Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला; आंबेठाण पाईट जिल्हा परिषद गटात तणावाचे वातावरण

आंबेठाण पाईट जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सुनिता बुट्टे यांच्या पतीवर अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. ६ फेब्रुवारी २०२६) रात्री घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 07, 2026 | 11:30 AM
राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला; आंबेठाण पाईट जिल्हा परिषद गटात तणावाचे वातावरण

राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला; आंबेठाण पाईट जिल्हा परिषद गटात तणावाचे वातावरण

Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला
  • शरद बुट्टे गंभीर जखमी
  • आंबेठाण पाईट जिल्हा परिषद गटात तणावाचे वातावरण
चाकण : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, लुटमार, खुनाचा प्रयत्न यासारख्या घटना उघडकीस येत असतात. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न सुरु आहेत. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. आंबेठाण पाईट जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सुनिता बुट्टे यांच्या पतीवर अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. ६ फेब्रुवारी २०२६) रात्री घडली. या हल्ल्यात माजी जिल्हा परिषद सदस्य व माजी गटनेते शरद बुट्टे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर वासुली फाटा येथील बालाजी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार, शरद बुट्टे हे खासगी कामानिमित्त घराबाहेर गेले असता, दबा धरून बसलेल्या काही अज्ञात हल्लेखोरांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी शरद बुट्टे यांच्या गाडीवर दगडफेक केली. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल केले.

बालाजी हॉस्पिटलच्या वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद बुट्टे यांच्या डोक्याला व शरीराच्या इतर भागाला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र डॉक्टरांचे पथक सतत लक्ष ठेवून आहे. या घटनेनंतर आंबेठाण पाईट परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

हे सुद्धा वाचा : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई; पिस्तुल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. हा हल्ला जुन्या वादातून की राजकीय कारणातून झाला, याबाबत पोलीस विविध अंगांनी तपास करत असून, लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेमुळे जिल्हा परिषद निवडणूक काळात सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासनाने संवेदनशील भागात कडेकोट बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Web Title: A shocking incident has taken place in which the husband of an ncp candidate was beaten up

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • crime news
  • Election News
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

मोबाइलच्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या, दारूच्या नशेत हल्ला; यवतमाळमधील घटनेनं खळबळ
1

मोबाइलच्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या, दारूच्या नशेत हल्ला; यवतमाळमधील घटनेनं खळबळ

गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांना अरेरावी, भाजप तालुकाध्यक्षासह 14 जणांवर गुन्हा; नेमकं काय घडलं?
2

गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांना अरेरावी, भाजप तालुकाध्यक्षासह 14 जणांवर गुन्हा; नेमकं काय घडलं?

Crime News: मुलीला इजा करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी अन्…
3

Crime News: मुलीला इजा करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी अन्…

पिंपरीत ‘मेड इन पाकिस्तान’ गोरी ब्यूटी क्रीमची विक्री, दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई; तब्बल 23 क्रीम जप्त
4

पिंपरीत ‘मेड इन पाकिस्तान’ गोरी ब्यूटी क्रीमची विक्री, दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई; तब्बल 23 क्रीम जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.