Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हवालदिल; खरीप कोरडा, रब्बीवरही संकट कायम

जिल्ह्यातील ४ लाख २६ हजार ९९५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना पावसाच्या कमतरतेचा फटका बसला आहे. अनेक शेतांमध्ये अपेक्षित उत्पादन मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. जमिनीतील ओलावा घटल्याने रब्बीच्या पेरणीपुढेही अडचणी निर्माण झाल्या आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 24, 2026 | 03:23 PM
पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हवालदिल; खरीप कोरडा, रब्बीवरही संकट कायम

पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हवालदिल; खरीप कोरडा, रब्बीवरही संकट कायम

Follow Us
Follow Us:
  • पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान
  • रब्बीच्या पेरणीसाठी पाणी आणि भांडवलाची चिंता वाढली
  • कोरडवाहू शेतीला बसली सर्वाधिक झळ
अकोला : यंदा पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून, आता रब्बी हंगामावरही संकट निर्माण झाले आहे. जिल्ह्यात सरासरी ६९३ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ ४२२.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसातील दीर्घ खंडामुळे सोयाबीन, कपाशी आणि इतर खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून, रब्बीच्या पेरणीसाठी पाणी आणि भांडवलाची चिंता वाढली आहे.

जिल्ह्यातील ४ लाख २६ हजार ९९५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना पावसाच्या कमतरतेचा फटका बसला आहे. अनेक शेतांमध्ये अपेक्षित उत्पादन मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. जमिनीतील ओलावा घटल्याने रब्बीच्या पेरणीपुढेही अडचणी निर्माण झाल्या आहेत. खरीप हंगामातून उत्पन्नाची आशा मावळल्याने पुढील हंगामासाठी भांडवल उभे करण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची अग्रीम मदत जाहीर केली आहे.

आधी महिलेवर गोळी झाडली, पोलिस मागावर असतानाच आरोपीने स्वतःला संपवले; अहिल्यानगरमधील घटनेनं खळबळ

दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळण्याच्या अपेक्षेने शेतकरी शासनाकडे लक्ष लावून बसले होते. मात्र, हजारो रुपयांचा उत्पादन खर्च आणि मोठ्या नुकसानीच्या तुलनेत ही मदत अपुरी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बियाणे, खते, कीटकनाशके आणि मशागतीसाठी केलेला खर्च वसूल होण्याची शक्यताही कमी आहे. त्यात रब्बीच्या पेरणीसाठी नव्याने खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना किती भरपाई मिळणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळण्याच्या अपेक्षेने शेतकरी शासनाकडे लक्ष लावून बसले होते.

कोरडवाहू शेतीला बसली सर्वाधिक झळ

जिल्ह्यातील एकूण ४ लाख ३२ हजार १० हेक्टर क्षेत्रापैकी ४ लाख २२ हजार ४३९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यातील कोरडवाहू शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले. या क्षेत्रातील ४ लाख ६ हजार ७२० हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. एकूण १ हजार ३७ गावांमधील २ लाख ८८ हजार ७६ शेतकरी बाधित झाल्याची नोंद आहे. तसेच बागायती क्षेत्रातील ६११ गावांमधील ६ हजार ६३१ शेतकऱ्यांनाही नुकसानीचा सामना करावा लागला आहे.

रब्बी हंगामासाठी पाणी आणि आर्थिक मदतीची अपेक्षा

खरीप हंगामातील नुकसान सहन केल्यानंतर आता रब्बी हंगामासाठी पाणी आणि आर्थिक मदत मिळण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. पावसाअभावी झालेल्या नुकसानीची भरपाई आणि पुढील हंगामासाठी आवश्यक मदत वेळेत मिळाली नाही, तर शेतकऱ्यांसमोरील आर्थिक संकट अधिक गडद होण्याची भीती व्यक्त होत आहे.

FAQ

पावसाने किती ओढ दिली? दुष्काळ कुठे जाहीर झाला?
– महाराष्ट्रात यंदा 18.8% पाऊस कमी झाला. सरासरी 932.3 mm पाहिजे. फक्त 755.9 mm झाला. 26 सप्टेंबर 2026 – पहिला GR – 265 तालुके दुष्काळग्रस्त (74% महाराष्ट्र) 14 ऑक्टोबर 2026 – दुसरा GR – आणखी 39 तालुके वाढवले. एकूण 304 तालुके दुष्काळग्रस्त झाले आहेत.

खरीप कसा कोरडा झाला? कोणत्या पिकांचे नुकसान?
– खरीप पिके – सोयाबीन, कापूस, मका, ज्वारी, बाजरी, तूर, भात – 95% क्षेत्राला Moisture Stress झाल्याचे समोर आले. अहिल्यानगर (अहमदनगर): ज्या कुटुंबांनी जानेवारी-फेब्रुवारीत ऊस तोडणीला जायचे – ते सप्टेंबरमध्येच काम शोधत आहेत.

रब्बीवर संकट का आहे? पाण्याची स्थिती काय?
– खरीप गेला म्हणजे कर्ज फेडायला पैसे नाहीत. रब्बीसाठी बी-बियाणे कसे घ्यायचे? हा प्रश्न सध्या शेतकऱ्यांसमोर आहे.

Web Title: Farmers distressed as rains stay away nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • akola news
  • Farmers Issue
  • kharif crops
  • Rabi season

संबंधित बातम्या

अकोला शहरात मोकाट श्वानांचा हैदोस, अनेकांना चावा; श्वानांचे निर्बिजीकरणावर प्रश्न
1

अकोला शहरात मोकाट श्वानांचा हैदोस, अनेकांना चावा; श्वानांचे निर्बिजीकरणावर प्रश्न

अकोल्यात भीषण पाणी टंचाईचे संकट; शहरात 10 दिवसाआड पाणीपुरवठा
2

अकोल्यात भीषण पाणी टंचाईचे संकट; शहरात 10 दिवसाआड पाणीपुरवठा

अकोल्यात वाहनचालकांवर असणार आता AI ची नजर; नियम मोडताच ई-चालान
3

अकोल्यात वाहनचालकांवर असणार आता AI ची नजर; नियम मोडताच ई-चालान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.