ज्या साठी केला होता अट्ट्हास...; डोनाल्ड ट्रम्पचा व्हेनेझुएलाच्या हृदयावर घाला, जगात खळबळ (फोटो सौजन्य: AI जनरेटेड)
कोण आहे Barry Pollack? निकोलस मादुरोसाठी लढणार अमेरिकेविरोधात
ही घोषणा जागतिक राजकारणातील सर्वात मोठी सत्तासंघर्ष मानली जात आहे. अमेरिका फर्स्च धोरणावर आपण कायम असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत. व्हेनेझुएलाच्या तेल विक्रीतून अमेरिका होणाऱ्या अब्जावधींच्या डॉलर्सच्या कमाईवर आता अमेरिकेचे नियंत्रण असणार आहे. यामुळे जगभरात तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल मीडियावरुन याची घोषणा केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर या कराराची माहिती देताना सांगितले की, व्हेनेझुएलामध्ये सत्ताबदल झाल्यानंतर अंतरिम सरकारची स्थापना झाली आहे. अंतरिम सरकारने अमेरिकेला 30 ते 50 दशलक्ष बॅलरच देण्याचा करार मान्य केला आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, व्हेनेझुएलाचे तेल हे उत्तम दर्जाचे असून याचा अमेरिकीची उर्जा सुरक्षा मजबूत करण्यासाठी उपयोग केला जाईल. या कारारामधून मिळणारी रक्कम अमेरिका व्हेनेझुएलाच्या पुनर्बांधणीसाठी वापरणार असल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर अमेरिकेचे फर्जा सचिव क्रिस राइट यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत. सध्या आधीच उत्पादित झालेले आणि जहाजांवरील तेल बॅलर अमेरिकेत आणले जाणार आहे. यानंतर या तेलाचे शुद्धीकरणे केले जाईल.
दरम्यान ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर जागतिक स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे. तज्ज्ञांच्या मते, 50 दशलक्ष बॅरल तेर अमेरिकेच्या दैनंदिन गरजेच्या तुलनेत जास्त नाही. परंतु यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये घसरण होण्याची शक्यता आहे. तसेच अमेरिकेला व्हेनेझुएलाच्या पायाभूत तेल सुविधांचा ताबा मिळणार आहे. ट्रम्प यांनी आधीच संकेत दिले होते की, शेवरॉन आणि एक्सॉन सारख्या अमेरिकी कंपन्या व्हेनेझुएलात मोटी गुंतवणूक करु शकतात. यामुळे अमेरिकेचे उत्पादन वाढेल, मात्र व्हेनेझुएलाच्या अर्थव्यवस्था अमेरिकेच्या नियंत्रणाखाली जाईल. याचा संपूर्ण जागतिक तेल बाजारावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे जागतिक स्तरावर तेल उत्पादकांमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे.
काय आहे Donroe Doctrine? व्हेनेझुएलानंतर ट्रम्पने ‘या’ देशांना दिली सरकार उलथवून टाकण्याची धमकी
Ans: अमेरिका व्हेनेझुएलातून 30 ते 50 दशलक्ष बॅरल देशात आणणार असल्याची आणि या तेलाच्या विक्रीतून होणाऱ्या कमाईवर अमेरिकेचे नियंत्रणाची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे.
Ans: अमेरिका आणि व्हेनेझुएलातील तेल करारामुळे अमेरिकेच्या उर्जा सुरक्षेला बळकटी मिळणार आहे. तसेच यामुळे जागतिक तेल बाजारातही अमेरिकेची पकड मजबूत होईल. यामुळे अमेरिकेसाठी व्हेनेझुएलाचे तेल अत्यंत महत्त्वाचे आहे.
Ans: अमेरिकेच्या व्हेनेझुएलातील करारामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण होण्याची शक्यता आहे.






