
अकोलेकरांनो, पाणी जरा जपून वापरा; महान धरणातील जलसाठा घटतोय
अकोला : मागील 20 वर्षांनंतर यंदा पावसाअभावी अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील लहान-मोठ्या धरणांमधील जलसाठा झपाट्याने घटत असून, महान धरणासह अन्य जलप्रकल्पांची स्थितीही दिवसेंदिवस बिकट होत आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करून तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
२०२५ मध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील लहान-मोठी धरणे आणि तलावांमध्ये मुबलक जलसाठा उपलब्ध होता. मात्र, यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने सर्वच जलप्रकल्पांमधील पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक बनली आहे. २००५-०६ मध्येही अल्प पावसामुळे जिल्ह्याला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. तब्बल दोन दशकांनंतर पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये अवकाळी पाऊस झाल्यास काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.
दरम्यान, जिल्ह्यातील तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर अकोला महानगरपालिकेने पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. प्रत्येक नागरिकाला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. नळाला तोटी नसणे, तोटी असूनही पाण्याचा अपव्यय होणे, नळाच्या पाण्याचा वापर वाहने किंवा जनावरे शकतो. अन्यथा, आगामी सात ते आठ महिन्यांत महान धरणातील मृत जलसाठ्यातून पाणी उपसण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.
२००५-०६ मध्येही अशी परिस्थिती
२००५-०६ मध्येही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. महान धरणातील उपलब्ध जलसाठा अकोला शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे. मात्र, हा साठा वेगाने कमी होत असल्याने शहरवासीयांनी पाण्याचा अपव्यय टाळून काटकसरीने पाणी वापरणे आवश्यक आहे. भविष्यात पाणीटंचाई अधिक तीव्र होऊन नागरिकांवर स्थलांतराची वेळ येऊ नये, यासाठी प्रत्येकाने पाणीबचतीला प्राधान्य द्यावे.
पाण्याचा अपव्यय आढळल्यास नळजोडणी खंडित
धुण्यासाठी करणे तसेच घरातील अंतर्गत जलवाहिनीतील गळतीची दुरुस्ती न करणे, अशा प्रकारांमध्ये संबंधित नळधारकाची नळजोडणी तत्काळ खंडित करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. महान धरणातील जलसाठ्यावर कार्यकारी अभियंता चिन्मय वाकोडे आणि बोरगाव मंजूचे उपविभागीय अधिकारी आदित्य कासार यांच्या मार्गदर्शनाखाली महानचे शाखा अभियंता संदीप नेमाडे, वैभव उगले आणि मनोज पाठक बारकाईने लक्ष ठेवून आहेत.