Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“राऊत यांन बावनकुळेंचे सगळे फोटो समोर आणावेत म्हणजे…”, वाचा एकनाथ खडसे काय म्हणाले?

संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळेंचा कॅसिनोमधील फोटो ट्विट करीत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. बावनकुळेंनीसुद्धा यावर रिट्विट करीत प्रत्त्त्युत्तर दिले होते.त्या नंतर परत संजय राऊत यांनी जोरदार हल्ला चढवत मोठा दावा केला की त्यांच्याकडे बावनकुळेंचे 25 फोटो अन् 7 व्हिडीओ आहेत. यावर आता राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी वक्तव्य केले आहे.

  • By Aparna
Updated On: Nov 21, 2023 | 06:00 PM
eknathrao-khadse

eknathrao-khadse

Follow Us
Close
Follow Us:

संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळेंचा कॅसिनोमधील फोटो ट्विट करीत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. बावनकुळेंनीसुद्धा यावर रिट्विट करीत प्रत्त्त्युत्तर दिले होते.त्या नंतर परत संजय राऊत यांनी जोरदार हल्ला चढवत मोठा दावा केला की त्यांच्याकडे बावनकुळेंचे 25 फोटो अन् 7 व्हिडीओ आहेत. यावर आता राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी वक्तव्य केले आहे.

संजय राऊत यांनी जेव्हा फोटो पोस्ट केला होता तेव्हा त्यांनी नाव घेतलं नव्हतं. आता मात्र त्यांचं म्हणणं आहे की चंद्रशेखर बावनकुळे यांचे २७ फोटो, व्हिडीओ माझ्याकडे आहेत. जर ते असतील तर संजय राऊत यांनी ते महाराष्ट्रच्या समोर आणावेत म्हणजे खरं-खोटं काय ते समजेल. महाराष्ट्रात सध्या अस्थिर स्थिती आहे. अशावेळी एका पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने अशा पद्धतीने वागणं योग्य नाही. मात्र फोटो समोर आल्यावर खरं खोटं करता येईल असं राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

प्रकरण काय?
‘महाराष्ट्र पेटलेला आहे आणि हे महाशय मकाऊ येथील कॅसिनोत जुगार खेळत आहेत’ अशी एक्स पोस्ट संजय राऊत यांनी केली होती. याबरोबरच बावनकुळे कॅसिनोमध्ये बसले असल्याचे छायाचित्र जोडले. कॅसिनोमधील जुगारात बावनकुळे यांनी साधारण साडे तीन कोटी उडविल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय खेळले तर बिघडलं कुठे? अशी पोस्ट राऊत यांनी केली होती.

‘मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तेथील हा परिसर आहे. या हॉटेलच्या तळ मजल्यावर रेस्टॉरंट आणि कॅसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे”, असा खुलासा बावनकुळे यांनी केला. ज्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरु झाले. आज सकाळीच संजय राऊत यांनी भाजपा म्हणजे भारतीय जुगार पार्टी असल्याचंही म्हटलं. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना याविषयी विचारलं असता त्यांनी जे काही फोटो व्हिडीओ आहेत ते संजय राऊत यांनी समोर आणावेत असं त्यांनी म्हटलं आहे.

Web Title: All the photos of raut and bawankule should be brought forward read what eknath khadse said nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2023 | 06:00 PM

Topics:  

  • eknath khadse
  • maharashtra
  • maharashtra news
  • sanjay raut
  • sanjay raut news

संबंधित बातम्या

Satara News : साखर कारखान्यांनी दोन मल्ल दत्तक घेतले पाहिजेत; खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली अपेक्षा
1

Satara News : साखर कारखान्यांनी दोन मल्ल दत्तक घेतले पाहिजेत; खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली अपेक्षा

Satara: कारखानदारांच्या मनमानीविरुद्ध किसान काँग्रेस एल्गार पुकारणार! जिल्हाध्यक्ष वसीम इनामदार यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन
2

Satara: कारखानदारांच्या मनमानीविरुद्ध किसान काँग्रेस एल्गार पुकारणार! जिल्हाध्यक्ष वसीम इनामदार यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

अमेझॉनची नवी घोषणा, 1000 पेक्षा कमी उत्पादनांवर झिरो-रेफरल शुल्क; विक्रेत्यांना मोठा दिलासा
3

अमेझॉनची नवी घोषणा, 1000 पेक्षा कमी उत्पादनांवर झिरो-रेफरल शुल्क; विक्रेत्यांना मोठा दिलासा

E vehicle News : महाराष्ट्रात ई-वाहनांना चालना; शासनाकडून कोट्यवधींचे अनुदान मंजूर
4

E vehicle News : महाराष्ट्रात ई-वाहनांना चालना; शासनाकडून कोट्यवधींचे अनुदान मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.