Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निवडणूक आयोगाच्या निर्णयाआधीच नगरपालिकांसाठी तयारी; राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु

राज्य निवडणूक आयोगाने अद्याप कोणताही निवडणूक कार्यक्रम जाहीर केला नसला तरी विविध पक्षांनी नगरपालिका निवडणुकाच आधी होणार हे गृहीत धरून तयारी सुरू केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 23, 2025 | 01:33 PM
निवडणूक आयोगाच्या निर्णयाआधीच नगरपालिकांसाठी तयारी; राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु

निवडणूक आयोगाच्या निर्णयाआधीच नगरपालिकांसाठी तयारी; राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु

Follow Us
Close
Follow Us:
  • निवडणूक आयोगाच्या निर्णयाआधीच नगरपालिकांसाठी तयारी
  • राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु
  • भाजपसह विविध पक्षांच्या बैठका सुरू
पंढरपूर/नवनाथ खिलारे : राज्य निवडणूक आयोगाने अद्याप कोणताही निवडणूक कार्यक्रम जाहीर केला नसला तरी विविध पक्षांनी नगरपालिका निवडणुकाच आधी होणार हे गृहीत धरून तयारी सुरू केली आहे. भाजपसह विविध पक्षांच्या बैठका सध्या तयारीसाठी सुरू असून, वरिष्ठ नेते हे नगरपालिका निवडणुकीसाठी कामाला लागा असे सांगत आहेत. आधी जिल्हा परिषद निवडणूक होणार नाही असे आम्हाला सांगितले गेले आहे, असे भाजपचे कार्यकर्ते सांगत आहेत. आयोगाने मात्र अजूनही नगरपालिका आधी की जिल्हा परिषद आधी, याचा निर्णय जाहीर केलेला नाही. मात्र, त्यासाठीची चाचपणी सुरू केली आहे.

सूत्रांनी सांगितले की, आयोगाने विविध जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यादृष्टीने मते मागविणे सुरू केले आहे. अलीकडची अतिवृष्टी आणि महापूर यामुळे मोठे नुकसान राज्याच्या ग्रामीण भागात झाले आहे. त्यामुळे तेथे जिल्हा परिषद, पंचायत समित्या निवडणूक लगेच घेण्यासारखी स्थिती नाही. म्हणूनच आयोगाने आधी नगरपालिका निवडणूक घेण्याचा पर्याय ठेवला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याआधी मतदार याद्या, आरक्षण निश्चिती, आदी प्रकारची जी पूर्वतयारी करावी लागते, ती नगरपालिका आणि जिल्हा परिषदांची एकाच वेळी करण्यावर आयोगाने भर दिला आहे.

निकाल एकत्र की वेगवेगळे?

नगरपालिका निवडणुका आधी झाल्या तर त्याचे निकाल मतदानानंतर दोन दिवसांनी मतमोजणी करून लावायचे की जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांनंतर एकत्रितपणे निकाल जाहीर करायचे, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. कारण, आधी झालेल्या निवडणुकीचा निकाल लगेच जाहीर केला तर त्याचा परिणाम नंतरच्या निवडणुकांवर होऊ शकतो असा आक्षेप घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोग यादृष्टीने काय निर्णय घेणार, याबाबत उत्सुकता असेल.

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात घोषणा

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नगरपालिकांची निवडणूक जाहीर होईल, असा अंदाज आहे. या निवडणुकीनंतर लगेच जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक होईल आणि शेवटी जानेवारीअखेर महापालिकांची निवडणूक होईल.

… यामुळे नगरपालिका आधी

राज्य सरकारने पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणखी २० दिवस लागणार आहेत. या मदतीला आचारसंहितेचा फटका बसायचा नसेल तर आधी नगरपालिका निवडणूक घेणे हे सत्तारुढ महायुतीच्या दृष्टीने सोयीचे असेल. मदत आपत्तीग्रस्तांना पूर्णत: पोहोचण्याआधी ग्रामीण भागाशी संबंध असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक घेतली तर त्यातून आलेल्या नाराजीचा फटका महायुतीतील घटक पक्षांना निवडणुकीत बसू शकेल.

Web Title: All political parties have started campaigning vigorously for the nagarpalika elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2025 | 01:33 PM

Topics:  

  • Election News
  • Pandharpur News
  • pandharpur politics

संबंधित बातम्या

महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजणार? मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन-उद्घाटनाच्या कामांचा धडाका अन्…
1

महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजणार? मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन-उद्घाटनाच्या कामांचा धडाका अन्…

बारामतीत प्रचाराची रणधुमाळी पुन्हा सुरू; नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवार जोमाने उतरले मैदानात
2

बारामतीत प्रचाराची रणधुमाळी पुन्हा सुरू; नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवार जोमाने उतरले मैदानात

अपक्ष उमेदवाराचा आरपीआयचा उमेदवार म्हणून प्रचार; नेते निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
3

अपक्ष उमेदवाराचा आरपीआयचा उमेदवार म्हणून प्रचार; नेते निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार

Maharashtra Politics : ‘महानगरपालिका जानेवारी महिन्यात तर जिल्हा परिषद निवडणुका…’; भाजपच्या बड्या नेत्याचे सूचक विधान
4

Maharashtra Politics : ‘महानगरपालिका जानेवारी महिन्यात तर जिल्हा परिषद निवडणुका…’; भाजपच्या बड्या नेत्याचे सूचक विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.