Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अकोल्यात वाहनचालकांवर असणार आता AI ची नजर; नियम मोडताच ई-चालान

सध्या अकोला-नागपूर बायपास, मूर्तिजापूर मार्ग आणि शहरातील अपघातप्रवण ठिकाणी ही वाहने तैनात आहेत. पुढील टप्प्यात अकोट, बाळापूर, पातूर, तेल्हारा आणि बार्शीटाकळी या तालुक्यांमध्येही टप्याटप्याने फिरती कारवाई सुरू करण्याचे नियोजन आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 18, 2026 | 02:46 PM
अकोल्यात वाहनचालकांवर असणार आता AI ची नजर; नियम मोडताच ई-चालान

अकोल्यात वाहनचालकांवर असणार आता AI ची नजर; नियम मोडताच ई-चालान

Follow Us
Follow Us:

अकोला : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. अकोला प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) कृत्रिम बुद्धिमत्ता ताफ्यात (एआय), रडार आणि विशेष कॅमेऱ्यांनी सज्ज मोबाइल एन्फोर्समेंट ट्रॅकिंग सिस्टिम (एमटीईएस) दाखल झाली आहे. एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत जिल्ह्यातील २ हजार ९३८ वाहनांवर कारवाई करून १ कोटी ६ लाख १८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या प्रणालीत वाहनाच्या छतावर ३६० अंशांत नजर ठेवणारा एआय कॅमेरा बसविण्यात आला आहे.

यासोबत स्पीड रडार, ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन (एएनपीआर), ब्रेथ अॅनालायझर आणि टिंट मीटर यांसारखी उपकरणे आहेत. नियमभंगाची छायाचित्रे आणि सुमारे १० सेकंदांचा व्हिडिओ तारीख, वेळ व ठिकाणाच्या नोंदीसह कंट्रोल रूमला पाठवला जातो. अतिवेगाने वाहन चालविणे, हेल्मेट व सीट बेल्ट न वापरणे, दुचाकीवर तिघांनी प्रवास करणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, लेन कटिंग आणि चुकीच्या नंबर प्लेटचा वापर अशा प्रकारांवर लक्ष ठेवले जात आहे. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांच्या कागदपत्रांची तपासणी करून छायाचित्रांसह ई-चालान पाठविण्याची प्रक्रिया केली जाते. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत या प्रणालीची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

या नियमभंगांवर राहणार लक्ष

हेल्मेटचा वापर न करणे, सीट बेल्ट न लावणे, निर्धारित वेगमर्यादेचे उल्लंघन करणे, तिहेरी आसनक्षमता वापरणे आणि विरुद्ध दिशेने वाहन चालवणे अशा प्रकारांवर लक्ष ठेवले जाणार आहे.

180 अंश फिरणाऱ्या कॅमेऱ्याचा वॉच

एमटीईएस प्रणालीने सज्ज असलेल्या या वाहनाच्या छतावर विशेष कॅमेरा बसविण्यात आला आहे. हा कॅमेरा १८० अंशांच्या कोनात फिरून रस्त्यावरील वाहनांच्या हालचाली टिपू शकतो. रडार तंत्रज्ञानासोबत इन्फ्रारेड दिव्यांची सुविधा असल्याने रात्रीच्या अंधारातही वाहनांचे चित्रीकरण करता येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन शोधण्याची प्रक्रिया अधिक वेगवान होण्याची अपेक्षा आहे.

अकोला येथे स्वतंत्र कंट्रोल रूम प्रस्तावित

सध्या अकोला-नागपूर बायपास, मूर्तिजापूर मार्ग आणि शहरातील अपघातप्रवण ठिकाणी ही वाहने तैनात आहेत. पुढील टप्प्यात अकोट, बाळापूर, पातूर, तेल्हारा आणि बार्शीटाकळी या तालुक्यांमध्येही टप्याटप्याने फिरती कारवाई सुरू करण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यासाठी अकोला येथे स्वतंत्र कंट्रोल रूम प्रस्तावित आहे.

– रवींद्र भुयार, प्रादेशिक परिवहन अधिकारी.

Navi Mumbai Traffic : कोपरखैरणेकर वाहतूककोंडीने हैराण ! भुयारी मार्गात टेम्पो अडकतात, वाहतूक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न

Web Title: Drivers in akola will now be under the watchful eye of ai nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • akola news

संबंधित बातम्या

अकोलेकरांनो, पाणी जरा जपून वापरा; महान धरणातील जलसाठा घटतोय
1

अकोलेकरांनो, पाणी जरा जपून वापरा; महान धरणातील जलसाठा घटतोय

Akola News: हप्ता थकला म्हणून फायनान्सवाले थेट घरी; पत्नीचा फोटो काढल्याच्या आरोपाने खळबळ
2

Akola News: हप्ता थकला म्हणून फायनान्सवाले थेट घरी; पत्नीचा फोटो काढल्याच्या आरोपाने खळबळ

Akola News : इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत लक्षणीय वाढ; वर्षभरात 10 हजार 148 ई-वाहने रस्त्यावर
3

Akola News : इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत लक्षणीय वाढ; वर्षभरात 10 हजार 148 ई-वाहने रस्त्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.