Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ZP Election : खेड तालुक्यात मतदार सजग; पैशांची उधळण करणाऱ्या उमेदवारांना…

खेड तालुक्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये स्पष्ट बदल जाणवू लागला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 06, 2026 | 05:09 PM
खेड तालुक्यात मतदार सजग; पैशांची उधळण करणाऱ्या उमेदवारांना...

खेड तालुक्यात मतदार सजग; पैशांची उधळण करणाऱ्या उमेदवारांना...

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘नोट नको, हवाय विकास’
  • खेड तालुक्यात मतदार सजग
  • भावनिक राजकारणालाही नकार
खेड : खेड तालुक्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये स्पष्ट बदल जाणवू लागला आहे. जनतेशी कोणतीही नाळ नसलेले व विकासाचा ठोस आराखडा नसलेले काही धनदांडगे उमेदवार पैशांच्या जोरावर निवडून येण्याचा प्रयत्न करीत असले, तरी मतदार अशा प्रवृत्तींना नाकारण्याच्या भूमिकेत असल्याचे चित्र दिसत आहे.

 

तालुक्यात चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती गण असून, सर्वत्र निवडणूक वातावरण तापले आहे. मात्र यंदा मतदार केवळ पैशांच्या आमिषाला बळी न पडता उमेदवारांच्या कामगिरीकडे आणि विकासाच्या अहवालाकडे लक्ष देत असल्याची चर्चा सुरू आहे.

‘नोट नको, हवाय विकास’

“कितीही पैसे वाटा, पण मत मात्र आमच्या मनातील उमेदवारालाच,” अशी भावना मतदारांमध्ये व्यक्त होत आहे. एकदाच पैशांच्या आमिषाला बळी पडल्यास पुढील पाच वर्षे विकासावर प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार कमी होतो, याची जाणीव मतदारांना झाली आहे. विशेषतः तरुण पिढी रोजगाराच्या संधी, दर्जेदार रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य व शिक्षण सुविधा यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर ठोस काम करणाऱ्या उमेदवारांच्या शोधात आहे. मतदार आता केवळ ‘नोट’ पाहत नसून उमेदवाराचे चारित्र्य, कामाचा आलेख आणि विकासाची दृष्टी तपासत असल्याचे दिसत आहे.

मतदानाच्या तोंडावर आमिषांची चर्चा

मतदानासाठी अवघा एक दिवस शिल्लक असताना काही उमेदवारांकडून पैशांचे वाटप व विविध आमिषे दिली जात असल्याच्या चर्चा तालुक्यात रंगल्या आहेत. मात्र निवडणूक नियंत्रण पथके केवळ नावालाच कार्यरत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. “जर विजयाची खात्री आहे, तर पैशांची उधळपट्टी कशासाठी?” असा सवालही सुज्ञ मतदार उपस्थित करत आहेत.

भावनिक राजकारणालाही नकार

काही उमेदवारांकडून भावनिक वातावरण निर्माण करून ‘ही शेवटची निवडणूक’ असल्याचे सांगणे, तर काही ठिकाणी मतदारांसमोर आर्जव व अश्रू ढाळण्याच्या घटना घडत असल्याचे बोलले जात आहे. तसेच दारू, मटण, बिर्याणी यांसारख्या पार्टींची चर्चा देखील रंगत आहे. मात्र स्वच्छ प्रतिमा असलेले उमेदवार अशा प्रकारांपासून दूर राहून थेट संवादाच्या माध्यमातून मतदारांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करत आहेत.

हे सुद्धा वाचा : राष्ट्रवादी सत्तेत भाजपसोबत, काँग्रेस एकाकी; सांगलीत नेमकं काय घडलं?

विकासकामांवरच अंतिम निर्णय

यापूर्वी विकासकामांच्या जोरावर काही लोकप्रतिनिधींनी आपली पकड मजबूत ठेवली आहे. मात्र निवडून आल्यानंतर वॉर्डात न फिरकल्याने काही सदस्यांविरोधात नाराजीही दिसून येत आहे. अनेक ठिकाणी तुल्यबळ लढतीमुळे राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. एकूणच, खेड तालुक्यात यंदाची निवडणूक ‘पैसा विरुद्ध विकास’ अशी ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत असून, अंतिम कौल विकासाभिमुख उमेदवारांच्या बाजूने जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Voters in khed taluka will not vote for candidates who distribute money

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 04:58 PM

Topics:  

  • Election News
  • Panchayat Samiti Election
  • ZP Election 2026

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.