Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akot BJP MIM Alliance: भाजपने तत्त्वांना मुरड घातली? अकोट नगरपालिकेत भाजपची MIMशी युती ; नव्या राजकीय समीकरणाची चर्चा

या आघाडीत ठाकरे गटाची शिवसेना, शिंदे गटाची शिवसेना, अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस तसेच बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष यांचाही समावेश आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 07, 2026 | 12:21 PM
Akot BJP MIM Alliance: भाजपने तत्त्वांना मुरड घातली? अकोट नगरपालिकेत भाजपची MIMशी युती ; नव्या राजकीय समीकरणाची चर्चा
Follow Us
Close
Follow Us:
  • अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेत भाजपने थेट एमआयएमसोबत युती
  • अकोट विकास मंचात भाजपनंतर सर्वाधिक जागा एमआयएमला
  • नव्या राजकीय आघाडीत आता भाजपचा ‘व्हिप’ लागू राहणार
Akot BJP MIM Alliance :  ‘पार्टी विथ डिफरन्स’ अशी ओळख सांगणाऱ्या भारतीय जनता पक्षाने सत्तेसाठी तत्वांना मुरड घातली आहे का, असा प्रश्न अकोट नगरपालिकेतील घडामोडींमुळे उपस्थित झाला आहे. अंबरनाथ नगरपालिकेत काँग्रेसशी आघाडी केल्यानंतर आता अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेत भाजपने थेट एमआयएमसोबत आघाडी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नुकत्याच झालेल्या अकोट नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या माया धुळे या नगराध्यक्षपदी निवडून आल्या असल्या, तरी भाजपला बहुमत मिळवता आलेले नाही. ३५ सदस्यांच्या नगरपालिकेपैकी ३३ जागांसाठी निवडणूक झाली असून, भाजपला केवळ ११ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

याच साठी केला होता अट्ट्हास…; डोनाल्ड ट्रम्पचा व्हेनेझुएलाच्या हृदयावर घाला, जगात खळबळ

बहुमताअभावी सत्तास्थापनेसाठी भाजपने आपल्या नेतृत्वाखाली ‘अकोट विकास मंच’ची स्थापना केली आहे. या मंचात भाजपनंतर सर्वाधिक म्हणजे पाच जागा जिंकणारा एमआयएम पक्ष सहभागी झाला असून, त्यामुळे भाजप–एमआयएम युतीचे नवे समीकरण पुढे आले आहे.

या आघाडीत ठाकरे गटाची शिवसेना, शिंदे गटाची शिवसेना, अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस तसेच बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष यांचाही समावेश आहे. या नव्या आघाडीची अधिकृत नोंदणी मंगळवारी अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. अकोट नगरपालिकेतील या अनपेक्षित युतीमुळे राज्यातील स्थानिक राजकारणात नवी चर्चा सुरू झाली असून, सत्तेसाठी भाजपने घेतलेल्या भूमिकेवर टीकाही होत आहे.

BJP MIM Alliance: सत्तेसाठी अकोट नगरपालिकेत नव्या राजकीय समीकरणाची नांदी?

भाजपने अकोट नगरपालिकेत भाजपन अकोट विकास मंच स्थापन केला आहे. अकोट विकास मंचात भाजपनंतर सर्वाधिक जागा एमआयएमला मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजपने एमआयएमशी युती केली आहे. या युतीत ठाकरे आणि शिंदे यांची शिवसेना, अजित पवार आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्षाही सहभागी झाला आहे. कालच जिल्हाधिकारी कार्यालयात या नव्या युतीची नोंदणी करण्यात आली आहे.

भाजपचा बिनविरोधचा डाव फसला; काँग्रेस उमेदवाराने नाकारली 10 लाखांची ऑफर

अकोट नगरपालिकेत भाजपचा व्हिप लागू

अकोट नगरपालिकेत स्थापन झालेल्या नव्या राजकीय आघाडीत आता भाजपचा ‘व्हिप’ लागू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या आघाडीतील सर्वच पक्षांच्या नगरसेवकांना भाजपचा व्हिप पाळणे बंधनकारक असणार आहे. भाजपचे नगरसेवक रवि ठाकूर यांची या नव्या आघाडीच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

१३ जानेवारी रोजी होणाऱ्या उपनगराध्यक्षपद आणि स्वीकृत सदस्यांच्या निवडीत ही आघाडी एकत्रितपणे मतदान करणार आहे. सध्या ३३ सदस्यांच्या नगरपालिकेत या आघाडीकडे २५ नगरसेवकांचे संख्याबळ असून, नगराध्यक्षा माया धुळे यांचा समावेश केल्यास एकूण संख्याबळ २६ होते. अकोट नगरपालिकेत काँग्रेसचे सहा तर वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक विरोधी बाकावर असणार आहेत.

दरम्यान, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या माया धुळे यांनी एमआयएमच्या उमेदवार फिरोजाबी सिकंदर राणा यांचा ५,२७१ मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत भाजपनंतर सर्वाधिक पाच नगरसेवक एमआयएमचे निवडून आले आहेत. विधानसभा निवडणुकीदरम्यान ‘बटेंगे तो कटेंगे’ असा नारा देणाऱ्या भाजपने अकोटमध्ये थेट एमआयएमसोबत आघाडी केल्याने विरोधकांकडून तीव्र टीका होत असून, या टीकेला भाजप कसे उत्तर देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 

Web Title: Akot bjpmim alliance bjp joins hands with mim in akot municipality sparks political debate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 09:59 AM

Topics:  

  • AIMIM
  • Asaduddin Owaisi
  • BJP Politics

संबंधित बातम्या

महापालिका निवडणुकीमध्ये उरली नाही विचारधारा; राजकीय पक्षांनी निष्ठावंत उमेदवारांना नाही दिला थारा
1

महापालिका निवडणुकीमध्ये उरली नाही विचारधारा; राजकीय पक्षांनी निष्ठावंत उमेदवारांना नाही दिला थारा

PCMC Politics : वडिलांच्या विरोधात मुलगा निवडणुकीच्या रिंगणात! बंडखोर पुत्रामुळे भाजपला डोकेदुखी
2

PCMC Politics : वडिलांच्या विरोधात मुलगा निवडणुकीच्या रिंगणात! बंडखोर पुत्रामुळे भाजपला डोकेदुखी

प्रभाग क्रमांक ९ मधील पदयात्रेला म्हाळुंगेवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती
3

प्रभाग क्रमांक ९ मधील पदयात्रेला म्हाळुंगेवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती

महापौर व स्थायी समिती अध्यक्षपद न मिळाल्यानेच अमोल बालवडकरांनी सोडला पक्ष; BJP चा दावा
4

महापौर व स्थायी समिती अध्यक्षपद न मिळाल्यानेच अमोल बालवडकरांनी सोडला पक्ष; BJP चा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.