Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अकोला शहरात मोकाट श्वानांचा हैदोस, अनेकांना चावा; श्वानांचे निर्बिजीकरणावर प्रश्न

शहरातील भटक्या श्वानांचा वाढता उपद्रव लक्षात घेता, त्यांच्या निर्बिजीकरण शस्त्रक्रियांसह श्वानदंशावरील लसीकरणासाठी कंत्राटदार संस्थेने शासनाच्या निर्धारित दरापेक्षा कमी दराने सादर केलेल्या निविदेला स्थायी समितीने बहुमताने मंजुरी दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 22, 2026 | 03:26 PM
अकोला शहरात मोकाट श्वानांचा हैदोस, अनेकांना चावा; श्वानांचे निर्बिजीकरण कागदावरच

अकोला शहरात मोकाट श्वानांचा हैदोस, अनेकांना चावा; श्वानांचे निर्बिजीकरण कागदावरच

Follow Us
Follow Us:
  • मोकाट श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय
  • नायगाव डम्पिंग ग्राउंडवर शेल्टर होम
  • शहरात 15 हजारांवर मोकाट श्वान
अकोला : मोकाट श्वानांची संख्या नियंत्रित करण्यासाठी महापालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींकडून निर्बिजीकरण मोहीम राबविली जाते. मात्र, या मोहिमेतील त्रुटी, संथगती आणि निविदा प्रक्रियेतील विष्टकामुळे शहरात मोकाट श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अकोला शहरातील मोकाट श्वानांच्या निर्बिजीकरणासाठी संस्थांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने हे काम रखडले आहे. दोनदा निविदा प्रसिद्ध करूनही प्रतिसाद न मिळाल्याने महापालिकेने तिसऱ्यांदा निविदा काढली.

Amravati News : श्वानांचे निर्बिजीकरण कागदावरच! शहरात ३० हजारांवर मोकाट श्वान; दररोज सरासरी १० जणांना चावा

शहरातील भटक्या श्वानांचा वाढता उपद्रव लक्षात घेता, त्यांच्या निर्बिजीकरण शस्त्रक्रियांसह श्वानदंशावरील लसीकरणासाठी कंत्राटदार संस्थेने शासनाच्या निर्धारित दरापेक्षा कमी दराने सादर केलेल्या निविदेला स्थायी समितीने बहुमताने मंजुरी दिली. तसेच, किमान एक हजार श्वानांची व्यवस्था होईल, असे शेल्टर होम उभारण्याच्या निर्णयावरही शिक्कामोर्तब झाले.

हस्तक्षेपामुळे संस्थांचा प्रतिसाद नाही?

शहरातील मोकाट श्वानांच्या निर्बिजीकरणासाठी होमगार्ड कार्यालयालगत असलेल्या महापालिकेच्या बंद शाळेत शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. संबंधित संस्थेचा कंत्राटी कालावधी संपल्यानंतर दुसऱ्या संस्थेला काम देण्यात आले. मात्र, काही श्वानांचे निर्बिजीकरण केल्यानंतर या संस्थेनेही काम बंद केले. त्यानंतर पुन्हा निविदा काढण्यात आल्या; मात्र कोणत्याही संस्थेने प्रतिसाद दिला नाही. निर्बिजीकरणाचे काम सुरू झाल्यानंतर संबंधित संस्थांच्या कामात हस्तक्षेप केला जात असल्याचे सांगितले जाते. आतापर्यंत दोन संस्थांना अशा प्रकाराला सामोरे जावे लागल्याची माहिती आहे. त्यामुळेच संस्थांकडून प्रतिसाद मिळत नसल्याची चर्चा आहे.

नायगाव डम्पिंग ग्राउंडवर शेल्टर होम

महापालिकेने नायगाव येथील डम्पिंग ग्राऊंडवर मोकाट श्वानांसाठी सुमारे सात हजार चौरस फुटांचे शेल्टर होम उभारले आहे. शेल्टरच्या निकषांमध्ये बदल करण्याच्या सूचनांनुसार आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहेत. श्वान पकडण्याचे काम कंत्राटदाराला देण्यात आले असून, प्रत्येक श्वानामागे २०० रुपये दिले जाणार आहेत. प्रारंभी शासकीय कार्यालयांच्या परिसरातील श्वान पकडले जाणार आहेत. त्यांच्या भोजनाची व्यवस्था महापालिकेला करावी लागणार आहे. या शेल्टरमध्ये भविष्यात दहा हजार श्वान ठेवण्याची क्षमता असल्याचे सांगण्यात येत असले, तरी सध्या सुमारे ४०० श्वान ठेवता येतील, अशी व्यवस्था आहे.

शहरात 15 हजारांवर मोकाट श्वान

अकोला शहरात सुमारे १५ हजारांहून अधिक मोकाट श्वान असल्याचा अंदाज आहे. अनेक भागांत त्यांच्या वावरामुळे नागरिक त्रस्त असून, श्वानांच्या चाव्यामुळे अनेकांना उपचार घ्यावे लागले आहेत. मोकाट श्वानांना पकडून शहराबाहेर सोडण्याच्या पद्धतीवर बंदी असल्याने त्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी निर्बिजीकरणावर भर दिला जात आहे.

FAQ :

अकोल्यात नेमकी काय परिस्थिती आहे? किती श्वान आहेत?
– अकोला महानगरपालिका (AMC) हद्दीत अंदाजे 25000 ते 30000 मोकाट श्वान आहेत. रोज 40 ते 60 लोकांना चावा घेतला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (GMC Akola) रोज एवढे रुग्ण इंजेक्शनसाठी येतात.

चावा घेतल्यावर काय करावे? इंजेक्शन कुठे मिळते?
– तात्काळ: जखम साबणाने आणि वाहत्या पाण्याने 15 मिनिटे धुवा. हळद, मिरची, चुना लावू नका. अकोला, जिल्हा रुग्णालय, किंवा मनपाचे दवाखाने – ARV (Anti-Rabies Vaccine) मोफत मिळते.

महापालिका काय करते? निर्बीजीकरण बंद का?
– AMC ने 21 मार्च 2026 रोजी नवीन टेंडर काढले – “Appointment of agency for catching, sterilization and anti-rabies vaccination of stray dogs in Akola Municipal Corporation area.

Web Title: Stray dogs run rampant in akola city many people bitten nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • akola news
  • Stray Dogs

संबंधित बातम्या

Bhandara News: भंडाऱ्यात ९ महिन्यांत ७,२९६ जणांना चावले कुत्र्यांनी! नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे
1

Bhandara News: भंडाऱ्यात ९ महिन्यांत ७,२९६ जणांना चावले कुत्र्यांनी! नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे

अकोल्यात भीषण पाणी टंचाईचे संकट; शहरात 10 दिवसाआड पाणीपुरवठा
2

अकोल्यात भीषण पाणी टंचाईचे संकट; शहरात 10 दिवसाआड पाणीपुरवठा

अकोल्यात वाहनचालकांवर असणार आता AI ची नजर; नियम मोडताच ई-चालान
3

अकोल्यात वाहनचालकांवर असणार आता AI ची नजर; नियम मोडताच ई-चालान

अकोलेकरांनो, पाणी जरा जपून वापरा; महान धरणातील जलसाठा घटतोय
4

अकोलेकरांनो, पाणी जरा जपून वापरा; महान धरणातील जलसाठा घटतोय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.