अकलुज : पिलीव (ता. माळशिरस) येथे दुध दर वाढीसाठी जनावरे रस्त्यावर बांधून या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी व सर्वपक्षीय नेते यांनी रस्तारोको आंदोलन केले. या मागणीचे निवेदन पोलीस उपनिरीक्षक एम. एम. पुजारी यांनी स्विकारले. यावेळी पिलीव पोलीस स्टेशनचे हवालदार पंडीत मिसाळ, सतीश धुमाळ, दत्ता खरात, अमित जाधव यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
शसनाने दुधाला प्रतिलीटर ३४ रुपये दर ठरवुन देऊनही सोलापूर जिल्ह्यातील खाजगी दुध संघ २५ ते २६ रुपये एवढाच दर देत शेतकऱ्यांना लुटणयाचे काम करीत आहेत. शासनाने ताबडतोब अशा दुध संघावर कारवाई करावी व शेतकऱ्यांना ४० रुपये एवढा दर द्यावा. पशुखाद्याचे दर कमी करावेत, औषधावरील जीएसटी कमी करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.