News: 15 जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघ्या 4 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे उमेदवार दिवसरात्र एक करून प्रचार करण्यावर अधिक भर देत आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 10, 2026 | 11:33 AM
Akola News: निवडणुकीची रंगत वाढली! प्रचारासाठी उरले फक्त ४ दिवस, काउंटडाऊन झाला सुरू

Akola News: निवडणुकीची रंगत वाढली! प्रचारासाठी उरले फक्त ४ दिवस, काउंटडाऊन झाला सुरू

Follow Us
Close
Follow Us:
  • उमेदवारांकडे प्रचारासाठी उरले फक्त ४ दिवस
  • रणधुमाळीत आता शेवटचे ४ दिवस
  • निवडणूक रणसंग्राम निर्णायक टप्प्यात
अकोला: महापालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम आता काउंटडाऊनकडे वाटचाल करीत असून, उमेदवारांना आपल्या प्रचारासाठी केवळ शेवटचे ४ दिवस शिल्लक राहिल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मंगळवारी (दि. १३) सायंकाळी ५.३० वाजता जाहीर प्रचाराची तोफ थंडावणार असून, त्यानंतर केवळ छुप्या प्रचाराला (डोअर टू डोअर) सुरुवात होईल. अवघ्या ४ दिवसांचा अवधी हातात असल्याने उमेदवारांनी रात्रंदिवस एक करण्यास सुरुवात केली. मात्र, या धावपळीत पॅनलमधील ताळमेळाअभावी पक्षांची डोकेदुखी वाढली आहे.

सत्ताधाऱ्यांची गुंडगिरी, ‘स्थानिक’च्या निवडणुकीत राज्यात तीन खून; हर्षवर्धन सपकाळांचा आरोप

निवडणूक जाहीर झाल्यापासून आतापर्यंत ६ दिवसांचा कालावधी उलटला असला तरी, मतदारांपर्यंत पोहोचणे अनेक उमेदवारांना अद्याप शक्य झालेले नाही. मोठ्या प्रभागांमुळे प्रत्येक मतदाराच्या दारापर्यंत पोहोचण्याचे आव्हान मोठे आहे. हातात उरलेल्या या ४ दिवसात सभा, पदयात्रा आणि कॉर्नर सभांचे नियोजन कोलमडताना दिसत आहे. त्यातच थंडीचा कडाका आणि मतदारांची उदासीनतेमुळे उमेदवारांची दमछाक होत आहे. प्रभाग पद्धतीच्या या निवडणुकीत राजकीय पक्षांनी ३ किंवा ४ उमेदवारांचे पॅनल मैदानात उतरवले आहे. सुरुवातीला एकच गट, उमेदवार आता मतदानाचा दिवस जवळ येताच विखुरले गेल्याचे चित्र आहे. पॅनलमधील एखादा उमेदवार जनसंपर्कात कमी असेल किंवा मतदारांमध्ये त्याच्याबद्दल नाराजी असेल, तर त्याचा फटका संपूर्ण पॅनलला बसतो, असे बोलले जात आहे.  (फोटो सौजन्य – AI Created)

नवख्या उमेदवारांची कसरत अनेक

प्रभागांत दिग्गज उमेदवारांसोबत असे काही उमेदवार दिले गेले आहेत, ज्यांना राजकारणाचा कोणताही गंध नाही. अशा नवख्या उमेदवारांना सोबत घेऊन चालणे दिग्गजांसाठी कठीण जात आहे. त्यांना प्रचाराची पद्धत, मतदारांशी बोलण्याची शैली आणि राजकीय गणिते समजून सांगण्यातच मोठा वेळ खर्ची पडत आहेत.

वैयक्तिक ब्रँडिंगवर भर

कमकुवत उमेदवारांमुळे आपण पराभवाच्या खाईत का पडावे? या भावनेतून दिग्गज उमेदवारांनी आता पॅनलचा प्रचार करण्याऐवजी स्वतःच्या वैयक्तिक प्रचारावर आणि स्वतःच्या चिन्हावर भर दिला आहे. अनेक प्रभागांत दिग्गज उमेदवारांनी आपल्या साथीदारांना मागे सारून स्वतंत्रपणे मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली.

Palghar News: खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून लघु उद्योजकाची आत्महत्या, गुन्हा दाखल

कार्यकर्त्यांमध्ये मरगळ

निवडणुकीच्या या रणसंग्रामात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील प्रचाराचा फरक प्रकर्षाने जाणवत आहे, भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभा झाल्याने तेथील कार्यकत्यांमध्ये उत्साह आहे. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या मोठ्या नेत्यांच्या सभा अद्याप झालेल्या नाहीत. यामुळे या पक्षांच्या उमेदवारांना प्रचारात एकाकी पडल्यासारखे वाटत असून, कार्यकर्त्यांमध्ये मरगळ दिसून येत आहे. राष्ट्रवादी (अजित पवार गट) भाजपसोबत सत्तेत असल्याने त्यांना वरिष्ठांच्या पाठबळाची फारशी चिंता नसल्याचे दिसत आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Maharashtra local body election update last 4 days left for election campaign akola news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2026 | 11:33 AM

Topics:  

  • Akola
  • Local Body Election
  • Maharashtra Local Body Election

संबंधित बातम्या

Crime News: पुण्यातील मतदारांना पैशांचे आमिष? बाणेर पोलिसांकडून गुन्हा दाखल
1

Crime News: पुण्यातील मतदारांना पैशांचे आमिष? बाणेर पोलिसांकडून गुन्हा दाखल

Pune News: गप्प बसायचं नाही… आता! हर्षवर्धन सपकाळ यांचा भाजपवर आरोप; म्हणाले…
2

Pune News: गप्प बसायचं नाही… आता! हर्षवर्धन सपकाळ यांचा भाजपवर आरोप; म्हणाले…

Maharashtra Politics: ‘लाडकी बहीण योजने’वर मुख्यमंत्री स्पष्टच बोलले; म्हणाले, “देवाभाऊ आहे तोवर…”
3

Maharashtra Politics: ‘लाडकी बहीण योजने’वर मुख्यमंत्री स्पष्टच बोलले; म्हणाले, “देवाभाऊ आहे तोवर…”

Malegaon Election : मतदान करा अन् खरेदीवर सूट मिळवा! मालेगावच्या कापड व्यापारी असोसिएशनतर्फे अनोखी जनजागृती मोहीम
4

Malegaon Election : मतदान करा अन् खरेदीवर सूट मिळवा! मालेगावच्या कापड व्यापारी असोसिएशनतर्फे अनोखी जनजागृती मोहीम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.