Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सातारा जिल्हा शासकीय रूग्णालयात मृतदेहांची अदलाबदल; नातेवाईकांचा व्यवस्थापनावर संताप

क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयमध्ये कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मंगळवारी सकाळी नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देताना त्याची पुन्हा अदलाबदली झाल्याने संतापाचे वातावरण निर्माण झाले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 31, 2026 | 03:37 PM
सातारा जिल्हा शासकीय रूग्णालयात मृतदेहांची अदलाबदल; नातेवाईकांचा व्यवस्थापनावर संताप
Follow Us
Follow Us:

सातारा :  क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मंगळवारी सकाळी नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देताना त्याची पुन्हा अदलाबदली झाल्याने संतापाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणाची दखल सातारा जिल्हा शल्य चिकित्सकांनी घेत याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

सोनगरवाडी (ता. वाई) येथील आनंद ओव्हाळ (वय २६) यांनी विषप्राशन केल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. तर आरळे येथील सुरेश मस्कु खोमणे (वय ५१) हे मागील तीन दिवसांपासून उपचार घेत होते. उपचारादरम्यान रात्री त्यांचे निधन झाले. दोन्ही मृतदेहांचे रात्रीच शवविच्छेदन करण्यात आले. मात्र, सकाळी नातेवाईकांना चेहरा न दाखवता मृतदेह ताब्यात देण्यात आल्याची तक्रार नातेवाईकांनी केली आहे. बॉडी ताब्यात दिल्यानंतर आरळे येथील नातेवाईकांनी खोमणे यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले.

दरम्यान, ही अदलाबदल झाल्याचे लक्षात येताच अंत्यसंस्कारासाठी पेटवलेली चिता विझवण्यात आली. या घटनेमुळे नातेवाईक आक्रमक झाले असून, रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्याच्या (स्वीपर) हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकारामुळे रुग्णालय प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा : मावळ, मुळशी, हवेलीचा चेहरामोहरा बदलणार, पीएमआरडीएकडून विकास आराखडा जाहीर; पर्यटनासाठी तब्बल…

नातेवाईकांचा संताप आणि कर्मचाऱ्यांची खडाजंगी

सोनगीरवाडी येथील मयत योगाच्या नातेवाईकांनी संबंधित प्रकाराबाबत संताप व्यक्त करत रुग्णालय व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांशी जोरदार वाद घातला. मृतदेहाचे तोंड दाखवण्यात न आल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा संताप व्यक्त करत संबंधित कर्मचाऱ्यांना ताबडतोब आमच्या समोर आणा अशी मागणी केली. हा गंभीर प्रकार समोर येतात सातारा पोलीसही घटनास्थळी उपस्थित झाले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांनी या प्रकरणांमध्ये दोन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याबाबतचा अहवाल वरिष्ठांना सादर करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मृतदेहांचा चेहरा नातेवाईकांना दाखवून खात्री करण्यात आल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे. मग नक्की चूक झाली कुठे हे शोधण्यामध्ये आता प्रशासन व्यस्त झाले आहे.

Web Title: Allegations of bodies being swapped at satara district government hospital

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 03:37 PM

Topics:  

  • Hospital
  • Satara News
  • Satara Police

संबंधित बातम्या

दिव्यांगांचा संताप अनावर! जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत लोटांगण; पोलिसांशी शाब्दिक चकमक
1

दिव्यांगांचा संताप अनावर! जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत लोटांगण; पोलिसांशी शाब्दिक चकमक

मुनावळे जलपर्यटन प्रकल्पासाठी ९२ कोटींचा निधी; किल्ले प्रतापगडावर वीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारणार!
2

मुनावळे जलपर्यटन प्रकल्पासाठी ९२ कोटींचा निधी; किल्ले प्रतापगडावर वीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारणार!

Satara News: स्मार्ट मीटर सक्तीविरोधात सातारकरांचा जनआक्रोश मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, सरकारला आंदोलनाचा इशारा
3

Satara News: स्मार्ट मीटर सक्तीविरोधात सातारकरांचा जनआक्रोश मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, सरकारला आंदोलनाचा इशारा

Satara Politics: सातारा क्लब-फोरम प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी; महसूल मंत्र्यांचे आदेश
4

Satara Politics: सातारा क्लब-फोरम प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी; महसूल मंत्र्यांचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.